खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणा

जळगाव ः खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. दर धुळे, जळगावच्या प्रमुख बाजारात किंवा शिवार खरेदीत प्रतिक्विंटल १४०० रुपयांपर्यंत पोचले आहेत.
Onion price improvement in Khandesh
Onion price improvement in Khandesh

जळगाव ः खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. दर धुळे, जळगावच्या प्रमुख बाजारात किंवा शिवार खरेदीत प्रतिक्विंटल १४०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. 

कांद्याचे दर एप्रिलच्या अखेरीस प्रतिक्विंटल ९०० रुपये, एवढे होते. त्यात हळूहळू सुधारणा सुरू झाली. बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया कोरोनाच्या संकटामुळे रखडत सुरू आहे. अशात अनेक खरेदीदारांनी मागणी लक्षात घेता कांद्याची थेट शिवार खरेदी सुरू केली. ही शिवार खरेदी अजूनही सुरू आहे. उठाव असल्याने कांद्याच्या दरात सुधारणा होत गेली. या महिन्याच्या सुरवातीला प्रतिक्विंटल किमान ९०० व कमाल दर १२०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. तर गेल्या  आठवड्यात दरात आणखी सुधारणा होऊन कमाल दर १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. 

दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा लाभ मिळत आहे. कांदा काढणी १०० टक्के पूर्ण झाली आहे. यंदा लागवड गेल्या वर्षाएवढीच म्हणजेच सुमारे १४ हजार हेक्टरवर खानदेशात झाली होती. धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, धुळे व साक्री या सर्वच तालुक्यांमध्ये लागवड झाली होती. काही शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने लागवड केली होती. जशी काढणी झाली, तशी कांद्याची विक्री काही शेतकऱ्यांनी केली. तर काही शेतकऱ्यांनी एप्रिलअखेर काढणीनंतर कांद्याची साठवणूक केली होती. या कांद्याला बऱ्यापैकी दर मिळत आहेत. 

कांद्यासाठी खानदेशात धुळे, साक्री, जळगावमधील चाळीसगाव, जळगाव, चोपड्यातील अडावद, किनगाव येथील बाजार प्रसिद्ध आहे. किनगाव, अडावद येथील खरेदीदार शिवार खरेदीवर भर देत आहेत. कारण, कोविडमुळे बाजारात गर्दी नियंत्रणाचे आदेश आहेत. जळगाव, चाळीसगाव, धुळे येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव रखडत सुरू आहेत. पण लिलाव प्रक्रिया मार्गी लागत आहे. आवक स्थिर आहे.

जळगावात अधिक आवक

धुळ्यात सध्या प्रतिदिन एक हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. जळगाव येथेही प्रतिदिन ११०० क्विंटल आवक होत आहे. जळगाव येथे आवक अधिक आहे. पण आवक स्थिर असतानाच उठाव चांगला आहे, यामुळे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com