agriculture news in marathi Onion price improvement in Khandesh | Page 2 ||| Agrowon

खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 मे 2021

जळगाव ः खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. दर धुळे, जळगावच्या प्रमुख बाजारात किंवा शिवार खरेदीत प्रतिक्विंटल १४०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. 

जळगाव ः खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. दर धुळे, जळगावच्या प्रमुख बाजारात किंवा शिवार खरेदीत प्रतिक्विंटल १४०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. 

कांद्याचे दर एप्रिलच्या अखेरीस प्रतिक्विंटल ९०० रुपये, एवढे होते. त्यात हळूहळू सुधारणा सुरू झाली. बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया कोरोनाच्या संकटामुळे रखडत सुरू आहे. अशात अनेक खरेदीदारांनी मागणी लक्षात घेता कांद्याची थेट शिवार खरेदी सुरू केली. ही शिवार खरेदी अजूनही सुरू आहे. उठाव असल्याने कांद्याच्या दरात सुधारणा होत गेली. या महिन्याच्या सुरवातीला प्रतिक्विंटल किमान ९०० व कमाल दर १२०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. तर गेल्या 
आठवड्यात दरात आणखी सुधारणा होऊन कमाल दर १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. 

दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा लाभ मिळत आहे. कांदा काढणी १०० टक्के पूर्ण झाली आहे. यंदा लागवड गेल्या वर्षाएवढीच म्हणजेच सुमारे १४ हजार हेक्टरवर खानदेशात झाली होती. धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, धुळे व साक्री या सर्वच तालुक्यांमध्ये लागवड झाली होती. काही शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने लागवड केली होती. जशी काढणी झाली, तशी कांद्याची विक्री काही शेतकऱ्यांनी केली. तर काही शेतकऱ्यांनी एप्रिलअखेर काढणीनंतर कांद्याची साठवणूक केली होती. या कांद्याला बऱ्यापैकी दर मिळत आहेत. 

कांद्यासाठी खानदेशात धुळे, साक्री, जळगावमधील चाळीसगाव, जळगाव, चोपड्यातील अडावद, किनगाव येथील बाजार प्रसिद्ध आहे. किनगाव, अडावद येथील खरेदीदार शिवार खरेदीवर भर देत आहेत. कारण, कोविडमुळे बाजारात गर्दी नियंत्रणाचे आदेश आहेत. जळगाव, चाळीसगाव, धुळे येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव रखडत सुरू आहेत. पण लिलाव प्रक्रिया मार्गी लागत आहे. आवक स्थिर आहे.

जळगावात अधिक आवक

धुळ्यात सध्या प्रतिदिन एक हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. जळगाव येथेही प्रतिदिन ११०० क्विंटल आवक होत आहे. जळगाव येथे आवक अधिक आहे. पण आवक स्थिर असतानाच उठाव चांगला आहे, यामुळे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.


इतर बातम्या
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....
नांदेडमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्याचे...नांदेड : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच सततच्या...
खानदेशात सोयाबीन पेरणीत घटजळगाव : खानदेशात यंदा नापेर क्षेत्र यंदा वाढणार...
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भावअकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य...
परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम...परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५...पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात...