खानदेशात कांदा दरात सुधारणा

खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-पाच दिवसांत सुधारणा झाली असून, कमाल दर १५५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. किमान दरही ८५० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.
Onion price improvement in Khandesh
Onion price improvement in Khandesh

जळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-पाच दिवसांत सुधारणा झाली असून, कमाल दर १५५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. किमान दरही ८५० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. 

दरात सुधारणा होत असतानाच आवकेत मात्र गेले सात-आठ दिवस घट दिसून आली आहे. कांद्यासाठी खानदेशात धुळे, साक्री (ता. धुळे), अडावद (ता. चोपडा), जळगाव, चाळीसगाव येथील बाजार प्रसिद्ध आहेत. या बाजारांमध्ये कांद्याची आवक गेले तीन दिवस सरासरी पाच हजार क्विंटल सरासरी एवढी राहिली आहे. जळगावच्या बाजारात यावल, चोपडा, जळगाव, जामनेर, औरंगाबादमधील सोयगाव येथूनही कांद्याची आवक होत आहे. ही आवक पुढे आणखी कमी होईल, असे सांगण्यात आले. 

गेल्या पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी पाच हजार क्विंटल आवक या बाजार समित्यांमध्ये झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील कांद्याची मे महिन्यात सुरुवातीला किंवा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बाजारात विक्री केली आहे. कांद्याला सुरुवातीपासून उचल होती. एप्रिलमध्येही कोविडमुळे लॉकडाउनची समस्या होती. यामुळे या काळात काही खरेदीदार, व्यापाऱ्यांनी थेट शेतातून किंवा शिवार खरेदीतून कांद्याची उचल केली. 

सध्या शेतकऱ्यांकडे फारसा कांदा शिल्लक नाही. परंतु काही शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करून कांदा चाळीत साठवणूक केली आहे. यामुळे या शेतकऱ्यांना सध्या दरवाढीचा लाभ मिळत आहे. जळगाव बाजार समितीमध्ये सध्या किंवा गेल्या आठवडाभरात प्रतिदिन सरासरी ६०० क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. लाल कांद्याचीच अधिक आवक असून, पांढऱ्या कांद्याची तोकडी आवक होत आहे.

कांदा लागवड स्थिर खानदेशात उन्हाळ कांद्याची सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झाली होती. लागवड स्थिर होती. जळगाव जिल्ह्यात सुमारे आठ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. तर धुळ्यात सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झाली होती. काढणी मार्च महिन्यात सुरू झाली. आवक एप्रिलमध्ये अधिक होती. कोविडच्या समस्येत सुरुवातीला दर कमी होते, नंतर दरवाढ झाली आहे, असे जाणकारांनी सांगितले.

चांगली उलाढाल कांदा बाजारात खानदेशात गेले तीन महिने चांगली उलाढाल झाली आहे. जळगाव बाजार समितीत दर महिन्याला (गेले तीन महिने) कांदा खरेदी - विक्रीतून सुमारे ६५ लाखांची उलाढाल झाली होती. कोविड काळातही कांद्याची उचल व आवक बऱ्यापैकी राहिली, अशी माहिती मिळाली.

लागवडीची माहिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)
वर्ष लागवड
२०१८ १४ हजार
२०१९ १६ हजार
२०२० १५ हजार

कांदा आवक एप्रिलमध्ये अधिक होती. त्या वेळी मागणी असल्याने थेट खेडा खरेदीदेखील सुरू झाली. सध्या मागणी टिकून आहे. यामुळे दरवाढ झाली आहे.  - आश्‍विन पाटील, कांदा व्यापारी, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com