Agriculture news in Marathi Onion price improvement in Khandesh | Page 3 ||| Agrowon

खानदेशात कांदा दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 जून 2021

खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-पाच दिवसांत सुधारणा झाली असून, कमाल दर १५५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. किमान दरही ८५० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. 

जळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-पाच दिवसांत सुधारणा झाली असून, कमाल दर १५५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. किमान दरही ८५० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. 

दरात सुधारणा होत असतानाच आवकेत मात्र गेले सात-आठ दिवस घट दिसून आली आहे. कांद्यासाठी खानदेशात धुळे, साक्री (ता. धुळे), अडावद (ता. चोपडा), जळगाव, चाळीसगाव येथील बाजार प्रसिद्ध आहेत. या बाजारांमध्ये कांद्याची आवक गेले तीन दिवस सरासरी पाच हजार क्विंटल सरासरी एवढी राहिली आहे. जळगावच्या बाजारात यावल, चोपडा, जळगाव, जामनेर, औरंगाबादमधील सोयगाव येथूनही कांद्याची आवक होत आहे. ही आवक पुढे आणखी कमी होईल, असे सांगण्यात आले. 

गेल्या पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी पाच हजार क्विंटल आवक या बाजार समित्यांमध्ये झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील कांद्याची मे महिन्यात सुरुवातीला किंवा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बाजारात विक्री केली आहे. कांद्याला सुरुवातीपासून उचल होती. एप्रिलमध्येही कोविडमुळे लॉकडाउनची समस्या होती. यामुळे या काळात काही खरेदीदार, व्यापाऱ्यांनी थेट शेतातून किंवा शिवार खरेदीतून कांद्याची उचल केली. 

सध्या शेतकऱ्यांकडे फारसा कांदा शिल्लक नाही. परंतु काही शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करून कांदा चाळीत साठवणूक केली आहे. यामुळे या शेतकऱ्यांना सध्या दरवाढीचा लाभ मिळत आहे. जळगाव बाजार समितीमध्ये सध्या किंवा गेल्या आठवडाभरात प्रतिदिन सरासरी ६०० क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. लाल कांद्याचीच अधिक आवक असून, पांढऱ्या कांद्याची तोकडी आवक होत आहे.

कांदा लागवड स्थिर
खानदेशात उन्हाळ कांद्याची सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झाली होती. लागवड स्थिर होती. जळगाव जिल्ह्यात सुमारे आठ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. तर धुळ्यात सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झाली होती. काढणी मार्च महिन्यात सुरू झाली. आवक एप्रिलमध्ये अधिक होती. कोविडच्या समस्येत सुरुवातीला दर कमी होते, नंतर दरवाढ झाली आहे, असे जाणकारांनी सांगितले.

चांगली उलाढाल
कांदा बाजारात खानदेशात गेले तीन महिने चांगली उलाढाल झाली आहे. जळगाव बाजार समितीत दर महिन्याला (गेले तीन महिने) कांदा खरेदी - विक्रीतून सुमारे ६५ लाखांची उलाढाल झाली होती. कोविड काळातही कांद्याची उचल व आवक बऱ्यापैकी राहिली, अशी माहिती मिळाली.

लागवडीची माहिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)
वर्ष लागवड
२०१८ १४ हजार
२०१९ १६ हजार
२०२० १५ हजार

कांदा आवक एप्रिलमध्ये अधिक होती. त्या वेळी मागणी असल्याने थेट खेडा खरेदीदेखील सुरू झाली. सध्या मागणी टिकून आहे. यामुळे दरवाढ झाली आहे. 
- आश्‍विन पाटील, कांदा व्यापारी, जळगाव


इतर ताज्या घडामोडी
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...
काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काथ्या उद्योग...
चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी...अमरावती : शेती कामाकरिता बैलांचा वापर होत...
शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे : शरद पवारजुन्नर, जि. पुणे ः शेतीमालाला चांगला भाव देण्याची...
पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक;...आर्णी, जि. यवतमाळ : ८५ वर्षांपूर्वी आलेल्या...
संत्रा उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर...अमरावती : विदर्भातील मुख्य पीक असलेल्या संत्रा...
नागपूर जिल्हा परिषदेत ‘फाइल ट्रॅकर’नागपूर : ‘सरकारी काम आणि महिनाभर थांब’, असाच...
आंबा, काजू विम्यासाठी जुने निकष लागू...सिंधुदुर्गनगरी ः फळपीक विमा योजनेचे बदललेले निकष...