ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा
नाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात पोळ कांद्याची आवक १२ हजार ७८४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८५० ते ३३०० मिळाला, तर सर्वसाधारण दर २४०० रुपये राहिला.
नाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात पोळ कांद्याची आवक १२ हजार ७८४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८५० ते ३३०० मिळाला, तर सर्वसाधारण दर २४०० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.
चालू सप्ताहात बटाट्याची आवक ११३१० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ११५० ते २१००, तर सर्वसाधारण दर १६१० रुपये राहिला. लसणाची आवक ११७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४५०० ते ९२०० तर सर्वसाधारण दर ७३२० रुपये राहिला.
फळभाज्यांची आवक कमी जास्त झाली. हिरव्या मिरचीची आवक ९३४ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २५००ते ४००० रुपये, तर सर्वसाधारण दर ३३०० रुपये मिळाला. गाजराची आवक २३७० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १५०० सर्वसाधारण दर ११०० रुपये राहिला.
टोमॅटोला ५० ते १५० तर सरासरी १००, वांगी १८० ते ४६०, तर सर्वसाधारण ३३० व फ्लॉवर ५० ते ११० सर्वसाधारण ७५ रुपये दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला ३० ते ५० तर सर्वसाधारण ४० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला १५० ते ३०० तर सरासरी दर २३० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.
वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा ५० ते ११० तर सरासरी ८०, कारले २४० ते ४५० तर सरासरी ३५०,गिलके १७० ते ४०० सर्वसाधारण २५०,भेंडी २३० ते ४०० तर सरासरी ३४० व दोडका २८० ते ५१० तर सरासरी दर ३८० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला २०० ते ३५० तर सर्वसाधारण २८० रुपये असे २० किलोस दर मिळाले.
फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक ७१० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ४०० ते १००० तर सर्वसाधारण दर ७०० रुपये मिळाला. डाळिंबांची आवक ६१ क्विंटल झाली. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल १००० ते २००० तर सरासरी १५०० व मृदुला वाणास ६५०० ते १०००० सर्वसाधारण ८५०० रुपये दर मिळाला.
पपईची आवक २१५ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ६५० ते १५००, तर सर्वसाधारण दर १००० रुपये होता. मोसंबीची आवक ७० क्विंटल झाली. त्यांना २००० ते ४५०० रुपये सर्वसाधारण ३५०० प्रतिक्विंटल दर मिळाला.
शेतीमालाची आवक कमी- जास्त झाल्याने दरही कमी जास्त राहिले, अशी माहिती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सूत्रांनी दिली.
- 1 of 65
- ››