पुणे बाजारात कांदा दरात सुधारणा

राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका भाजीपाल्याला बसला असून, गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १८) भाजीपाल्याच्या आवकेच घट झाली. परिणामी सुमारे ७० ट्रक आवक होऊन, बहुतांश भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली होती.
Onion price improvement in Pune market
Onion price improvement in Pune market

पुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका भाजीपाल्याला बसला असून, गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १८) भाजीपाल्याच्या आवकेच घट झाली. परिणामी सुमारे ७० ट्रक आवक होऊन, बहुतांश भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली होती. यामध्ये प्रामुख्याने हिरवी मिरची, सिमला मिरची, फ्लॉवर कोबी, भेंडी, गवार, शेवगा, बीट, घेवडा, पावटा, भुईमुगासह राजगिराचा समावेश होता. तर कांद्याला मागणी वाढल्याने चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याचा दर प्रति किलोला ६३ रुपयांपर्यंत वाढला होता. तर सरासरी दर ४० रुपयांपर्यंत होता.

आवकेमध्ये परराज्यातून बंगलोर येथून १ टेम्पो आले, बेळगाव येथून दोन ट्रक रताळी, सिमला येथून मटार २ ट्रक, इंदौर येथून ५ टेम्पो गाजर, कर्नाटक गुजरात येथून ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि गुजरात येथून ८ टेम्पो हिरवी मिरची, तमिळनाडू येथून शेवगा सुमारे २ टेम्पो, तर आग्रा आणि इंदौर येथून ३० ट्रक बटाटा तर गुजरात आणि मध्यप्रदेशातून लसूण ८ ट्रक आवक झाली होती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गोणी, कोबी सुमारे ५ टेम्पो, फ्लॉवर ८ टेम्पो, भेंडी ८ तर गवार ४ टेम्पो, सिमला मिरची ८ टेम्पो, टोमॅटो १० हजार क्रेट, गाजर १५० गोणी, तर भुईमूग सुमारे १०० गोणी, तांबडा भोपळा ८ टेम्पो, जुना कांदा सुमारे ६० ट्रक तर नवीन कांदा सुमारे ३०० गोणी आवक झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या सुमारे एक लाख ७५ हजार तर मेथीच्या ५० हजार तर राजगिऱ्याच्या १ लाख जुड्या आवक झाली होती.

फळभाज्यांचे १० किलोचे दर पुढीलप्रमाणे कांदा - जुना ५००-६३०, नवीन ३००-५००, बटाटा -३००-३५०, लसूण - ५००-११००, आले सातारी २००-३५०, बंगलोर -२५०, भेंडी ३००-४००, गवार - गावरान, सुरती - ५००-६००, टोमॅटो -२००-२५०, दोडका ३००-४५०, हिरवी मिरची - ५००-६५०, दुधी भोपळा - २००-२५०, चवळी - २५०-३००, काकडी -१५०-२००, कारली हिरवी - २५०-३००, पांढरी -२००-२५०, पापडी - ४००-४५०, पडवळ -२००-२५०, फ्लॉवर २५०-३००, कोबी -२५०-३००, वांगी -२५०-३५०, डिंगरी - २००-२५०, नवलकोल - १४०-१५०, ढोबळी मिरची - ४००-४५०, तोंडली- कळी ३५०-४००, जाड -१५०-२००, शेवगा -६५०-७००, गाजर - स्थानिक - २००-२५०, परराज्य - ३००-३५०, वालवर - ३५०-४००, बीट ४००-५००, घेवडा -६००-७००, कोहळा १००-१५०, आर्वी -२००-२२०, घोसावळे २००-२५०, मटार परराज्य - ८००- ९५०, पावटा ५००-५५०, तांबडा भोपळा - ६०-१००, रताळी - बेळगाव - १६०-१८०, कराड - २५०-२८०, सुरण -१८०-२००, नारळ (शेकडा) १०००-१६००, मका कणीस (१० किलो) ६०-१२०

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर कोथिंबीर - १००-१०००, मेथी १०००-१५००, शेपू ६००-१००० कांदापात १५००-२५००, चाकवत ८००-१०००, करडई -८००-१०००, पुदिना - ३००-६००, अंबाडी -६००-८००, मुळे १०००-१५००, राजगिरा - ५००-८००, चुका ५००-६००, चवळई -५००-८००, पालक ५००-८००

फुलबाजार फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-३०, गुलछडी : १५०-२५०, बिजली - ५०-१५०, कापरी : ४०-६०, शेवंती : १००-२५० (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १५-३०, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) : ४०-६०, लिलि बंडल : २५-३० जर्बेरा : १०-३०, कार्नेशन १००-१५०. जुई १४००-१६००..

फळांचा बाजार रविवारी (ता.१८) येथील फळबाजारात संत्री ३० टन तर मोसंबी सुमारे ५० टन, डाळिंब सुमारे १०० टन, पपई २५ टेम्पो, लिंबे दीड हजार गोणी, कलिंगड १५ टेम्पो, खरबूज ५ टेम्पो, सिताफळ १० टन, चिकू १ हजार गोणी तर पेरू सुमारे ४०० क्रेटस आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ३००-५००, मोसंबी : (३ डझन) : १८०-४००, (४ डझन ) : १००-१९०, संत्रा : (१० किलो ) : ३००-६०० डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३५-१४०, गणेश : ५-२५ आरक्ता १०-६०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-३०, पपई : ५-२०, सीताफळ - ५-१००. पेरू (२० किलो क्रेट) - ३००-५००.

मटण मासळी

देशभरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाल्याने उपवास सुरु झाले आहेत. यामुळे या दहा दिवसांत मांसाहार वर्ज असल्याने मटण मासळीची मागणी ५० टक्क्यांपर्यंत घटली आहे. नवरात्री निमित्त शहरात विविध ठिकाणी होणारा बंगाली खाद्य महोत्सव रद्द झाल्याने मासळीची मागणी घटली आहे.    गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता.१८) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ५ टन, खाडीची सुमारे १०० किलो तर नदीच्या मासळीची  ४०० किलो आवक झाली होती.  तर, आंध्रप्रदश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ८ टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) पापलेट कापरी : १२००, मोठे ८००-१०००, मध्यम : ५००-८००, लहान ४००- ४८०, भिला : ३६०, हलवा : ४००, सुरमई : ३६०-४८०, रावस : लहान ४४०-४८०  मोठा : ६००, घोळ : ४८०, भिंग : ३२०, करली : २४०-२८०, करंदी : सोललेली ४००, पाला :  लहान  ७००, मोठे  १२००, वाम : ४८०, ओले बोंबील : ८०-१२०.

कोळंबी लहान ३६०, मोठे ४८०, जंबोप्रॉन्स : १०००-१२००,  किंगप्रॉन्स : ६००, लॉबस्टर : १०००, मोरी : २८०, मांदेली : ८०-१००, राणीमासा : १६०-२००, खेकडे  : २००-२४०, चिंबोऱ्या : ४४०-४८०.

खाडीची मासळी सौंदाळे : २००-२४०, खापी :२००- २४०, नगली : लहान ३६०, मोठी ६५०, तांबोशी : ४००, पालू : २००, लेपा : १६०,  शेवटे : २००, बांगडा : लहान २००-२४० , मोठे २८०, पेडवी : ८०-१००, बेळुंजी : १४०-१६०,  तिसऱ्या : २००,  खुबे : १२०-१४०, तारली : १४०,

नदीची मासळी रहू : १६०, कतला : १६०, मरळ : ४४०-४८० शिवडा : १६०-२००, खवली : २००, आम्ळी : १००, खेकडे :१६०- २०० वाम : ४८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com