Agriculture news in marathi Onion price of Rs 13 thousand and 331 per quintal in Mangalvedha | Agrowon

मंगळवेढा : कांद्याला १३ हजार ३३१ रुपये दर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

पावसाने दोन एकर कांद्यामधील निम्म्याहून अधिक कांदा खराब झाला. राहिलेल्या कांद्यातून निवडलेल्या कांद्याला चांगला दर मिळाल्यामुळे उत्पादन खर्च कसा तरी भागवणे शक्‍य होणार आहे. 
- बबलू गायकवाड, कांदा उत्पादक शेतकरी 

शेतकऱ्यांना चांगला दर देण्यासाठी जिल्ह्याबाहेरील व्यापाऱ्याला लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करू. आणखीन जादा दर मिळण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.
- सोमनाथ अवताडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगळवेढा

मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.४) झालेल्या कांद्याच्या लिलावात बबलू गायकवाड या शेतकऱ्याच्या कांद्याला प्रतिक्विंटल १३ हजार ३३१ रुपये असा उच्चांकी दर मिळाला. सोलापूर बाजार समितीनंतर आता मंगळवेढ्यातही कांद्याच्या दरात तेजी आल्याचे चित्र आहे.

बुधवारी बाजारात १८० क्विंटल आवक झाली. मंगळवारी १९० क्विंटल आवक होती. मंगळवारी कांद्याला सरासरी ४८०० रुपये आणि सर्वाधिक ६५०० रुपये दर मिळाला. पण बुधवारी जवळपास दुप्पट दर मिळाला. शेतकरी बबलू गायकवाड यांच्या कांद्याला मारुती हरी काळे या व्यापाऱ्याने वसंत रामचंद्र चेळेकर यांच्या आडत दुकानातील लिलाव प्रक्रियेत बोली लावत १३ हजार ३३१ रुपये इतका उच्चांकी दर जाहीर केला. मंगळवेढ्यात पहिल्यांदाच कांद्याला एवढा उच्चांकी दर मिळाला. 

बाजार समितीत यापूर्वी वांग्याला व कांद्याला उच्चांकी दर मिळाला. याशिवाय तूर, मका आणि हरभरा आदींचे हमीभाव केंद्र सुरू करून त्या माध्यमातूनही जादाचा दर मिळाला. कांद्याला पहिल्यांदाच हा दर मिळाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे यांनी शेतकरी गायकवाड या शेतकऱ्यांचा बाजार समितीच्या आवारात सत्कार केला. 

या वेळी जिल्हा बॅंकेचे संचालक बबनराव आवताडे, मुंबईतील कांदा व्यापारी सुरेश मल्लाळे, कोल्हापूरचे गणेश थोरबोले, सचिव सचिन देशमुख, प्रमोद भगरे, नवनाथ बनसोडे, सचिन चेळेकर, अनिल बोदाडे, ओंकार भोसले,मारुती काळे, सत्यजीत सुरवसे, धनाजी पवार, दत्तात्रय कांबळे, परमेश्वर इंगळे, अरुण माने,दत्ता शिंदे, विनायक आवताडे, दत्तात्रय टुले,आदी उपस्थित होते.


इतर बातम्या
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...