Agriculture news in marathi; Onion price of Rs 5 per kg on Pimpalner Market Committee | Agrowon

पिंपळनेर बाजार समितीत कांद्याला ३१०० ते ३४०० दर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

पिंपळनेर, जि. धुळे  ः साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येथील उपबाजार समितीत कांद्याला ३१०० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. समितीत सोमवारी (ता. १६) सुमारे ५०० हून अधिक वाहनांतून ३० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आता शेतकऱ्यांकडे अल्प प्रमाणात उन्हाळ कांदा शिल्लक असून, राज्यात सर्वत्र कांद्याचे दर कडाडले आहेत. मात्र, या वाढीव दराचा फायदा कमी शेतकऱ्यांना होत आहे. 

पिंपळनेर, जि. धुळे  ः साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येथील उपबाजार समितीत कांद्याला ३१०० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. समितीत सोमवारी (ता. १६) सुमारे ५०० हून अधिक वाहनांतून ३० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आता शेतकऱ्यांकडे अल्प प्रमाणात उन्हाळ कांदा शिल्लक असून, राज्यात सर्वत्र कांद्याचे दर कडाडले आहेत. मात्र, या वाढीव दराचा फायदा कमी शेतकऱ्यांना होत आहे. 

येथील उपबाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी होत आहे. केवळ २००० ते २४०० रुपये भाव मिळत असताना परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री केली. दुसरीकडे तीन-चार दिवसांपासून मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात आज ३४०० रुपयांपर्यंत वाढ झाली. सध्या शेतकऱ्यांकडे अगदी कमी प्रमाणात कांदा शिल्लक आहे. त्यामुळे भाव वाढला; परंतु शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही, अशी स्थिती झाली आहे. उपबाजार समितीत आज पाचशेहून अधिक वाहनांतून सुमारे ३० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला कमीत कमी ३१०० आणि जास्तीत जास्त ३४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

बाजार समितीचे शाखाप्रमुख संजय बावा आणि संचालकांच्या उपस्थितीत आज सकाळी अकराला कांदा लिलावाला सुरवात झाली. खरेदीसाठी व्यापारी नासीर सय्यद, प्रा. किरण कोठावदे, संचालक गजेंद्र कोतकर, प्रभाकर कोठावदे, प्रमोद कोठावदे, हेमंत कोठावदे, दीपक भदाणे, बापू काकुस्ते, दीपक बागड, रावसाहेब घरटे, जितेंद्र कोतकर, बाळासाहेब घरटे, राजेंद्र शिरसाट, महेश भदाणे, अरुण नंदन आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपला कांदा समितीच्या आवारात विक्रीस आणून सहकार्य करावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले. आज कांद्याला प्रतिक्विंटल ३४०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त झाले. 

इतर बातम्या
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...
वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...