नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ६० दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्य
बाजारभाव बातम्या
सोलापुरात कांद्याच्या दरातील तेजी पुन्हा टिकून
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याच्या दराने सर्वाधिक २० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळवत उच्चांक केला. त्यानंतरही आवक वाढत राहिली, पण दर मात्र टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
सोलापुरात गेल्या महिनाभरापासून कांद्याची आवक रोज किमान २०० गाड्यांच्यापुढे आहे. या सप्ताहातही तशीच काहीशी परिस्थिती होती. पण या सप्ताहात ५ डिसेंबरला कांद्याच्या बाजाराने ऐतिहासिक कामगिरी केली. देशभरात सर्वाधिक प्रतिक्विंटलला २० हजार रुपयांचा दर या दिवशी मिळाला.

कांद्याची आवक तशी स्थानिक भागातून कमी असली, तरी बाहेरील जिल्ह्यातून आणि विशेषतः कर्नाटक, आंध्रप्रदेश या परराज्यांतून सर्वाधिक आहे. त्यानंतरच्या सलग दोन दिवसांत कांद्याला किमान २०० रुपये, सरासरी ५५०० रुपये आणि सर्वाधिक १७ हजार रुपये असा दर मिळाला. २-३ हजारांने दरातील चढ-उतार असला, तरी दर टिकून राहिले. जुन्या आणि वाळलेल्या कांद्याला हा दर मिळतो आहे. पण, नव्या कांद्याला एक-दोन हजारांचा फरक वगळता दर स्थिर आहेत.
वांगी, गवार, घेवड्याचे दरही पुन्हा काहीसे तेजीत राहिले. त्यांची आवक ही स्थानिक भागातूनच राहिली. वांग्याची आवक प्रतिदिन २० ते ३० क्विंटल, गवारची २ ते ५ क्विंटल आणि घेवड्याची १० क्विंटलपर्यंत आवक राहिली. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, गवारला किमान २५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये, तर घेवड्याला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला.
भाजीपाल्यामध्ये कोथिंबिर, शेपूचे दर काहीसे वधारले मेथीचे दर मात्र स्थिर राहिले. भाज्यांची आवक प्रतिदिन प्रत्येकी १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. शेपू, कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ५०० ते ७०० रुपये, तर मेथीला ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला.
लसणाचा दर वधारलेलाच
गेल्या काही महिन्यांपासून कांद्यापाठोपाठ लसणाचे दर काहीसे तेजीत आहेत. या सप्ताहात ही तेजी आणखीनच वाढली. लसणाचीही आवक स्थानिक भागापेक्षाही बाहेरील जिल्ह्यातून जास्त आहे. रोज आवक नसली, तरी एक-दोन दिवसाआड २० ते ४० क्विंटलपर्यंत ही आवक राहिली. लसणाला प्रतिक्विंटलला किमान १० हजार रुपये, सरासरी १२ हजार रुपये आणि सर्वाधिक १४ हजार ५०० रुपयांपर्यंत कमाल दर मिळाला.
- 1 of 65
- ››