अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणाम

टर्की आणि अफगाणिस्तान येथून कांद्याची आवक होत आहे, त्यामुळे बाजारात पुरवाठा वाढून दर कोसळतील या भीतीने अनेक शेतकरी लेट खरिपातील कांद्याची काढणी करून बाजारात आणत आहेत. - संदीप मगर, शेतकरी, सातारा
Onion
Onion

नवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील घटीमुळे बाजारात तुटवडा निर्माण होऊन दर चांगलेच वाढले आहेत. वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लेट खरिपातील कांद्याची वेळेआधीच काढणी करून अपरिपक्व कांदा बाजारात आणण्यास सुरवात केली आहे. परिणामी कांद्याच्या दरवाढीला ‘ब्रेक’ लागला आहे. मगील महिनाभरात कांद्याने काही ठाकणी किरकोळ बाजारात शंभरी पार केली आहे. देशातील सर्वांत मोठ्या कांदा बाजार असलेल्या लालसगाव बाजार समितीत मागील आठवड्यात दर प्रतिक्विंटल ७५०० रुपयांपर्यंत गेला होता. त्यामुळे वाढलेल्या दराचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लेट खरिपात लागवड केलेला कांदा पक्व होण्याआधीच बाजारात आणला आहे. नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने आपसूकच बाजारात दर काही प्रमाणात कमी झाले. सोबतच आयात केलेला कांदाही दाखल झाल्याने त्याचाही परिणाम दरावर झाला आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.   लासगाव बाजार समितीत लाल कांदा सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार ४०० रुपये दराने विकला जात आहे. सोमवारी हाच कांदा ४ हजार २०० रुपये दराने विकला गेला होता. कांद्याचे दर नवीन पीक बाजारात दाखल झाल्यानंतर आणखीनच कमी होतील. मंगळवारी बाजार समितीत ९२० टन कांदा आयात झाली होती, तर सोमवारी ५२५ टन आयात होती. अफगाणिस्तान, टर्की आणि इजिप्त या देशांमधून कांदा आयात होत आहे. अफगाणिस्तानातून पंजाबमधील बाजारात दैनंदिन ४० ते ५० ट्रक कांदा आयात होत आहे. तर रविवारपर्यंत ७५० टन कांदा इजिप्तमधून देशात दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसांत आणखी ४५० टन कांदा आयात होणार आहे.  आयातीचाही परिणाम केंद्र सरकारने कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी अफगाणिस्तान, टर्की आणि इजिप्त या देशांमधून आयात करण्याला परवानगी दिली आहे. आयात कांदा दक्षिण आणि उत्तर भारतात दाखल झाला आहे. पंजाब येथील बाजारात अफगाणिस्तानातून आयात झालेला दैनंदिन ४० ते ५० ट्रक कांदा दाखल होत आहे. येथील आझादपूर मंडीत कांदा दर प्रतिक्विंटल आठ हजार रुपायांवरून ५ ते ६ हजारांवर आले आहेत. आयात कांदा बाजारात दाखल झाल्यास दर कोसळतील या भीतीने शेतकरी नवीन कांदा बाजारात आणत आहेत. त्याचा परिणाम दरावर होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com