agriculture news in Marathi Onion prices cool off as farmers rush in with immature crop Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणाम

कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

टर्की आणि अफगाणिस्तान येथून कांद्याची आवक होत आहे, त्यामुळे बाजारात पुरवाठा वाढून दर कोसळतील या भीतीने अनेक शेतकरी लेट खरिपातील कांद्याची काढणी करून बाजारात आणत आहेत.
- संदीप मगर, शेतकरी, सातारा   
 

नवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील घटीमुळे बाजारात तुटवडा निर्माण होऊन दर चांगलेच वाढले आहेत. वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लेट खरिपातील कांद्याची वेळेआधीच काढणी करून अपरिपक्व कांदा बाजारात आणण्यास सुरवात केली आहे. परिणामी कांद्याच्या दरवाढीला ‘ब्रेक’ लागला आहे.

मगील महिनाभरात कांद्याने काही ठाकणी किरकोळ बाजारात शंभरी पार केली आहे. देशातील सर्वांत मोठ्या कांदा बाजार असलेल्या लालसगाव बाजार समितीत मागील आठवड्यात दर प्रतिक्विंटल ७५०० रुपयांपर्यंत गेला होता. त्यामुळे वाढलेल्या दराचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लेट खरिपात लागवड केलेला कांदा पक्व होण्याआधीच बाजारात आणला आहे.

नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने आपसूकच बाजारात दर काही प्रमाणात कमी झाले. सोबतच आयात केलेला कांदाही दाखल झाल्याने त्याचाही परिणाम दरावर झाला आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.   लासगाव बाजार समितीत लाल कांदा सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार ४०० रुपये दराने विकला जात आहे. सोमवारी हाच कांदा ४ हजार २०० रुपये दराने विकला गेला होता.

कांद्याचे दर नवीन पीक बाजारात दाखल झाल्यानंतर आणखीनच कमी होतील. मंगळवारी बाजार समितीत ९२० टन कांदा आयात झाली होती, तर सोमवारी ५२५ टन आयात होती. अफगाणिस्तान, टर्की आणि इजिप्त या देशांमधून कांदा आयात होत आहे. अफगाणिस्तानातून पंजाबमधील बाजारात दैनंदिन ४० ते ५० ट्रक कांदा आयात होत आहे. तर रविवारपर्यंत ७५० टन कांदा इजिप्तमधून देशात दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसांत आणखी ४५० टन कांदा आयात होणार आहे. 

आयातीचाही परिणाम
केंद्र सरकारने कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी अफगाणिस्तान, टर्की आणि इजिप्त या देशांमधून आयात करण्याला परवानगी दिली आहे. आयात कांदा दक्षिण आणि उत्तर भारतात दाखल झाला आहे. पंजाब येथील बाजारात अफगाणिस्तानातून आयात झालेला दैनंदिन ४० ते ५० ट्रक कांदा दाखल होत आहे. येथील आझादपूर मंडीत कांदा दर प्रतिक्विंटल आठ हजार रुपायांवरून ५ ते ६ हजारांवर आले आहेत. आयात कांदा बाजारात दाखल झाल्यास दर कोसळतील या भीतीने शेतकरी नवीन कांदा बाजारात आणत आहेत. त्याचा परिणाम दरावर होत आहे.


इतर अॅग्रो विशेष
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
मटण दरवाढीचा लाभ पशुपालकांना कधी?शेळीपालनाबरोबरच मेंढीपालनातही समस्यांचा ऊहापोह...
जैवविविधतेची नोंदणी गांभीर्याने घ्याराज्यातील खेड्यापाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
‘पोकरा’अंतर्गत तांत्रिक सहकार्यासाठी...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या...
अनियमित थंडी ऊस रिकव्हरीच्या मुळावरकोल्हापूरः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही ऊस...
देशात केवळ ३५ तेलबिया हबनिर्मितीनवी दिल्ली: देशातील तेलबिया उत्पादन वाढावे आणि...
राज्यात गारठा कमी, उकाडा वाढलापुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
अलिबागचा पांढरा कांदा ‘जीआय’च्या वाटेवरपुणे : औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या...
बेकायदा विदेशी खत आयातीचे परवाने रद्दपुणे : विद्राव्य खतांची बेकायदा आयात व विक्री...
‘सुधाकर सीडलेस’ द्राक्ष वाणाचे...नाशिक : शिवडी (ता. निफाड) येथील शेतकरी सुधाकर...
यांत्रिकीरणातून शेती केली सुलभ,...नगर जिल्ह्यातील बेलापूर येथील बाळासाहेब मारुतराव...
चार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...
मटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...
एरियल फवारणीसाठी हवी ‘सीआयबी’ची परवानगीनागपूर ः देशात एरियल (आकाशातून) फवारणीकामी...
कणेरी मठात ३० पासून राष्ट्रीय कृषी...कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी...
शेतकरी गट, ‘एफपीओ’ची सबलीकरणाची वाट अवघडऔरंगाबाद : गटशेती सबलीकरण योजनेंतर्गत निवडलेल्या...
‘स्मार्ट’ची तयारी पूर्ण; दिल्लीत होणार...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण...
कृषी विज्ञान केंद्राच्या तंत्रज्ञान...सोलापूर ः ‘‘सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या...
देशात यंदा कडधान्य आयात ४६ टक्के वाढलीनवी दिल्ली: देशात यंदा कडधान्य उत्पादन...
थंडी गायब; किमान तापमानात वाढ पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...