Agriculture News in Marathi Onion prices fell again | Page 2 ||| Agrowon

 कांदा दरात पुन्हा झाली घसरण 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

दर मिळेल या आशेने गत वर्षीचा उन्हाळी, गावराण कांदा साठवून ठेवला खरा, मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा फोल ठरू लागल्या आहेत. २० रुपये प्रति किलोवर अनेक दिवस स्थिर असलेला दर गेल्या दहा-बारा दिवसांपूर्वी वाढला, मात्र आठ दिवसांतच दर पुन्हा खाली आहेत.

नगर : दर मिळेल या आशेने गत वर्षीचा उन्हाळी, गावराण कांदा साठवून ठेवला खरा, मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा फोल ठरू लागल्या आहेत. २० रुपये प्रति किलोवर अनेक दिवस स्थिर असलेला दर गेल्या दहा-बारा दिवसांपूर्वी वाढला, मात्र आठ दिवसांतच दर पुन्हा खाली आहेत. आता मात्र साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढू लागले आहेत. नगर येथे शनिवारी (ता.२३) गावराण कांद्याला जिल्ह्यात कांद्याला ५०० ते ३१०० रुपयांपर्यंत, तर सरासरी २५०० रुपयांपर्यंत, तर लाल कांद्याला २०० ते २२०० रुपयांपर्यंत व सरासरी १६०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. 

नगर जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र मोठे असते. गेल्या वर्षी उन्हाळ्यात गावराण कांद्याची सुमारे साठ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झाली होती. यंदाही खरिपात पावसाळी लाल कांद्याची पंचवीस हजार तर आतापर्यत रब्बीत ४० हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. यंदाची खरीप कांदा बाजारात आला आहे. मात्र मागील सहा ते सात महिन्यांपासून कांद्याचे दर १८०० ते २००० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होते. त्यामुळे दरवाढ होईल, या आशेने शेतकऱ्यांनी साठवून ठेवला. मात्र आता गावराण कांद्याला जवळपास नऊ महिने झाले आहे. त्यामुळे चाळीतील कांदा खराब होऊ लागला आहे.
 
बाजारात मागील पंधरा दिवसांपूर्वी कांदा दरात अचानक वाढ झाली आणि दर पाच हजारांपर्यंत गेले होते. मात्र आठच दिवसांत पुन्हा दर उतरू लागले. आता पुन्हा दरात घरसण झाली असून, ३ हजार रुपये क्विटंलपर्यंत दर आले आहे. यंदा पावसाने खरीप कांद्याचे मोठे नकसान झाले आहे. या शिवाय गेल्या वर्षी खराब बियाणे व पावसामुळे चाळीतील कांदाही खराब झाला आहे. असे असताना आता पुन्हा कांदा दर घसरू लागल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शनिवारी नगरला गावरान कांद्याची २५ हजार क्विंटल, तर लाल कांद्याचे ५ हजार ७ क्विटंलची आवक झाली. 

शनिवारचे कांदा दर (क्विंटल) 
गावराण कांदा 
एक नंबर ः २६५०-३१०० 
दोन नंबर ः १७००-२६५० 
तीन नंबर ः ८५०-१७०० 
चार नंबर ः ५००-८५० 
-------- 
लाल कांदा 
एक नंबर ः १८००-२२०० 
दोन नंबर ः ११००-१८०० 
तीन नंबर ः ६००-११०० 
चार नंबर ः २००-६०० 


इतर बातम्या
नवीन ११४० कृषिपंपांना जोडण्या ः पडळकरनांदेड : ‘‘राज्य शासनाने सुरू केलेल्या कृषिपंप...
नाशिक: किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत...नाशिक: खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये केंद्र...
सांगली जिल्ह्यात बाधित पिकांचे पंचनामे...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी...
जळगाव : नावासह पत्ता दुरुस्तीसाठी  ६५...जळगाव : जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडत जळगाव ः खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडतच सुरू...
नाशिक : दुधाळ जनावरांच्या गटवाटप ...नाशिक : पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण...
सोलापूर :सिद्धेश्‍वर कारखान्याला...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
प्रोग्रेसिव्ह पॅनेलला  काठावरचे बहुमत पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांची...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...
पुणे :एकवीस जागांसाठी २९९ अर्जपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...