नगर जिल्हाभरातआवक वाढल्याने कांदा दरात चढउतार 

Onion prices fluctuate due to the incoming increase in Nagar district
Onion prices fluctuate due to the incoming increase in Nagar district

नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्हाभरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कांद्याचे दर कमी झाले आहेत. सतत चढउतार होत आहे. आवक वाढल्याने व निर्यातबंदी असल्याने दर खाली आले आहेत. सध्या एक नंबरच्या कांद्याला २००० ते २२५० रुपयाचा दर मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी कांद्याला दहा ते बारा हजार रुपये क्विंटलचा दर होता. दर घसरत असल्याने निर्यातबंदी तातडीने उठवण्याची मागणी केली जात आहे. 

जिल्ह्यामध्ये यंदा परतीचा पाऊस चांगला झाला असल्याने कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या दुष्काळ, पाणी टंचाई यांमुळे क्षेत्र घटले होते. त्याचा परिणाम कांदा उत्पादनावर झाला. आवक आणि मागणी यात मोठी तफावत असल्याने गेल्या चार महिन्यांत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. नगर, घोडेगाव, राहाता, पारनेर बाजार समितीत कांद्याला क्विंटलला पंधरा ते वीस हजारापर्यंत दर गेला. केंद्र सरकारने कांद्याचे दर कमी करण्यासाठी निर्यातबंदी केली. त्याचा परिणाम आता दर पडल्याचे दिसत आहेत. 

‘‘नंबर दोनच्या कांद्याला १६०० ते १९००, नंबर तीनच्या कांद्याला १००० ते १५००, तर चार नंबरच्या कांद्याला ३०० ते ९०० रुपयाचा दर मिळाला आहे. अन्य बाजार समितीतही असेच दर आहेत. यंदा, कांद्याला चांगले दर मिळत असल्याने लागवड केली. पण, आता दर पडत असल्याने खरिपाच्या कांद्याचा खर्चही निघेना झाला आहे. निर्यातबंदी तातडीने उठवण्याची मागणी,’’ शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब पटारे यांनी केली. 

किरकोळ बाजार वाढतेच 

कांद्याच्या ठोक दरात घसरण होत असली तरी किरकोळ दर मात्र चढतेच आहेत. ठोक दरात १५०० हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला जाणारा कांदा किरकोळ दरात मात्र ३० ते ३५ रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दर उतरलेले असले, तरी ग्राहकांना मात्र जास्तीच पैसे मोजावे लागत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com