खानदेशात लाल कांद्याची आवक वाढली

Onion prices in Khandesh begin to decline
Onion prices in Khandesh begin to decline

जळगाव : खानदेशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक या आठवड्यात वाढली आहे. दर हळूहळू कमी होत असून, ते प्रतिक्विंटल २००० ते ४५०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. 

कांद्याची आवक मागील महिन्याच्या सुरुवातीपर्यंत कमी होती. परंतु, १५ डिसेंबरनंतर धुळे, साक्री (जि. धुळे), पिंपळनेर (ता. साक्री), अडावद (ता. चोपडा), जळगाव, चाळीसगाव येथील बाजारात कांद्याची आवक वाढू लागली. जळगाव येथील बाजारात मागील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी ११०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली.

डिसेंबरच्या सुरुवातीला ही आवक प्रतिदिन सरासरी ६०० क्विंटलपर्यंत होती. आवक फक्त जळगाव, भुसावळ, चोपडा भागांतून होत होती. परंतु, नंतर आवक वाढू लागली. अडावद, यावल तालुक्‍यांतील किनगाव येथील बाजारातही आवक वाढली आहे. धुळे येथे या आठवड्यात प्रतिदिन सरासरी १२०० क्विंटलपर्यंत आवक झाली आहे.  जळगाव येथील बाजारात प्रतिदिन सरासरी १४०० क्विंटल आवक झाली आहे. सध्या आवक जळगाव, चोपडा, यावल, भुसावळ, जामनेर, पाचोरा, औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड, जालना आदी भागांतून होत असल्याचे सांगण्यात आले.

कांद्याला जळगाव बाजार समितीत प्रतिक्विंटल २००० ते ४५०० रुपयांपर्यंतचे दर आहेत. असेच दर अडावद, धुळे व पिंपळनेर भागांत आहेत. दर्जेदार कांद्याची आवक सध्या होत आहे. 

काही शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवली होती. परंतु, दर कमी होत असल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. काढणी सर्वत्र आटोपली आहे. सर्वाधिक उत्पादन साक्री, चोपडा, यावल, भुसावळ व जामनेर भागांत झाले. पुढील आठवड्यात आवक काहीशी कमी होऊ शकते, असा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com