Agriculture news in marathi Onion prices in Khandesh begin to decline | Agrowon

खानदेशात लाल कांद्याची आवक वाढली

टीम ॲग्रोवन
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

जळगाव : खानदेशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक या आठवड्यात वाढली आहे. दर हळूहळू कमी होत असून, ते प्रतिक्विंटल २००० ते ४५०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. 

कांद्याची आवक मागील महिन्याच्या सुरुवातीपर्यंत कमी होती. परंतु, १५ डिसेंबरनंतर धुळे, साक्री (जि. धुळे), पिंपळनेर (ता. साक्री), अडावद (ता. चोपडा), जळगाव, चाळीसगाव येथील बाजारात कांद्याची आवक वाढू लागली. जळगाव येथील बाजारात मागील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी ११०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली.

जळगाव : खानदेशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक या आठवड्यात वाढली आहे. दर हळूहळू कमी होत असून, ते प्रतिक्विंटल २००० ते ४५०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. 

कांद्याची आवक मागील महिन्याच्या सुरुवातीपर्यंत कमी होती. परंतु, १५ डिसेंबरनंतर धुळे, साक्री (जि. धुळे), पिंपळनेर (ता. साक्री), अडावद (ता. चोपडा), जळगाव, चाळीसगाव येथील बाजारात कांद्याची आवक वाढू लागली. जळगाव येथील बाजारात मागील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी ११०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली.

डिसेंबरच्या सुरुवातीला ही आवक प्रतिदिन सरासरी ६०० क्विंटलपर्यंत होती. आवक फक्त जळगाव, भुसावळ, चोपडा भागांतून होत होती. परंतु, नंतर आवक वाढू लागली. अडावद, यावल तालुक्‍यांतील किनगाव येथील बाजारातही आवक वाढली आहे. धुळे येथे या आठवड्यात प्रतिदिन सरासरी १२०० क्विंटलपर्यंत आवक झाली आहे. 
जळगाव येथील बाजारात प्रतिदिन सरासरी १४०० क्विंटल आवक झाली आहे. सध्या आवक जळगाव, चोपडा, यावल, भुसावळ, जामनेर, पाचोरा, औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड, जालना आदी भागांतून होत असल्याचे सांगण्यात आले.

कांद्याला जळगाव बाजार समितीत प्रतिक्विंटल २००० ते ४५०० रुपयांपर्यंतचे दर आहेत. असेच दर अडावद, धुळे व पिंपळनेर भागांत आहेत. दर्जेदार कांद्याची आवक सध्या होत आहे. 

काही शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवली होती. परंतु, दर कमी होत असल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. काढणी सर्वत्र आटोपली आहे. सर्वाधिक उत्पादन साक्री, चोपडा, यावल, भुसावळ व जामनेर भागांत झाले. पुढील आठवड्यात आवक काहीशी कमी होऊ शकते, असा अंदाज आहे.


इतर बाजारभाव बातम्या
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व...
कोल्हापुरात गवार, घेवड्याच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव, दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली, दरात...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते...परभणी ः  येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ३०० ते ३५००...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
जळगावात गवार १८०० ते ३८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
कोल्हापुरात गवार दहा किलोस २०० ते ५००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरला ज्वारीच्या आवकेत वाढनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
फ्लॉवर, गाजर, भेंडी, कोबी, वांग्याच्या...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
डाळिंबाची आवक घटली, मागणी नसल्याने दरही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुण्यात हिरवी मिरची, मटारच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची १६०० ते २०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी २५०० ते ३००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...