नगर बाजार समितीत कांद्याचे दर टिकून

नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर गेल्या पंधरा दिवसांपासून कायम आहेत. नगरसह जिल्हाभरातील बाजार समितीत कांद्याला २०० रुपयांपासून २२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. पंधरा दिवसांपूर्वी दरात वाढ झाली होती. त्यानंतर हे दर टिकून आहेत.
Onion prices maintained in the Nagar market committee
Onion prices maintained in the Nagar market committee

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर गेल्या पंधरा दिवसांपासून कायम आहेत. नगरसह जिल्हाभरातील बाजार समितीत कांद्याला २०० रुपयांपासून २२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. पंधरा दिवसांपूर्वी दरात वाढ झाली होती. त्यानंतर हे दर टिकून आहेत.

नगर जिल्ह्यामध्ये कांद्यांचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. गेल्यावर्षी कांद्याचे क्षेत्र एक लाख चाळीस हजारांपर्यंत गेले होते. डिसेंबरपर्यंत कांद्याचे दर टिकून होते. मात्र, नंतर लॉकडाऊनमुळे कांद्याची मागणी कमी झाली आणि दर खाली आहे. त्यानंतर सहा महिने दर कमीच होते. आता गेल्या पंधरा दिवसांपासून दरात काहीशी वाढ झाली आहे.

तेंव्हापासून कांद्यांचे दर टिकून आहेत. नगरसह पारनेर, राहाता, राहुरी, घोडेगाव (नेवासा) संगमनेर, कोपरगाव बाजार समितीत कांद्याला २०० ते दोन २२०० पर्यंत प्रतिक्विंटलला दर मिळत आहेत. नगर बाजार समितीत दर दिवसाला साधारण पन्नास हजार गोण्याची आवक होत आहे, असे बाजार समितीतून सागण्यात आले. दरम्यान यंदाही लेट खरीप कांद्याची जोरदार लागवड सुरू आहे.

प्रतिक्विंटल कांद्याचे दर
एक नंबर कांदा १५०० ते २२००
दोन नंबर कांदा ९०० ते १५००
तीन नंबर कांदा ५०० ते ९००
चार नंबर कांदा २०० ते ५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com