सोलापुरात कांद्याचे दर टिकून

सोलापुरात कांद्याचे दर टिकून
सोलापुरात कांद्याचे दर टिकून

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याचे दर टिकून होते, कांद्याची आवक तुलनेने कमीच राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १८०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज १० ते २० क्विंटल राहिली. त्यात सप्ताहात एक-दोनवेळा वाढ झाली. पण संपूर्ण सप्ताहात कांद्याची दर आणि आवक टिकून होती. कांद्याची आवक स्थानिक भागातूनच होती. बाहेरील आवक तुलनेने कमीच राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा मिळाला. या आधीच्या दोन सप्ताहापासून कांद्याच्या दराची हीच स्थिती टिकून होती. ती पुन्हा कायम राहिली. त्याशिवाय हिरवी मिरची, ढोबळी मिरची यांच्या दरातही काहीसा चढ-उतार तसाच राहिला. त्यांची आवकही तुलनेने कमीच राहिली.

हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १००० ते २००० रुपये आणि ढोबळी मिरचीला ५०० ते १२०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय गवार, भेंडी, दोडक्याची आवकही तुलनेने कमीच होती. प्रत्येकी १० ते ३० क्विंटलपर्यंत राहिली. गवारला प्रतिदहा किलोसाठी २०० ते ४०० रुपये, भेंडीला १५० ते २५० रुपये, दोडक्याला २०० ते २५० रुपये असा दर मिळाला. बटाट्याची आवक या सप्ताहात कमीच राहिली. बटाट्याचे दरही टिकून होते. बटाट्याला प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा दर मिळाला.  

भाजीपाल्याच्या बाजारात पुन्हा भाज्यांमध्ये काहीसे तेजीचे वातावरण राहिले. भाज्यांची आवक रोज प्रत्येकी ८ ते १० हजार पेंढ्यापर्यंत झाली. त्यातही मेथी, शेपूचे दर वाढले. मेथीला प्रतिशंभर पेंढ्यासाठी ४०० ते ८०० रुपये, शेपूला ३०० ते ६०० रुपये आणि कोथिंबिरीला ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com