नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
बाजारभाव बातम्या
खानदेशात कांदा दर स्थिर
जळगाव ः खानदेशात मागील महिनाभरापासून कांदा दर स्थिर आहेत. दर प्रतिक्विंटल १२०० ते २२०० रुपये, असे आहेत.
जळगाव ः खानदेशात मागील महिनाभरापासून कांदा दर स्थिर आहेत. दर प्रतिक्विंटल १२०० ते २२०० रुपये, असे आहेत. परंतु आवक अल्प असल्याने शेतकऱ्यांना या दरांचा लाभ होत नसल्याची स्थिती आहे.
कांदा काढणी खानदेशात अद्याप सुरू झालेली नाही. आगाप लागवडीच्या उन्हाळ कांद्याची काढणी मार्चअखेर सुरू होईल. तसेच एप्रिलच्या मध्यात काढणीला वेग येईल. अर्थातच सध्या शेतकऱ्यांकडे कांदा नाही. यामुळे बाजारातील आवक अल्प आहे. कांद्यासाठी खानदेशात प्रसिद्ध असलेल्या पिंपळनेर (ता.साक्री, जि.धुळे), धुळे, जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल), अडावद (ता. चोपडा), चाळीसगाव, जळगाव येथील बाजारातही आवक कमी आहे.
जळगाव जिल्ह्यातील किनगाव, अडावद येथील बाजारात कुठलीही आवक सध्या सुरू नाही. तर जळगाव येथील बाजारात या आठवड्यात प्रतिदिन ३०० क्विंटल एवढी आवक झाली. ही आवक काही व्यापारी, मध्य प्रदेशातून झाली. या कांद्याला प्रतिक्विंटल १२०० ते २२०० रुपये, असा दर मिळाला. कांद्याचे दर गेल्या २५ ते ३० दिवसांपासून स्थिर आहेत. पुढे आणखी २० दिवस दर स्थिर राहतील, असा अंदाज आहे.
आवक निम्म्याने कमी
पिंपळनेर व धुळे येथेही या आठवड्यात प्रतिदिन सरासरी मिळून एक हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांद्याचीच आवक होत आहे. पांढऱ्या कांद्याची कुठलीही आवक सध्या नाही. आवक डिसेंबर महिन्याच्या तुलनेत निम्म्याने कमी झाली आहे. डिसेंबरमध्येही जळगाव बाजार समितीत प्रतिदिन ७०० क्विंटल एवढी लाल कांद्याची आवक झाली होती. आवक कमी असल्याने किरकोळ बाजारात कांद्याचे दर ४० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत. दर पुढेही स्थिर राहतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
- 1 of 70
- ››