Agriculture news in marathi Onion prices in the state range from Rs. 100 to Rs. 1000 | Agrowon

राज्यात कांद्याला १०० ते १००० रूपये दर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 31 जुलै 2020

सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातकांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १००० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापुरात कांद्याला सर्वाधिक १००० रुपये दर

सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून कांद्याची आवक आणि दर काहिसे स्थिर आहेत. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १००० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर बाजार समितीत कांद्याचे लिलाव सोमवार आणि गुरुवार असे आठवड्यात दोनदाच होतात. त्यात गेल्या पंधरवड्यापासून सोलापुरात लॅाकडाऊन जाहीर करण्यात आले. कांद्यांचे लिलाव होऊ शकलेले नाहीत. परिणामी, बाजार बंद आहेत. येत्या ३ गस्टला आता कांद्याचे लिलाव सुरु होणार आहेत. पण, गेल्या काही दिवसांत कांद्यांची आवक आणि दराचा विचार करता कांद्याचे दर काहिसे स्थिरच आहेत. 

कांद्याची आवक जिल्ह्याच्या तुलनेत बाहेरुनच जास्त झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ४०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळला. या पंधरवड्याच्या आधीही आवक प्रतिदिन ३० ते ५० गाड्यापर्यंत राहिली. तर, दर प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक ९५० रुपये असा दर राहिला. किरकोळ ५० ते १०० रुपयांचा फरक वगळता दर काहिसे स्थिर राहिले.

नगरमध्ये १०० ते ९०० रूपये दर 

नगर  ः नगर बाजार समितीत गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचे दर स्थिर आहेत. गुरुवारी (ता.३०) बाजार समितीत ३० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.  १०० ते ९०० रूपये प्रतीक्विंटल दर मिळाला. 

जिल्ह्यामधील घोडेगाव, पारनेर, कोपरगाव, श्रीरामपूर बाजार समितीतही कांदा २०० ते १ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत आहे. नगर बाजार समितीत कांद्यांची सर्वाधिक आवक होत असते. गेल्या दोन महिन्यांपासून कांद्यांचे दर स्थिर आहेत. गुरुवारी बाजार समितीत ३० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. एक नंबरच्या कांद्याला ६०० ते ९००, दोन नंबरच्या कांद्याला ५०० ते ७००, तीन नंबरच्या कांद्याला ३०० ते ५००, तर चार नंबरच्या कांद्याला १०० ते २०० रुपयांचा दर मिळाला. 

सोमवारी (ता.२७) ३४ हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन १०० ते ९०० रुपयांचा दर मिळाला. शनिवारी (ता. २५) २३ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. दर प्रतिक्विंटल १०० ते ९२५ रुपये मिळाला. गुरुवारी (ता.२३) ३५ हजार क्विंटलची आवक होऊन १०० ते ९०० रुपयाचा दर मिळला. सोमवारी (२०) २९ हजार क्विंटलची आवक झाली. तर, १०० ते ९०० रुपयांचा दर मिळाला. जिल्ह्यातील घोडेगाव, पारनेर, कोपरगाव, श्रीरामपूर बाजार समितीतही कांद्याचे लिलाव सुरु आहेत. तेथेही २०० ते १ हजार रुपयापर्यंत प्रती क्विंटल आहे.

औरंगाबादमध्ये ४०० ते ७०० रुपये 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.३०) कांद्यांची १७७७ क्विंटल आवक झाली. त्यांना ४०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २३ जुलै रोजी ५ क्विंटल आवक झाली. त्यावेळी कांद्यांना २५० ते ७०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. २५ जुलैला कांद्यांची आवक ६९४ क्विंटल, तर दर २०० ते ६५० रुपये प्रति क्‍विंटल राहिला. २६ जुलैला १३७७ क्विंटल आवक झालेल्या कांद्यांना २०० ते ७०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. २७ जुलैला १०७७ क्विंटल आवक झाली. त्यावेळी कांद्याचे दर ३०० ते ६५० रुपये प्रति क्‍विंटल राहिले. 

२८ जुलै रोजी ५५५ क्विंटल आवक झालेल्या कांद्यांचे दर ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. तर, २९ जुलैला १०२० क्विंटल आवक झालेल्या कांद्यांना २५० ते ७०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

नागपुरात आठशे ते हजार रुपये

नागपूर  : स्थानिक कळमना बाजार समितीत गेल्या महिनाभरापासून पांढऱ्या आणि लाल कांद्यांची आवक स्थिर आहे. लाल कांद्याला गेल्या आठवड्यात आठशे ते हजार रुपये असा दर होता.

बाजार समितीत सरासरी एक हजार क्विंटल कांदा आवक होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.  बुधवारी (ता. २९) लाल कांद्यांचे दर सातशे ते एक हजार रुपयांवर पोहोचले. त्यामुळे दरातही मोठे चढ-उतार होत नसल्याचे सांगण्यात आले.

पांढऱ्या कांद्याचे दर गेल्या आठवड्यात बाराशे ते सोळाशे रुपये असे होते.परिणामी, पांढरा कांदा दरही स्थिर आहेत. बुधवारी (ता. २९)  पांढऱ्या कांद्याला तेराशे ते सतराशे असा दर मिळाला. 

किरकोळ बाजारात कांद्यांची विक्री २५ ते ३० रुपये किलो प्रमाणे होत असल्याचे सांगण्यात आले. आंतरजिल्हा बंदीमुळे मध्य प्रदेशातील कांदा आवक मंदावल्याची माहिती देण्यात 
आली.

लासलगावात ३०० ते ९९१ रुपये दर

नाशिक  : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहापासून उन्हाळ कांद्याची आवक कमी जास्त होत आहे. त्यानुसार दरातही चढ उतार होत आहे.

जुलै महिन्यात गुरुवार(ता.३०) अखेर ३,९३,८८९ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. त्यानुसार त्यास किमान ३०० कमाल ९९१, तर सरासरी दर ७३१ रुपये मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

गुरूवारी (ता.३०) कांद्यांची आवक १३,५०० क्विंटल झाली. त्यास ४०० ते ९३०, तर सरासरी ७१५ रुपये दर मिळाला. बुधवारी (ता.२९) कांद्यांची आवक २२३१४ क्विंटल झाली. त्यावेळी ३०० ते ८९१, तर सरासरी ७०० रुपये दर मिळाला. मंगळवारी (ता.२८) कांद्याची आवक २५,५०६ क्विंटल झाली. त्यास ४०१ ते ९२१ दर मिळाला. सर्वसाधारण दर ७३० रुपये होता.

परभणीत ३५० ते ७५० रूपये दर

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.३०) कांद्यांची ४०० क्विंटल आवक झाली. कांद्यांचे दर प्रतिक्विंटल ३५० ते ७५० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या स्थानिक परिसरातून कांद्यांची आवक येत 
आहे. 

गेल्या महिनाभरातील ४०० ते १००० क्विंटल कांद्यांची आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटलला सरासरी ३५० ते ८०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.३०) कांद्यांची ४०० क्विंटल आवक झाली. त्यावेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ३५० ते ७५० रुपये होते. तर, किरकोळ विक्री १० ते १५ रुपये प्रतिकिलो दराने सुरु होती, असे व्यापारी सय्यद साजीद यांनी सांगितले.

कोल्हापुरात प्रतिक्विंटलला ३०० ते १ हजार रूपये दर

कोल्हापूर : येथील बाजार समितीत कांद्यांची दररोज १२ ते १३ हजार पोती आवक होत आहे. कांद्यांना दहा किलोस ३० ते १०० रुपये इतका दर मिळत आहे. गेल्या सप्ताहात लॉकडाऊनमुळे कांदा बाजारासह पूर्ण बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याने कांद्यांची आवक झाली नाही. यामुळे कांदा बाजार ठप्प होता.

सोमवार (ता.२७) पासून कांद्यांच्या आवकेस पुन्हा सुरुवात झाली. बाजार सुरू झाला असला तरी कांद्यांचे दर स्थिर आहेत, असे कांदा-बटाटा विभागातील व्यापारी सूत्रांनी सांगितले. बऱ्याच ठिकाणी पूर्ण लॉकडाऊन न उठल्याने कांद्याची मागणी गरजेनुसारच करत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

जळगावात ३०० ते ६०० रुपये दर

जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.३०) लाल कांद्यांची ८०० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये मिळाला. आवक कमी झाली आहे. परंतु, दरांत फारशी सुधारणा न झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आवक जळगाव, यावल, भुसावळ आदी भागातून होत आहे. दर मागील दोन-तीन महिन्यांपासून कमीच असल्याची माहिती मिळाली.

आवक, दर (प्रतिक्विंटल, रुपये)

तारीख आवक  किमान दर   कमाल दर
३० जुलै ८०० ३०० ६००
२३ जुलै   १४०० २५०  ५५०
१६ जुलै  १६८०   २५० ५००
९ जुलै १८००  २६०  ५२०

 


इतर बाजारभाव बातम्या
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २५०० ते ४००० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात ढोबळी मिरची, टोमॅटो दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरचीला मागणी...नाशिक : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांदा, बटाट्याच्या दरात सुधारणा,...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत काकडी ६०० ते १२०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात उडीद २५०० ते ८००० रूपयेनगरमध्ये ४५०० ते ५५०० रूपये नगर  : नगर...
नाशिकमध्ये कारले १००० ते २६६७ रूपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.८...
जळगावात आले ३५०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर बाजार समितीत कांद्याचे दर टिकूननगर ः नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर गेल्या पंधरा...