Agriculture news in Marathi Onion prices survive in Nashik | Agrowon

नाशिकमध्ये कांदा दर टिकून

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

पूर्वमोसमी पावसाच्या स्थितीमुळे साठवणूक करून शिल्लक राहिलेल्या कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. आवकेचा दबाव कायम असताना देशात मागणी दर टिकून असल्याचे दिसून आले.

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्या सोमवार (ता. ३) पासून सुरळीत सुरू झाल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कामकाजातील अस्थिरतेमुळे आवक मोठ्या प्रमाणावर झाली. पूर्वमोसमी पावसाच्या स्थितीमुळे साठवणूक करून शिल्लक राहिलेल्या कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. आवकेचा दबाव कायम असताना देशावर मागणी दर टिकून असल्याचे दिसून आले. मात्र मिळणारा दर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाला फक्त शिवणारा असल्याने अपेक्षित परतावा उत्पादकांच्या पदरी नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांचे कामकाज गत महिन्यात सरासरी १० दिवस बंद राहिले. दरम्यान, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याला मागणी असल्याने पुरवठा सुरू राहिला. मात्र आता व्यापाऱ्यांकडील संपुष्टात आलेला साठा व देशात मागणी वाढती असल्याने व्यापारी खरेदीला पसंती देत आहेत. त्यामुळे दर स्थिर असल्याची स्थिती आहे.गत एप्रिल महिन्यात बाजारात होणाऱ्या लेट खरीप कांद्याची सध्या आवक मंदावली आहे. तर उन्हाळ कांद्याची आवक वाढती असल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांना कांदा साठवणूक व कांदा उपलब्धतेचा अंदाज असल्याने खरेदी करून कोटा पूर्ण करण्याची त्यांची लगबग आहे.

टप्प्याटप्प्याने विक्री ठरणार फायद्याची
चालू वर्षी व्यापाऱ्यांच्या तुलनेत गावातच तर बाजार आवारातही शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी सुरू आहे. त्यामुळे कांदा उत्पादनात तूट असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकरी उत्पादकतेत घट, बियाण्यांत फसवणूक, गारपीट व पूर्वमोसमी पाऊस अशी अनेक कारणे त्यामागे आहे. त्यामुळे साठवणूक पश्‍चात उरलेला व साठवलेला कांदा शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने योग्य प्रतवारी करून विक्री केल्यास तुलनेने चांगले दर मिळण्यास मदत होईल. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक गरज तपासून टप्प्याटप्प्याने विक्री नियोजन करावे, असा सल्ला अभ्यासकांचा आहे.

शेतकरी कांदा साठवणूक करत असल्याने उरलेला माल विक्रीसाठी आणत आहेत.त्यातच जास्त दिवस बाजार बंद असल्याने खरेदी केलेला खळ्यांवरील कांदा संपला आहे. देशावर बिहार, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, आसाम, हरियाना, दिल्ली व पंजाब येथे मागणी आहे. सध्या रॅक भरत असल्याने खरेदी सुरू असल्याने दर स्थिर आहेत.
- मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव, जि. नाशिक

मागणी असल्याने बाजारभाव स्थिर दिसून आला. फार मोठी चढ-उतार नाही. सरासरी आवकेच्या तुलनेत वाढ दिसून आली. शेतकरी साठवणूक करून शिल्लक असलेला माल विक्रीसाठी आणत आहेत.
- नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...