Agriculture News in Marathi Onion prices to the town The ups and downs continue | Page 2 ||| Agrowon

नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यात क्रमांक एकचा कांदा दोन हजार रुपयांनी विकला गेला. तोच कांदा आता शनिवारी एक हजार आठशे रुपयांनी विकला गेला.

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यात क्रमांक एकचा कांदा दोन हजार रुपयांनी विकला गेला. तोच कांदा आता शनिवारी एक हजार आठशे रुपयांनी विकला गेला. कांद्याची आवक कमी असली तरी दरातही पडझड सुरूच आहे. 

नगर येथील बाजार समितीसह पारनेर, घोडेगाव, राहाता, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले बाजार समितीतही कमीजास्त प्रमाणात कांद्याचे लिलाव होत असतात. गेल्या आठवड्यात पावसाने दडी मारल्याने परराज्यांतील कांद्याची मागणी थंडावली आहे. तेथील लाल कांदा बाजारात आल्याने आपल्याकडील गावरान कांद्याचे भाव कमी झाले आहेत.

साधारण दहा दिवसांपूर्वी कांद्याचे दर १९०० ते २ हजारांवर होते. मागील आठवड्यात हे दर कमी झाले. सोमवारी (ता. २०) ४२ हजार ९१४ कांदा गोण्याची आवक झाली आणि दरही १८०० रुपयांपर्यंत राहिले. कांद्याचे दर कमी होत आहेत. सतत पडझड सुरू राहिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उन्हाळ्यात काढलेला गावरान कांदा सध्या शेतकरी बाजारात विकीसाठी आणत आहेत. मात्र भाव नसल्याने शेतकरी वर्गात कमालीची नाराजी आहे. या आठवड्यात पाऊस झाल्यास आपल्याकडील गावरान कांद्याचा उठाव होऊन दर वाढतील.

सध्या अन्य राज्यांतही पावसाने उघडीप दिल्याने, त्यांचा लाल कांदा बाजारात विक्रीसाठी आला आहे. त्यामुळे आपल्याकडील गावरान कांद्याची मागणी घटून दर कमी झाल्याचे सांगितले जात आहे.
 


इतर बातम्या
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
जतमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा सांगली : जत तालुक्यात २७ प्रकल्प असून, २५३७.८२...
बटाटा वाणाचे भाव तेजीत मंचर, जि. पुणे : बाजार समितीच्या आवारात मराठवाडा...
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत साडेतीन लाख...नांदेड : जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात पेरणी...
एफआरपीपेक्षा  जादा दर मिळणार?कोल्हापूर : प्रति वर्षीप्रमाणे यंदाही स्वाभिमानी...
नांदेड जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी...नांदेड : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जिरायत, बागायत जमीन विक्रीवरील निर्बंध ...नाशिक : ‘‘शासनाच्या नव्या धोरणानुसार जमीन...
चंदन लागवडीला प्रोत्साहन; अगरबत्ती...मुंबई : चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच...
धुळे : अमरिश पटेल यांचा बिनविरोधसाठी... धुळे : बहुचर्चित धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती...
परभणी जिल्ह्यात कापसाला किमान सात हजार...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील खासगी कापूस...
खानदेशात रब्बीची पेरणी २०० टक्के होणे...जळगाव ः खानदेशात रब्बी पेरणीची तयारी सुरू झाली...
‘महावितरण’ची थकबाकी वसुली अत्यावश्यक :...नाशिक : ‘‘वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज विकत घेऊन...
परराज्यांतील भात रोखा : मंत्री छगन भुजबळ गडचिरोली :  परराज्यांतील भात (धान) चोरट्या...
शिरपूर तालुक्यात आठ बंधाऱ्यांच्या...शिरपूर, जि. धुळे : तालुक्यातील बोरगाव, जातोडा आणि...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...