agriculture news in Marathi onion procurement on less rate Maharashtra | Agrowon

कमी दराने कांदा खरेदी सुरूच 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने सुरू झालेल्या वडांगळी उपबाजार आवारात कांदा लिलावात व्यापाऱ्यांकडून रास्त दराने बोली लागत नसल्याची स्थिती आहे. गत सप्ताहात शेतकऱ्यांनी दर पाडून खरेदीच्या प्रकरणावरून लिलाव बंद पाडले होते.

नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने सुरू झालेल्या वडांगळी उपबाजार आवारात कांदा लिलावात व्यापाऱ्यांकडून रास्त दराने बोली लागत नसल्याची स्थिती आहे. गत सप्ताहात शेतकऱ्यांनी दर पाडून खरेदीच्या प्रकरणावरून लिलाव बंद पाडले होते. यावर व्यवस्थापनाने मध्यस्थी करत असे प्रकार घडणार नाहीत याबाबत आश्वासन दिले होते. मात्र पुन्हा एकदा उपबाजारात व्यापाऱ्यांकडून मनमानी करत कमी दराने खरेदी करण्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे, की वडांगळी (ता.सिन्नर) येथील कांदा उत्पादक शेतकरी माणिकराव खुळे यांनी ९ जून रोजी क्विंटल कांदा वडांगळी उपबाजार आवारात विक्रीसाठी आणला होता. बाजारात आणल्यानंतर व्यापाऱ्यांनी या मालाला प्रतिक्विंटल १,३५५ रुपये अशी बोली लावली. मात्र कांद्याच्या प्रतवारीच्या तुलनेत हा दर रास्त नसल्याने खुळे यांनी माल न देता मार्केटमधून बाहेर पडणे पसंत केले. येथील व्यवहार रद्द केल्यानंतर कांदा विक्रीसाठी त्यांनी लासलगाव गाठले.

येथील बाजार समितीच्या आवारात दुपारच्या सत्रात त्याच वाहनातून माल लिलावासाठी नेला. येथे कांद्याला प्रतिक्विंटल १,६९० रुपयांची बोली लागली. त्यामुळे येथील दरात ३३५ दरात क्विंटलमागे वाढ मिळाली. म्हणजेच वडांगळी येथील उपबाजारातील दराच्या तुलनेत २२ टक्के बोली जास्त लावल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे व्यवस्थापन फक्त घोषणा करत असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याचीच स्थिती आहे. 

शेतकऱ्यांची कुठली गैरसोय होणार नाही याबाबत सभापती लक्ष्मणराव शेळके यांनी याबाबत यापूर्वी स्पष्ट केले होते. मात्र असे असतानाही अजूनही एक आठवडा उलटून गेला नसताना व्यापारी पुन्हा मनमानी सुरू ठेवत असल्याचे समोर आले आहे. बाजार समिती व्यवस्थापनाने वेळीच हस्तक्षेप करून संबंधित व्यापाऱ्यांना योग्य त्या सूचना कराव्यात व शेतकऱ्यांच्या मालाला रास्त दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे. 

प्रतिक्रिया 
शेतकऱ्यांची कृती नजरेत दिसते पण व्यापाऱ्यांची छुपी लूटखेळी नजरेत येत नाही. एकंदरीत शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून गृहीत धरले जात आहे. गावात मार्केट असूनही व्यापारी लॉबीमुळे शेतकऱ्याला ३५ कि. मी. अंतरावर मार्केटला माल नेऊन घालावा लागत आहे. यापेक्षा स्थानिकांच्या दृष्टीने वाईट काय असू शकते. 
-माणिकराव खुळे, कांदा उत्पादक, वडांगळी 


इतर अॅग्रो विशेष
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...