नेप्ती उपबाजारात कांदा प्रश्‍नी आंदोलन

नेप्ती उपबाजारात कांदा प्रश्‍नी आंदोलन
नेप्ती उपबाजारात कांदा प्रश्‍नी आंदोलन

नगर ः गेल्या आठ दिवसांपासून कांद्याला पाच ते सहा हजार रुपयांचा दर आहे. मात्र, कांदे खराब असल्याचे कारण पुढे करून लिलावात कमी दर केल्याच्या कारणामुळे गुरुवारी (ता. ७) नेप्ती उपबाजार समितीत शेतकऱ्यांनी कांदे फेक करून लिलाव बंद पाडले. तसेच नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको केला. या वेळी व्यापाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला. 

नगर जिल्‍ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून कांद्याला चांगला दर मिळत आहे. गेल्या आठवड्यात पारनेर, नगर बाजार समितीत पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. गुरुवारी नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारामध्ये झालेल्या कांद्याच्या लिलावात खराब कांदे असल्याच्या कारणाने लिलावात पाच- सहा हजाराचा दर दोन- तीन हजारांवर आणला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. 

याबाबत माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, राहुल बहिरट आंदोलनात सहभाग घेतला. फेरलिलावाची मागणी करत चांगल्या कांद्याला योग्य दर देण्याची मागणी केली. प्रशासनाने ते मान्य केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. सभापती विलास शिंदे, उपसभापती रेवण चोभे यांनी शेतकऱ्यांची समजूत घातल्यावर लिलाव सुरळीत सुरू झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com