agriculture news in Marathi, Onion producers says, we have done our planning, Maharashtra | Agrowon

कांदा उत्पादक म्हणतात ‘आमचं ठरलंय...’
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

चालू हंगामात प्रतिकूल परिस्थितीत कांदा उत्पादन घेतले. आवक शेतकऱ्यांनी कांदा विकला आहे, ज्यांच्याकडे माल शिल्लक आहे, त्यानुसार आम्ही कांदा विकणार. कांदा शिल्लक राहिलेला नाही, त्यामुळे भाव वाढतील, अशी अपेक्षा आहे. 
-विजय पगार, कांदा उत्पादक शेतकरी, कळवण

नाशिक : केंद्र सरकारच्या निर्बंधांनंतर ‘आम्ही आमचं नियोजन केलंय’ अशा भूमिकेतून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ‘असहकार’ कायम ठेवला आहे. कांदा उपलब्धता कमी असल्याने तो एकदम बाजारात न आणता, आवश्‍यकतेनुसार विकण्याचेच धोरण शेतकऱ्यांनी राबविले आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांतील सध्या आवकेवरून हे स्पष्ट होते. यामुळे केंद्र सरकारच्या अपेक्षित दर घसरणीलाही बऱ्याच अंशी ‘ब्रेक’ लागला आहे.

अगोदरच पाणीटंचाईमुळे कांदा उत्पादनात घट झाली. त्यात साठवलेला कांदा पावसामुळे ओला झाल्याने तसेच हवेत आर्द्रता अधिक असल्याने खराब होत आहे. एकंदरीत कांद्याची टिकवण क्षमता व साठवणूक कालावधी संपत येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बाजारभावाचा अंदाज घेऊनच विक्री करत असल्याचे दिसून येत आहे.

केंद्र शासनाने कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी निर्णय घेऊन अनेक प्रयत्न केले. त्यात काही अंशी दरही घसरले.  याच कारणाने आता आवक मोठ्या प्रमाणावर मंदावल्याने कांदा पुरवठा करताना सरकारलाही अडचणी येत आहेत. मात्र अशा परिस्थितीत प्रामुख्याने शेतकऱ्याची कोंडी करण्याचा प्रयत्न झाले. मात्र आता आवक घटल्याने व्यापारी व सरकारची कोंडी होणार, हे नक्की आहे. 

कांदा उत्पादक पट्ट्यातील माल अंतिम टप्प्यात 
कळवण, देवळा, बागलाण या प्रमुख उन्हाळ कांदा उत्पादक पट्ट्यात माल कमी प्रमाणावर शिल्लक राहिला आहे. या भागातील मोठी साठवणूक क्षमता असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे कांदा संपत आला आहे. त्यात कांद्याच्या प्रतवारीनुसार चांगला कांदा थोड्याच प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे अजूनही नवीन कांदा बाजारात येत नसल्याने भाव टिकून कसे राहतील या अनुषंगाने शेतकऱ्यांचे नियोजन सुरू आहे. जर आमच्या मालाला भाव नसेल तर आम्ही टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करणार आहोत असे कळवण तालुक्यातील भादवण येथील कांदा उत्पादक शेतकरी आकाश जाधव यांनी सांगितले.

प्रतिक्रिया
मागील वर्षीच्या तुलनेत ७० % पेक्षा अधिक कांदा या दिवसांमध्ये विकला गेला आहे. वातावरण पोषण असल्याने कांदा साठवणूक झाली. उत्पादन जरी चांगले होते, मात्र आता वातावरणामुळे कांदा सडत आहे. त्यात सरकारने निर्यात बंदीसारखा निर्णय घेतल्याने बाजारभाव कोसळले आहेत. आता चांगल्या बाजारभावाचा अंदाज आणि बाजारातील आवक लक्षात घेऊन उर्वरित मालाची विक्री करणार आहे. 
- प्रवीण आहिरे, कांदा उत्पादक शेतकरी, लोहोणेर, ता. देवळा

 

इतर अॅग्रो विशेष
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...