agriculture news in Marathi, Onion rate fall behind hearsay, Maharashtra | Agrowon

बाजारात अफवा पसरवून कांदादर पाडण्याचा प्रकार

ज्ञानेश उगले
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

सद्यःस्थिती पाहता कांद्यावरील ‘एमईपी'चा कोणताही निर्णय सरकार घेईल याची शक्‍यता वाटत नाही. उन्हाळ कांदा व लाल कांद्याच्या उपलब्धतेबाबत कोणतीच अडचण नाही. येत्या काळात दर स्थिर राहतील, अशी स्थिती आहे. तरी येत्या काळात शेतकऱ्यांनी घाई न करता टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणणे योग्य राहील.
- नानासाहेब पाटील, संचालक- नाफेड.
 

नाशिक : दसऱ्यानंतर कांदा बाजारात क्विंटलला चार हजारापर्यंतचा दर गेल्याने आवक मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी परराज्यांतील बाजारपेठेतील नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कांदा पाठविण्यात आला. कर्नाटकातील बंगळूर, हुबळी, बेळगाव या महत्त्वाच्या बाजारांतही मागील तीन दिवसांपासून १६०० ट्रक माल अद्याप थोपवून राहिला. या मालाचा निपटारा हळूहळू होत आहे. या स्थितीचा परिणाम दरावर झाला. व्यापारी व शेतकरी या दोन्ही घटकांनी सावध भूमिका घेतली असून, मागील दोन दिवसांत कांद्याची आवक घटली आहे. त्यातच सरकारकडून ‘एमईपी’ लावण्याच्या हालचाली सुरू असल्याची अफवा पसरवून दर पाडण्याचे प्रकार घडत आहेत. 

दोन दिवसांसाठी चार ते पाच हजारांपर्यंत गेलेले दर क्विंटलला दोन हजारांवर स्थिरावले आहेत. लासलगाव, पिंपळगाव बसवंत यासह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यात कांद्याला सोमवारी (ता.२२) ५०० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाले. हा दर राहील, असे जाणकारांनी सांगितले.

दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन लाल कांद्याच्या लिलावाचा शुभारंभ करताना काही बाजारात कांद्याला पाच हजार रुपयांपर्यंतचा उच्चांकी दर मिळाला. ही भाववाढ कृत्रिमरित्या केल्याचे आता समोर आले आहे. मात्र, त्याचा मोठाच फटका बाजाराला बसला. लाल कांद्याच्या स्वागतासाठी पहिल्या लिलावाला अचानक क्विंटलला पाच हजारांपर्यंत दर वाढविण्यात आले. काही व्यापाऱ्यांचे हे प्रयोग मात्र त्यांच्याच अंगाशी आल्याचे बोलले 
दसऱ्याच्या लिलावात दर वाढल्यानंतर पुढील काही दिवस देशभरातील माध्यमांमधून कांद्याचे दर वाढल्याच्या चर्चांना ऊत आला.

गुरुवार (ता.१८) नंतर पुढील तीन दिवस बाजार समित्यातील कांद्याच्या आवकेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याचा परिणाम दरावर होऊन सरासरी दरात ३०० ते ४०० रुपयांनी उतरण झाली. लाल कांद्याचा तुटवडा असून येत्या काळात त्याला चांगली दरवाढ मिळेल या कयासाने कांदा खरेदी केलेले कांदा व्यापारी मात्र दर उतरल्याने पुन्हा अडचणीत आले. परिणामी बाजारातील दर प्रतिक्विंटलला चार हजारांवरून दोन हजारांवर स्थिरावले. येत्या काळात ते स्थिर राहतील असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

‘एमईपी'ची अफवा
सरकारकडून ‘एमईपी' लावण्याच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी चर्चा शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये दबक्‍या आवाजात सुरू होती. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे जाणकारांनी स्पष्ट केले. 
 


इतर अॅग्रो विशेष
दक्षिण कर्नाटक, तामिळनाडूत मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज (ता....
कोकणात पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रात आलेल्या ‘निसर्ग’...
रविवारपर्यंत मॉन्सूनची आणखी चाल शक्य पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरूवारी...
हमीभाव मिळवून देण्यात केंद्र सरकार...पुणे: केंद्र सरकार गाजावाजा करून हमीभाव जाहीर करत...
शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बियाणे अनुदान...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बियाणे...
साखर कारखान्यांनी लॉकडाउनमध्ये जमा केली...पुणे: लॉकडाउनमधील विविध अडचणींना तोंड देत...
माझा शेतकरी, माझा अभिमान ! ७ ते १३ जून...पुणे : कोरोनाच्या कठिणकाळात जनता घरबंद असताना...
कृषी उन्नती योजनेत ६६ टक्के कपातपुणे: कृषी उन्नती योजना राबविण्यासाठी केंद्र...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
दर्जेदार हळद पावडरीचा शिनगारे यांचा...परभणी जिल्ह्यातील वालूर सारख्या ग्रामीण भागात...
शेतकरी संघटना शुक्रवारी करणार ...नागपूर ः एचटीबिटीला मान्यता मिळावी या मागणीसाठी...
विधानपरिषदेच्या ८ सदस्यांची मुदत समाप्तमुंबई: विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त ८...
चक्रीवादळाच्या तडाख्यात मधूमका भुईसपाटनाशिक: नाशिक, सिन्नर व इगतपुरी तालुक्यांमध्ये १...
सातत्य, चिकाटी, प्रयत्नांतून...कोणताही व्यवसाय यशस्वी करायचा तर सातत्य आणि...
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...