नगर जिल्ह्यामध्ये कांद्याला तीन हजारांपर्यंत दर

नगर जिल्ह्यामध्ये कांद्याला तीन हजारांपर्यंत दर
नगर जिल्ह्यामध्ये कांद्याला तीन हजारांपर्यंत दर

नगर ः राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरातमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कमी-अधिक पावसाचा फटका बसला आहे. परिणामी, बाजारपेठेतील आवक कमालीची घटल्याने कांदा आणखी भाव खाण्याची चिन्हे आहेत. सध्या जुन्या कांद्यालाही तीन हजार रुपयांपर्यंत भाव आला आहे. मात्र चाळीतही कांदा नसल्याने या भाववाढीचा फायदा हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्याच शेतकऱ्यांना होत आहे. 

नाशिकमध्ये सर्वाधिक कांदालागवड होते; परंतु तेथे अतिवृष्टीने हे पीक धुऊन नेले. बहुतांश भागात पावसाअभावी नवीन कांदालागवड होऊ शकली नाही. बाजारात सध्या लाल कांदा उपलब्ध होत नसल्याने, चाळींत साठविलेल्या गावरान कांद्याला प्रतिकिलो २५ ते २८ रुपये भाव मिळत आहे. दसरा- दिवाळीदरम्यान जुना गावरान कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणील, असे बाजारातील जाणकार कांदा व्यापारी सांगतात. हा कांदा महिनाभरात ४० रुपयांवर जाण्याची शक्‍यता आहे. नगर जिल्ह्यात २२ टक्के क्षेत्रावर लाल किंवा गावरान कांद्याची लागवड होते. मात्र पावसाअभावी लागवडी खोळंबल्या. नगर, पाथर्डी, पारनेर, श्रीगोंदे, बीड, जामखेड, मराठवाडा हद्दीवरील गावांमध्ये जुना कांदा संपत आल्याने नेप्ती उपबाजारातील आवक घटली आहे.

उसापेक्षा कांद्याकडे कल  जिल्ह्यातील दक्षिण, उत्तर भागात व पूर्वेकडील काही भागांत धरणांचे कालवे आहेत. या पट्ट्यात बहुतांश शेतकरी बारमाही ऊसपीक घेतात. गेल्या वर्षीपासून या शेतकऱ्यांनी उसाऐवजी कांद्याच्या पिकाला महत्त्व दिले आहे. कांद्यामुळे झटपट आर्थिक फायदा होत असल्याचे शेतकरी सांगतात. शेतकरी कांद्याकडे वळाल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळितावरही विपरीत परिणाम होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com