कांदा दर गडगडले; आवकही साधारण

चालू सप्ताहात कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. शनिवारी (ता. ५) उन्हाळ कांद्याचे दर १४०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
कांदा दर गडगडले; आवकही साधारण
कांदा दर गडगडले; आवकही साधारण

नाशिक : साठवणूक केलेला उन्हाळ कांदा सध्या विक्रीसाठी शेवटच्या टप्प्यात आहे. तर खरीप हंगामातील लाल कांदा विक्रीसाठी बाजारात दाखल होत आहे. सध्या आवक साधारण असतानाही चालू सप्ताहात कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. शनिवारी (ता. ५) उन्हाळ कांद्याचे दर १४०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दरात घसरण होऊनही निर्यात खुली का होत नाही, असा सवाल शेतकरी करत आहेत.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दरात घसरण होऊन उत्पादन खर्चाच्या खाली कांदा विक्री झाली. त्यातच पुढे बाजारपेठ सुरळीत होऊन दर वाढले, मात्र केंद्र सरकारने केलेली निर्यातबंदी, साठवणूक मर्यादा, आयकर विभागाचे छापे यामुळे कामकाज अस्थिर आहे. मात्र नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस काहीअंशी स्थिर असलेल्या बाजारात पुन्हा घसरण झाली आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांत शेतकऱ्यांना परत फटका सहन करावा लागत आहे. 

लासलगाव बाजार समितीत डिसेंबरच्या सुरुवातीपासून दरात काही अंशी वाढ झाल्यानंतर दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आवकेत वाढ झाली असली तरी सरासरी अवकेच्या तुलनेत ती अत्यंत कमी आहे. असे असताना दरात घसरण झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आवकेत व दरात चढ-उतार पाहायला मिळाले आहे.  सध्या दक्षिण भारतातील पाऊस, दिल्लीतील आंदोलनामुळे मालाचा पुरवठा मंदावला आहे. मध्य प्रदेश व राजस्थान राज्यात कांद्याची बाजारात उपलब्धता होत असल्याने दरात घसरण आहे. तर दुसरीकडे सध्या उठाव नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. उत्तर भारतात महाराष्ट्रातून कांदा जातो. मात्र सध्या मागणी व पुरवठा साखळी बिघडल्याने किमान बांगलादेश व नेपाळ लगतच्या देशात कांदा निर्यात सुरू करावी, अशी मागणी व्यापारी वर्गाकडूनही होत आहे.  उन्हाळ कांद्याचे दर निम्म्यावर लासलगाव बाजारात गेल्या चार दिवसांत उन्हाळ कांद्याचे दर निम्म्यावर घसरले असून, प्रतिक्विंटल १४०० रुपयांचा दर मिळाला. तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीत नवीन खरीप कांद्याला बरा दर मिळाला. त्यामुळे अधीच नुकसानीचा फटका आणि आता निर्यातबंदीने पुन्हा दरात मारले जात असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.  बाजार समित्यांतील कांद्याचा सरासरी दर (रुपये/प्रतिक्विंटल)  

बाजार समिती २ डिसेंबर ३ डिसेंबर ४ डिसेंबर ५ डिसेंबर
  उन्हाळ/लाल उन्हाळ/लाल उन्हाळ/लाल उन्हाळ/लाल
लासलगाव २८००/३१०० २३५०/२९०० १५५०/२६०० १४००/२५०१
पिंपळगाव बसवंत ३१००/३७०० २४००/२९०० २७५१/२९०१ २२५१/२९००
उमराणे २८८०/३१६० १८८०/२४३० बंद बंद
सिन्नर २७००/२८०० २५००/२५०० १८००/२००० बंद
मनमाड २५००/२७०० २०००/२७५० १४००/२४०० बंद
चांदवड २५००/३५०० १९५०/३५०० १५००/२९००  

प्रतिक्रिया: सरकारचे धोरण ग्राहकांच्याच हिताचे आहे. दरात वाढ झाली तेंव्हा अडचण करून निर्यातबंदी, साठवणूक मर्यादा आणली जाते. आता दरात घसरण आहे. त्यामुळे शेतकाऱ्यांचा विचार करून निर्यातबंदी मागे घ्यावी. दुजाभाव थांबवावा. - संदीप कोकाटे, कांदा उत्पादक, येवला, जि. नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com