कांद्याची आवक मंदावल्याने दरात भरीव सुधारणा

कळवण तालुक्यात २ ते ३ शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. चालू वर्षी १००० क्विंटल कांदा साठवला होता. आता कांदा शिल्लक नाही. फक्त खाण्यापुरता कांदा आहे. - दादासाहेब पाटील, कांदा उत्पादक, पाळे खु, ता. कळवण
Onion rate on high
Onion rate on high

नाशिक/सोलापूर : राज्यात अनेक शेतकऱ्यांनी साठवलेला उन्हाळ कांद्याचा साठा संपुष्टात आला आहे, तर दुसरीकडे खरीप हंगामातील लाल कांद्याची होणारी आवक ९० टक्क्यांनी मंदावली आहे. त्यामुळे कांद्याचे दर वधारले आहेत. कांद्याने नाशिक जिल्ह्यात प्रतिक्विंटल ८६०० रुपयांचा टप्पा गाठला. तर, सोलापुरात प्रतिक्विंटल ९ हजारांवर झेप घेतली आहे.  नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांदा संपुष्टात आला असून, नवीन लाल खरीप कांद्याची आवक दरवर्षीच्या तुलनेत ९० टक्क्यांनी घटल्याचे चित्र बाजार समित्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे आवक घटून नामपूर येथे प्रतिक्विंटल ८६००, तर सर्वसाधारण ८००० रुपयांपर्यंत दर मिळाला. कांद्याची १५ डिसेंबरपर्यंत कांद्याची आवक पूर्ववत होणार नसल्याने दर चढेच राहतील, असे कांदा अभ्यासकांचे मत आहे. तेजीच्या वातावरण उत्पादकांचा उत्साह वाढविणारा असला, तरी साठवणूक केलेला कांदा चाळीबाहेर काढताना वजनात मोठी घट येत आहे. सोलापुरातही नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या दराने उच्चांक कायम ठेवलाच; पण शुक्रवारी (ता. २२) हा उच्चांक आणखीनच वाढला. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक नऊ हजार रुपये इतका दर मिळाला. सोलापूर बाजार समितीमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रतिक्विंटल ५ हजार रुपयांपेक्षा अधिक दर कांद्याला मिळत होता. मात्र, मागील आठवड्यांपासून ७ हजारांपेक्षा अधिक दर होता. शुक्रवारी प्रतिक्विंटल कमाल ९ हजार रुपये, तर सर्वसाधारण ३६०० रुपये प्रतिक्विंटलने कांदा विक्री झाली. तर आवक १४ हजार क्विंटलपर्यंत  राहिली.  प्रतिक्रिया चालू वर्षी बाजारभावाचा अंदाज घेऊन विक्री केली. सरकारने हस्तक्षेप केल्याने मोठे नुकसान झाले. आता भाव आहेत, पण आमच्याकडे कांदा नाही.  - संपत डांगे, कांदा उत्पादक, येसगाव, ता. मालेगाव

उन्हाळ कांद्याची आवक कमी झाली असून, नवीन लाल कांद्याची आवकसुद्धा दरवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे इतर व्यापाऱ्यांकडून कांद्याच्या ऑर्डर असताना माल मागणीनुसार पाठवता येत नाही.  - मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव, ता. निफाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com