Agriculture news in Marathi Onion rates in Lonanda Bazar Committee 11 thousand per quintal | Agrowon

लोणंद बाजार समितीत कांद्याला ११ हजारांचा दर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 डिसेंबर 2019

लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी झालेल्या कांद्याच्या सौद्यात नव्या हळव्या लाल कांद्याचे दर प्रतिक्विंटलला दहा हजार रुपये, तर जुन्या गरव्या कांद्याचे दर अकरा हजार रुपयांपर्यंत तेजीत निघाले. तर १०० ते १३० रुपये प्रति किलोने कांद्याची किरकोळ विक्री केली जात आहे. 

लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी झालेल्या कांद्याच्या सौद्यात नव्या हळव्या लाल कांद्याचे दर प्रतिक्विंटलला दहा हजार रुपये, तर जुन्या गरव्या कांद्याचे दर अकरा हजार रुपयांपर्यंत तेजीत निघाले. तर १०० ते १३० रुपये प्रति किलोने कांद्याची किरकोळ विक्री केली जात आहे. 

लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर वर्षी दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर हळव्या लाल कांद्याचा हंगाम सुरू होतो. मात्र, यावर्षी सर्वत्रच झालेल्या जोरदार पावसामुळे हातातोंडाशी आलेले कांद्याचे पीक वाया गेले आहे. शेतात पाणी साचल्याने तयार होऊ लागलेला व तयार झालेला कांदा शेतातच नासून गेला. रोपेही नासून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातच कांदा पीक सोडले आहे. त्यातून काही वाचलेला कांदा काढून शेतकरी वर्ग सध्या निवडून प्रतवारी करून बाजारात विक्रीसाठी आणत आहेत, तर गरव्या कांद्याच्या लागवडी गेल्या महिनाभरापासून सर्वत्र वेगात सुरू आहेत. 

फलटणच्या पूर्व भागातील दुधेबावी, भाडळे, तसेच माण व खंडाळा तालुक्‍यांतूनही नवीन हळवा लाल कांदा बाजारात विक्रीसाठी येऊ लागला आहे, तसेच जुन्या साठवणुकीच्या गरव्या कांद्याचीही तुरळक आवक होत आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची काहीशी आवक वाढताना दिसत आहे. लोणंद मार्केट यार्डात गुरूवारी झालेल्या कांद्याच्या बाजारात हळव्या कांद्याच्या ७५० पिशव्यांची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी दिली. 

लोणंद बाजारात ऑक्‍टोबर महिन्यापासून कांद्याचे दर तेजीत आहे. गेल्या दोन आठवड्यात तर ७५०० वरून ९१०० रुपयांपर्यंत ही वाढ पोचली. प्रति क्विंटलला उच्चांकी ११ हजार रुपये इतकी भाववाढ झाली आहे.

प्रतवारीनुसार कांद्याचे दर क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे  
हळवा लाल कांदा नंबर एक - सात ते दहा हजार रुपये, हळवा कांदा नंबर दोन - ३,५०० ते सात हजार, हळवा कांदा नंबर तीन - एक हजार ते ३,५००, तर जुना साठवणुकीचा गरवा कांदा पाच ते ११ हजार रुपये. दरम्यान शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून निवडून व चांगला वाळवून बाजारात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...