agriculture news in marathi Onion rates in Nagar district Continuously fluctuating | Agrowon

नगर जिल्ह्यात कांदा दरात सातत्याने चढउतार सुरु

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 मार्च 2021

नगरः जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने कांदा दरात सातत्याने चढउतार सुरु आहे.

नगरः जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने कांदा दरात सातत्याने चढउतार सुरु आहे. शनिवारी (ता. ६) नगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत कांद्याला ५०० ते २४०० रुपयाचा प्रती क्विंटल दर मिळाला. त्याआधी आठ दिवसांपूर्वी हा दर ५०० ते ३३०० रुपयाचा दर होता. आवक कमी-जास्त होत आहे. 

जिल्ह्यात यंदा कांद्याचे क्षेत्र अधिक आहे. रब्बीत लवकर लागवड केलेला कांदा काढणी केला जात आहे. त्यामुळे बाजारात कांदयाची आवक होत आहे. नगरसह शेजारच्या जिल्ह्यातून कांद्याची नगरला आवक होत असल्याने आवकेत सतत कमी जास्त होत आहे. शनिवारी (ता. ६) नगरला २६ हजार ५१४ क्विंटल कांद्याची आवक झाली. त्या दिवशी ५०० ते २४०० व सरासरी दोन हजाराचा दर होता. ४ मार्चला ३०० ते २४०० रुपयाचा दर मिळाला, तर २८ हजार ३१३ क्विंटलची आवक झाली. 

एक मार्चला २१ हजार ६१६ क्विंटलची आवक झाली आणि ५०० ते ३३०० रुपयाचा दर होता. २७ फेब्रुवारीला ३२ हजार ५२२ क्विंटलची आवक होऊन ५०० ते २४०० रुपयाचा दर मिळाला. 

२५ फेब्रुवारीला ५० हजार ३८९ क्विंटलची आवक होऊन ५०० ते३३०० रुपयाचा दर मिळाला. २२ फेब्रुवारीला ३५ हजार ४०२ क्विंटलची आवक होन १००० ते ४५०० रुपयाचा प्रती क्विंटल दर मिळाला. गेल्या पंधरा दिवसात कांदा दरात सातत्याने चढउतार होत आहे असे बाजार समितीतून सांगण्यात आले. राहाता, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, पारनेर बाजार समितीतही असे दर होते.  

 


इतर ताज्या घडामोडी
नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा...नांदेड : जिल्ह्यात किमान हमी दरानुसार सुरू...
व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची...नगर ः व्हर्च्युअल क्लासरूम आणि अॅग्री-दीक्षा वेब...
‘एमआरपी’नुसारच खतांची खरेदी करावी सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर...
खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज...अकोला : अकोला जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ११४०...
सटाणा बाजार समिती आवाराबाहेर अवैध...नाशिक : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही...
नाशिक जिल्ह्यात विहिरींनी गाठला तळ नाशिक : जिल्ह्यात गत मॉन्सूनमध्ये अनेक भागांत...
भोकरखेडात चार वर्षांपासून शेतकरी वीज...वाशीम : शेतात वीज जोडणी घेऊन सिंचन करता येईल....
टेंभू योजनेचे पाणी सोडले; ‘बंदिस्त पाइप...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात टेंभू...
प्रत्येक गावाचा होणार कृषी विस्तार...जालना : कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचे...
तमाशा कलावंतांसाठी सरसावले मदतीचे हात नगर ः : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे टाळेबंदी...
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस सोलापूर ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा...
कांदा बाजारावर ‘कोरोना’चा परिणाम नगर : कोरोना व्हायरसची बाधा वाढत असल्याचा बाजार...
महाराष्ट्राला रेमडिसिव्हिर देण्यास ‘...मुंबई : केंद्र सरकारकडून रेमडिसिव्हिर निर्यातीवर...
डाळिंब सल्लाहस्त बहर उशिरा घेतला असेल तर फळांना बटर पेपर बॅग...
कृषी सल्ला : आंबा, काजू, नारळ, सुपारीनवीन आंबा लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील...
कृषी सल्ला : सुरु ऊस, कांदा, फळपिकेवातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या...
राज्यात उष्ण, ढगाळ हवामानसोमवार ते बुधवारपर्यंत (ता.१९ ते २१) १००८...
नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वसंत...नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
देशात ‘जमीन सुपोषन व संरक्षण जनजागरण’...औरंगाबाद : संपूर्ण देशभरात मंगळवारपासून (ता. १३...
निराधार महिला शेतकऱ्यांसाठी ‘ट्रँक्टर...अमरावती : अचलपूर विधानसभा मतदारसंघातील निराधार,...