खानदेशात कांद्याची विक्रमी लागवड

खानदेशात कांद्याची विक्रमी लागवड
खानदेशात कांद्याची विक्रमी लागवड

जळगाव  ः खानदेशात कांदा लागवड यंदा विक्रमी स्थितीत पोचली असून, मागील तीन वर्षांमधील सर्वाधिक म्हणजेच साडेसात हजार हेक्‍टरवर ही लागवड झाल्याची माहिती आहे. लागवड अजून सुरूच आहे. धुळे, जळगाव जिल्ह्यांतील यावल व चोपडा हे भाग लागवडीत आघाडीवर आहेत.  लाल कांद्याची लागवड अधिक होत आहे. पांढऱ्या कांद्याची लागवड रावेर, नंदुरबार, अक्कलकुवा भागांत होत आहे. धुळे तालुक्‍यात सुमारे १८०० हेक्‍टरपर्यंत लागवड झाली आहे. तर यावल तालुक्‍यातही सुमारे १३०० हेक्‍टर व चोपडा भागातही सुमारे एक हजार हेक्‍टरपर्यंत कांदा लागवड झाली आहे. धुळ्यातील साक्री, शिरपूर भागांतही लागवड वाढली आहे. शिरपूर तालुक्‍यातील निमझरी ते तऱ्हाडीपर्यंत कांदा लागवड बऱ्यापैकी झाली आहे. धुळे तालुक्‍यातील कापडणे, लामकानी, तामसवाडी भागांत कांदा लागवड बऱ्यापैकी झाली आहे. शिंदखेडा तालुक्‍यातील चिचवार, टाकरखेडा व लगतच्या भागात कांदा लागवड यंदा चांगली झाली आहे. लागवड आणखी आठ ते १० दिवस सुरू राहील. मागील वर्षी सुमारे साडेचार हजार हेक्‍टरवर कांदा लागवड झाली होती. तर २०१८ मध्ये रब्बी हंगामात किंवा डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यानच्या कांद्याची लागवड सुमारे सहा हजार हेक्‍टरवर झाली होती. चांगले पाऊसमान व कांद्याचे टिकून असलेले दर यामुळे शेतकरी कांद्याकडे वळले आहेत. तसेच मका पिकाला अमेरिकन लष्करी अळीचा विळखा बसल्याने मका, बाजरीऐवजी अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला पसंती दिली.  कांदा लागवड नंदुरबारमधील अक्‍लककुवा, तळोदा, शहादा, नंदुरबार भागांतही वाढली आहे. तर जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या भागांतील वाघूर, गिरणा नदीकाठीदेखील कांदा लागवड झाली आहे. यामुळे क्षेत्र यंदा वाढले आहे. कांदा लागवड वाढल्याने निर्यात सुरूच ठेवावी, अशी अपेक्षा शेतकरी मंडळी व्यक्त करीत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com