agriculture news in Marathi onion seed companies earns big profit Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 जून 2021

खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या कंपन्यांनी शेतकऱ्यांसोबत कांदा बीजोत्पादनासंबंधीचे करार करून बियाण्याची उपलब्धता करून घेतली आहे.

जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या कंपन्यांनी शेतकऱ्यांसोबत कांदा बीजोत्पादनासंबंधीचे करार करून बियाण्याची उपलब्धता करून घेतली आहे. यात कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून बियाणे ३८०, ४०० ते ५०० रुपये प्रतिकिलो या दरात खरेदी केले आणि याच बियाण्याची बाजारात तब्बल १२००, १५०० ते २००० रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे. कांदा बियाणे निर्मात्या, पुरवठादार कंपन्या मालामाल आणि शेतकरी उपाशी, अशी स्थिती यंदा आहे. 

बियाणे उगवणीची हमीदेखील कंपन्या देत नाहीत. गेल्या वर्षी बियाणे उगवण क्षमतेच्या अनेक तक्रारी होत्या, पण एकाही शेतकऱ्याला यासंबंधीची भरपाई कांदा बियाणे कंपनीकडून मिळाली नाही. यंदाही तशीच स्थिती आहे. कांदा लागवडीची तयारी शेतकरी खानदेशात करीत आहेत. याच वेळी बियाणे कंपन्या आपल्या नफ्याची गणिते, आडाखे बांधून मोकळ्या झाल्या आहेत.

यंदाही बियाणे चढ्या दरात शेतकऱ्यांना मिळत आहे. बियाणे दरांवर नियंत्रण असायला हवे आणि त्याची उगवणक्षमता, गुणवत्ता याची हमीदेखील शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना मिळायला हवी, अन्यथा कांदा बियाणे कंपन्यादेखील सोयाबीन बियाणे कंपन्यांसारख्या मोकाट सुटतील, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

खानदेशात कांदा बियाणे उत्पादक, पुरवठादार कंपन्यांनी शेतकऱ्यांसोबत बीजोत्पादनाचे करार केले होते. डिसेंबरमध्ये यासंबंधीची लागवड झाली होती. त्यात २० रुपये प्रतिकिलो या दरात कांदा बल्ब (बीजोत्पादनासाठी आवश्यक कांदा) पुरवठा शेतकऱ्यांना केला, तसेच मागणीनुसार कीडनाशके, खते पुरवठा केला. मळणीच्या वेळेस संबंधित कंपनीचे कर्मचारी संबंधित शेतात उपस्थित राहायचे. त्यांच्या निगरणातील बियाणे मळणी व इतर कार्यवाही केली जायची. शेतकरी आपले नुकसान करणार नाहीत, याची पूर्ण खबरदारी या कंपन्यांनी घेतली. 

बीजोत्पादकांची पिळवणूक 
बियाणे उत्पादनासंबंधीच्या करार केलेल्या शेतकऱ्याकडून या बियाण्याची खरेदी ३८०, ४०० ते ५०० रुपये प्रतिकिलो, या दरात संबंधित कंपन्यांनी केली. त्यात काही अलिखित शुल्कही (हिडन चर्जेस) आकारले. शेतकऱ्याला नेमके ३५० ते ३६० रुपये ते ४५० रुपये प्रतिकिलो या दरात हे बियाणे पडले. त्यात एकरी ४० ते ४५ हजार रुपये उत्पादन खर्चही आला. एकरी उत्पादन दीड ते दोन क्विंटल एवढेच आले. अर्थात एकरी ३० ते ३५ हजार रुपये नफा राहिला. पण कंपन्यांचे मात्र भले झाले आहे. कारण कंपन्या या बियाण्याची विक्री तब्बल १२००, १५०० ते २००० रुपये प्रतिकिलो या दरात बाजारात करून लूट करीत आहेत. या दरांवर नियंत्रण तातडीने नियंत्रण आणण्याची गरज आहे. 

गेल्या वर्षीची पुनरावृत्ती शक्य 
गेल्या वर्षी रब्बीत तब्बल ३००० ते ३५०० रुपये प्रतिकिलो या दरात कांदा बियाण्याची विक्री कंपन्यांनी करून मोठा नफा मिळविला होता, हाच प्रकार पुढेही सुरू आहे. खानदेशात खरिपातील कांद्याची सुमारे १५ ते १६ हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी स्थिती आहे. अर्थात, बियाणे बाजारात कोट्यवधींची उलाढाल होऊन अवाजवी नफा कंपन्यांच्या खिशात जाईल, असाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...
अडीच लाख शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे...अमरावती : राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता...
धरणक्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या...
पीक विम्यात कुचराई केल्यास नोटिसा काढा...नाशिक: पीकविमा योजनांची संबंधित कंपन्यांच्या...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर...सोलापूर ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
चीनची खत निर्यातीवर बंदी बीजिंग ः चीनमध्ये खतांचे घटलेले उत्पादन, विजेच्या...
राज्याची पीकपेरा नोंद आता शेतकरीच करणार पुणेः सातबारा उतारावरील पीकपेऱ्याची नोंद आता...
निसर्गदूतांच्या सहयोगाने ‘झाडांची भिशी...सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स,...
खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...जळगाव : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी...
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर...