agriculture news in marathi Onion seed fraud in Ahmednagar Districts Farmers gets setbacks due to losses | Agrowon

नगर जिल्ह्यात कांदा बियाण्यांत मोठी फसवणूक

ॲग्रोवन वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

यंदा रब्बीत बोगस आणि भेसळ असलेले बियाणे विक्री करून नगर जिल्ह्यातील राहुरी, नेवासा तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगर : यंदा रब्बीत बोगस आणि भेसळ असलेले बियाणे विक्री करून नगर जिल्ह्यातील राहुरी, नेवासा तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर कृषी विभाग गांभीर्याने दखल घेत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

राहुरी तालुक्‍यातील देवळाली प्रवरा, टाकळीमियाँ, वळण, केंदळ येथे शेतकऱ्यांची कांदा बियाण्यात फसवणूक झाली. गावरान लाल कांद्याचे बियाणे खरेदी केले असता, प्रत्यक्षात उत्पादनात पांढरा कांदा निघाला. कृषी सेवा केंद्राचे उंबरठे झिजवूनही नुकसानभरपाई काही मिळाली नाही. नेवासा तालुक्यातही गोगलगाव व अन्य गावांत कांदा बियाण्यांत फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत.

आतापर्यंत वीसपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या असून, कृषी दुकानदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार ७० ते ८० किलो बियाणे विक्री झाल्याचा अंदाज आहे. तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी माहिती दिली. दगडू शेळके, रमेश लांडगे (रा. टाकळीमियाँ) यांच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली. त्यांच्या बियाण्यात भेसळ आढळल्याचे श्री. ठोकळ म्हणाले.

देवळाली प्रवरा येथील नितीन बबन खांदे, रोहित विठ्ठल शेटे यांनी बाजार समिती आवारातील कृषी सेवा केंद्रातून २ ऑक्‍टोबर २०२० रोजी ३५ हजार रुपये किंमतीचे खासगी कंपनीचे लाल गावरान कांद्याचे बियाणे खरेदी केले. मशागत करून कांदा लागवड केली. योग्य प्रमाणात औषध फवारणी, खतांचा वापर केला. शेतात कांदापीक बहरले. परंतु कांदा मोठा होऊ लागला, तसा पांढरा आढळून येऊ लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधला. केंद्र चालकाने बियाणे कंपनीशी संपर्क साधला. कंपनीच्या प्रतिनिधीने नुकसानभरपाई देऊ, असे सांगून नंतर फोन उचलणेही बंद केले. अखेर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेत लेखी तक्रार केली.

प्रतिक्रिया...
यंदा गावराण कांद्याचे बियाणे म्हणून खरेदी केले. मात्र त्यात अन्य भेसळीचे बियाणे मिसळल्याचे आता दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात डेंगळे निघाले असून, पावसाळ्यात लावला जाणारा कांदाही आहे. त्यामुळे यंदा चाळीस टक्के आर्थिक फटका बसणार आहे. याबाबत आम्ही कृषी विभागाकडे तक्रार केली  आहे.
- सुनील मते, शेतकरी, गोगलगाव, ता. नेवासा, जि. नगर 


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...
तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पुणे : राज्यातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाचा...
हापूसच्या ४० हजार पेट्या थेट...रत्नागिरी ः उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक ही साखळी...
कडधान्य उत्पादनात ६५ टक्के वाढ पुणे ः देशातील कडधान्य उत्पादनात २००७-०८ पासून...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...