Agriculture news in Marathi Onion seed prices skyrocketed | Agrowon

कांदा बियाण्याचे दर कडाडले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे. त्यामुळे कांदा बियाण्याचेही दर कडाडले आहे. सध्या बियाण्याची २५०० ते ४५०० प्रति किलो या दराने विक्री केली जात आहे. कांद्याचे दर समाधानकारक राहतील, या आशेने शेतकऱ्यांकडून चढ्या दरानेही बियाणे खरेदी केली जात आहे. बियाण्याच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यात कांदाच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे. त्यामुळे कांदा बियाण्याचेही दर कडाडले आहे. सध्या बियाण्याची २५०० ते ४५०० प्रति किलो या दराने विक्री केली जात आहे. कांद्याचे दर समाधानकारक राहतील, या आशेने शेतकऱ्यांकडून चढ्या दरानेही बियाणे खरेदी केली जात आहे. बियाण्याच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यात कांदाच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यात रब्बी हंगामातील कांदा हे प्रमुख पीक असून पश्चिम भागातही कांदा पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात कांदा पिकांचे ११ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. लाॅकडाऊन बंद झाल्यावर कांद्याच्या दरात सुधारणा होत जाऊन क्विंटलला ८ हजार रुपयापर्यंत पोचले होते.

सध्या साठा मर्यादा घातल्याने कांद्याच्या दरात घट झाली आहे. मात्र, कांद्याचे दर कमी जास्त होत असलेतरी कांदा बियाण्याचे दर तेजीत आहे. कंपन्यांकडून येणारे बियाण्याचे दर ३५०० ते ४५०० तर २५०० ते ३००० प्रतिकिलो सुट्या पद्धतीने विक्री केली जात आहे. जिल्ह्याच्या बाहेरून बियाणे खरेदी केली जात आहे. कांद्याचे दर समाधानकारक राहतील या एकमेव आशेवर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बियाण्याची मागणी होत आहे. या शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन बियाण्याचे दर वाढवले जात आहेत. बियाण्याचे दर वाढल्यामुळे कांद्याच्या रोपाचे दर वाढणार आहे. भांडवली खर्चात होणारी वाढ व बियाण्याचा तुटवडा यामुळे कांद्याच्या क्षेत्रात घट होण्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

फसवणुकीचे प्रकार
बियाण्याची मागणी लक्षात घेऊन चढ्या बरोबर बोगस बियाण्याची विक्री केली जात आहे. चढ्या दराने बियाणे घेऊन अनेक ठिकाणी या बियाण्याची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी येत आहे. सुट्या पद्धतीने खरेदी केली जात असल्यामुळे पावत्या मिळत नसतात. यामुळे बियाणे उगवले नाही म्हणून तक्रारही करता येत नाही. त्यातूनही तक्रार केली पावसाचा परिणाम झाला असेल अशी उत्तरे दिली जात आहे. काही ठिकाणी बियाणे विक्री करणारे प्रसिद्ध शेतकऱ्यांची नावे सांगून बियाणे विक्री करण्याचे प्रकार सुरू आहेत.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
गहू, ज्वारी पिकांवरील खोडमाशीचे...बहुतांश ठिकाणी गहू व ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे...
पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाणी...रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात लसूण ५००० ते १३००० रुपयेनाशिकमध्ये ६२०० ते ११५०० रुपये  नाशिक :...
उत्तम भाजीपाला उत्पादनासाठी पोषक हवामानवाटाणा वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...