agriculture news in marathi, onion seed producers waiting for rate declearation, varhad, maharashtra | Agrowon

वऱ्हाडातील कांदा बीजोत्पादकांचे लक्ष दराकडे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

कांदा लागवडीला वेळ अाहे. या वर्षी कंपन्यांचा ३० ते ४० हजार रुपयांदरम्यान बियाणे दर राहू शकतो. लागवडीच्या कांद्याचा दर १५०० रुपयांदरम्यान असेल. याबाबत लवकरच परिस्थिती स्पष्ट होईल.  
- पिंटूभाऊ लोखंडे, कांदा बीजोत्पादक, विश्वी, जि. बुलडाणा

अकोला : रब्बीमध्ये कांदा बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मागील दोन हंगाम चांगले राहिले नव्हते. या वर्षीही काही भागांत कमी पावसाचा फटका बसलेला अाहे. परंतु पाण्याची व्यवस्था असणारे शेतकरी बीजोत्पादन घेण्याची तयारी करू लागले अाहेत. कंपन्यांकडून किती दराने करार केले जातात, याकडे या बीजोत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले अाहे.

रोख पैसे मिळवून देणारे पीक म्हणून मागील काही हंगामांपासून वऱ्हाडात कांदा बीजोत्पादनाकडे शेतकरी वळत अाहेत. मागील दोन हंगामात शेतकऱ्यांना कांदयास अपेक्षित दर न मिळाल्याने अर्थिक फटका बसला. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात बीजोत्पादन केले नव्हते. या वेळी कांद्याचे दर बऱ्यापैकी अाहेत. अशा वेळी बीजोत्पादन फायदेशीर ठरू शकते, असा सूर सध्या शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होऊ लागला अाहे.

कांदा बीजोत्पादनात बुलडाणा जिल्हा आघाडीवर अाहे. त्यानंतर अकोला, वाशीमचा समावेश अाहे. बुलडाण्यात यंदा कमी पाऊस झालेला असल्याने भूजल पातळीला फटका बसला. अकोला, वाशीममध्ये पाण्याची स्थिती चांगली अाहे. त्यामुळे रब्बीत कांदा बीजोत्पादन करायचे की दुसरे पर्यायी पीक घ्यायचे याबाबत शेतकऱ्यांमध्ये विचार सुरू अाहे. कांदा बियाणे कंपन्यांकडून या हंगामात २५ ते ४० हजार रुपये क्विंटल दरम्यान बियाणे करार केला जाऊ शकतो. उगवण क्षमतेनुसार हे दर कमी अधिक होऊ शकतात. काही कंपन्यांनी असे दर जाहीर करणे सुरू केले.

लागवडीला वेळ असून येत्या अाठ-दहा दिवसांत सर्वच कंपन्यांकडून बियाणे दराबाबत अधिक तपशील जाहीर केला जाऊ शकतो. लागवडीच्या कांद्याचा दर १५०० रुपयांपर्यत राहणार असल्याचे सांगितले जात अाहे. कांद्याचे दर गेल्याकाही दिवसांपासून बाजारात टिकून अाहेत. यामुळेच बियाण्याचे दर मागीलपेक्षा चांगले अाहेत. याबाबत चित्र स्पष्ट झाल्यानंतर अनेक शेतकरी लागवडीच्या दृष्टीने पुढाकार घेऊ शकतात. वऱ्हाडात सुमारे तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बीजोत्पादनाचे असते.
 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...