agriculture news in Marathi onion seed production crop need insurance Maharashtra | Agrowon

कांदा बीजोत्पादनाला हवे पीकविम्याचे कवच 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 मार्च 2021

वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत हे क्षेत्र सुमारे आठ ते नऊ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले असून, नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे यापैकी मोठ्या क्षेत्राला फटका बसला आहे.

अकोला ः नगदी पीक म्हणून शेतकरी दरवर्षी रब्बी हंगामात कांदा बीजोत्पादनाचे क्षेत्र वाढवीत आहेत. वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत हे क्षेत्र सुमारे आठ ते नऊ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले असून, नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे यापैकी मोठ्या क्षेत्राला फटका बसला आहे. यामुळे पुन्हा एकदा या पिकाचा पीकविम्याच्या कार्यकक्षेत समावेश होण्याची मागणी पुढे आली आहे. 

खरिपातील पिकांचे गेल्या काही वर्षांत अर्थकारण बिघडलेले आहे. रब्बीतही गहू, हरभऱ्याशिवाय दुसरा चांगला पर्याय मिळालेला नाही. अशा स्थितीत शेतकरी पर्यायी पीक म्हणून कांदा लागवड, कांदा बीजोत्पादनास प्राधान्य देत आहेत. यंदाच्या हंगामात कांद्याचे दर वाढलेले होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड, कांदा बीजोत्पादन घेण्यासाठी पुढाकार घेतला. 

यंदाचे पीक चांगल्या स्थितीत असताना या भागात १८ मार्चपासून अवकाळी पावसाने ठाण मांडले. काही १८ व १९ मार्चला, तर वादळी वाऱ्यासह गारपीटसुद्धा झाली. या आपत्तीत सध्या बियाणे परिपक्व होण्याच्या अवस्थेत असलेल्या कांदा पिकाला सर्वाधिक तडाखा बसला. शेतकऱ्यांचा एकरी ४० हजारांपर्यंत सरासरी खर्च झालेला आहे. वादळी वारा व गारपिटीमुळे कांद्याची पात मोडून पडली. बियाण्याचे गेंद जमिनीवर आडवे झाले आहेत.

यामुळे आता किती उत्पादन होईल, याची कुठलीही खात्री देता येत नाही. बुलडाणा जिल्‍ह्यात या भागात सर्वाधिक ५३०० हेक्टरवर कांदा बीजोत्पादन घेतले जात होते. तर अकोल्यातही हजार आणि वाशीममध्ये दीड हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा बीजोत्पादन होत आहे. हे पीक अत्यंत जोखमीच्या कक्षेत मोडते. यंदा असंख्य शेतकऱ्यांनी बियाणे कंपन्यांसोबत करार करून लागवड केली होती. कंपन्यांनी दरही चांगल्या प्रकारे दिले होते. परंतु आता उत्पादनच येण्याची आशा अनेकांना माळवल्याने लावलेला खर्चही कसा भागवावा याची चिंता लागलेली आहे. 

प्रतिक्रिया 
कांदा बीजोत्पादनासाठी एकरी ४० ते ५० हजार रुपये खर्च लागतो. मात्र हे पीक दरवर्षी गारपिटीच्या तडाख्यात येत असल्याचा अनुभव आहे. मार्च-एप्रिलमध्ये हे सातत्याने होत आहे. त्यामुळे आगामी काळात हे पीक घ्यावे की नाही या मानसिकतेत आम्ही शेतकरी पोहोचलो आहोत. शासनाने कांदा बीजोत्पादन तसेच इतर हंगामी पिके विम्याच्या कक्षेत आणण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच्या आपत्तीत माझे १० एकरांतील केळी, तीन एकर पपई, तीन एकर मिरची, टरबूज अशी सर्व पिके पूर्णतः गारपिटीत उद्ध्वस्त झाली. 
- हेमंत देशमुख, शेतकरी, डोंगरकिन्ही ता. मालेगाव, जि. वाशीम 
 


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...
तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पुणे : राज्यातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाचा...
हापूसच्या ४० हजार पेट्या थेट...रत्नागिरी ः उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक ही साखळी...
कडधान्य उत्पादनात ६५ टक्के वाढ पुणे ः देशातील कडधान्य उत्पादनात २००७-०८ पासून...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...