मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
बातम्या
जळगाव जिल्ह्यात कांदा बिजोत्पादन वाढण्याचा अंदाज
जळगाव : जिल्ह्यात यंदा कांदा बिजोत्पादनाचे क्षेत्र सुमारे ५०० ते ६०० हेक्टरने वाढण्याचा अंदाज आहे.
जळगाव : जिल्ह्यात यंदा कांदा बिजोत्पादनाचे क्षेत्र सुमारे ५०० ते ६०० हेक्टरने वाढण्याचा अंदाज आहे. बियाणे उत्पादक कंपन्या व खरेदीदारांकडून दरांची हमी व कमी दरात कांदा बल्बचा पुरवठा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी बिजोत्पादनाला पसंती दिली आहे.
जळगाव, यावल, रावेर, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, चोपडा या भागात कांदा बिजोत्पादनासंबंधी बल्बची लागवड वेगात झाली आहे. याच भागात खरीप व रब्बीमधील कांद्याची लागवड होत असते.
यंदा कांदा बियाण्याचे दर विक्रमी स्थितीत पोचले. जूनमध्ये बियाण्याचे दर ११००, १२००, १६५० ते २५०० रुपये प्रतिक्विंकिलो असे होते. तर, रब्बीमध्ये लागवडीच्या वेळेस शेतकऱ्यांना ३००० ते ४००० रुपये प्रतिकिलो या दरात कांदा बियाण्याची खरेदी करावी लागली. कांदा बियाण्यातील तेजी लक्षात घेता अनेक बियाणे उत्पादक व खरेदीदारांनी बिजोत्पादनासाठी शेतकऱ्यांशी करार केले आहेत. त्यात कांदा बल्ब २० रुपये प्रतिकिलो या दरात शेतकऱ्यांना शेतात पोच केला आहे.
बियाण्याची खरेदी प्रतिकिलो ३८० ते ४०० रुपये प्रतिकिलो या दरात करण्याची हमी दिली आहे. जिल्ह्यात अनेक संस्थांनी यासाठी वेगात काम सुरू केले.
कांदा बिजोत्पादनासाठी बल्बची लागवड अजूनही अनेक भागात सुरू आहे. काही शेतकरी कंपन्यांच्या बंधनात न अडकता बिजोत्पादनाची तयारी करीत आहे. नव्या कांद्याची आवक झाल्यानंतर बिजोत्पादनासाठी कांदा लागवडीचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. कारण, सध्या बाजारात कांद्याचे दर तेजीत आहेत.
बिजोत्पादनाखालील क्षेत्र वधारण्याचा अंदाज
जिल्ह्यात कांदा बिजोत्पादनाखालील क्षेत्र यंदा ५०० ते ६०० हेक्टरने वधारून ते दोन ते अडीच हजार हेक्टरवर पोचू शकते. अनेक कंपन्यांनी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, नेपानगर भागातही बिजोत्पादनासाठी कांदा बल्बचा पुरवठा केला आहे.
- 1 of 1504
- ››