मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात कांदा बियाण्याची टंचाई
नगर जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात कांद्याच्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बियाणे उत्पादक कंपन्याकडून आतापर्यत खरीप व रब्बीत मिळून सुमारे ३ हजार ५८० क्विंटल कांदा बियाणाचा पुरवठा झाला आहे.
नगर (प्रतिनिधी) : नगर जिल्ह्यात यंदा खरीप व रब्बी हंगामात कांद्याच्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला. मात्र कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बियाणे उत्पादक कंपन्याकडून आतापर्यत खरीप व रब्बीत मिळून सुमारे ३ हजार ५८० क्विंटल कांदा बियाणाचा पुरवठा झाला आहे. खरिपात दीड हजार क्विंटल बियाणे पुरवठा झाला होता. रब्बीत दोन हजार क्विंटलपेक्षा अधिक बियाणे पुरवठा झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एवढ्या प्रमाणात बियाणे उपलब्ध होऊनही टंचाई होतेच कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नगर जिल्ह्यात वर्षभरात साधारण एक लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जाते. यंदा खरिपात साधारण पंचवीस हजार हेक्टर तर रब्बीत आतापर्यत ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर काद्याची लागलड झाली आहे. यंदाही कांदा लागवडीचा लाख हेक्टरचा आकडा पूर्ण होणार आहे. मात्र यंदा शेतकऱ्यांना कांदा बियाणांसाठी मोठी कसरत करावी लागली.
यंदा कांद्या बियाणे पुरेसे उपलब्ध नसल्याने कंपन्यांकडून पुरवठा झाला नसल्याचे सांगितले जात होते. मात्र कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार खरिपात १५१५.९० क्विंटल तर रब्बीत २ हजार ६३ क्विंटल बियाणे अधिकृत बियाणे कंपन्याकडून पुरवठा झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वाधिक गावरान कांद्याच्या बियाणांची मागणी असलेल्या कांद्याचे सुमारे १५ हजार क्विंटल बियाणे पुरवठा झाला आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होताना दिसत नाही.
बियाणांसाठी शेतकऱ्यांची धावपळ
यंदा कांदा बियाणांसाठी शेतकऱ्यांना सर्वाधिक धावपळ करावी लागली. सर्वाधिक मागणी असलेले बियाणे सर्रासपणे जास्ती दरात विकले गेले. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पावत्याच दिल्या गेल्या नसल्याचे सांगितले जात होते.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने श्रीगोंद्यात बोगस बियाणांबाबत कारवाई केली. मात्र जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कांद्या बियाणांच्या टंचाई आणि चढ्या दराने होणाऱ्या विक्रीबाबत साधी दखलही घेतली नाही, असा आरोप केला जात आहे.
प्रतिक्रिया
नगर जिल्ह्यात पुरवठा झालेल्या कांदा बियाणांची चढ्या दराने विक्री होणार नाही याची दक्षता घेतली. काही ठिकाणी कारवाई केली. दर वर्षीच्या तुलनेत कांदा बियाणे कमी प्रमाणात पुरवठा झाला, पण टंचाई होणार नाही याची काळजी घेतली.
- राजेश जानकर, मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद, नगर
- 1 of 1029
- ››