विद्यापीठाच्या कांदा बियाण्यांची विक्री होणार ऑनलाइन

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरीप हंगामासाठी फुले समर्थ आणि बसवंत-७८० हे सत्यप्रत कांदा बियाणे विकसित केले. त्याची महाराष्ट्र शासनाच्या आदेशानूसार चालू वर्षी सोमवार (ता.८)पासून ऑनलाइन विक्री होणार आहे
onion seed will be sell online
onion seed will be sell online

नाशिक : कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरीप हंगामासाठी फुले समर्थ आणि बसवंत-७८० हे सत्यप्रत कांदा बियाणे विकसित केले. ते महाराष्ट्र शासनाच्या आदेशानूसार चालू वर्षी सोमवार (ता.८)पासून ऑनलाइन विक्री होणार आहे,’’ अशी माहिती विद्यापीठाच्या बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी दिली.  दरवर्षी नाशिक, जळगाव, धुळे, औरंगाबाद व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामातील कांदा बियाणे खरेदी करण्यासाठी विद्यापीठात दरवर्षी मोठी गर्दी होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व गर्दी नियंत्रित करण्यासाठी विद्यापीठाने शासनाच्या आदेशानूसार हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग नियंत्रित आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  सोमवार (ता.८) पासून बियाणे उपलब्ध असेपर्यंत नोंदणी https://www.phuleagromart या वेब पोर्टलवर केली जाणार आहे. त्यानंतर पुढील ३६ तासांच्या आत बियाण्याची रक्कम विद्यापीठ बॅंक खात्यावर जमा करण्यासाठी आरटीजीएस, एनइएफटी तसेच नेटबॅंकिंग हे पर्याय देण्यात आले आहेत. रक्कम जमा करून त्याचा व्यवहार क्रमांक नमूद केल्यानंतर बियाण्याची मागणी निश्‍चित होईल. अन्यथा, नोंदणी होणार नसल्याचे सांगण्यात आले.

अशी आहे विक्री प्रक्रिया प्रति सातबारा २ किलो बियाणे नोंदणी करण्यात येईल. कांदा सत्यप्रत बियाणे दर प्रतिकिलो १५०० रुपये आहे. बियाणे नोंदणी व खरेदी करतेवेळी शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश पाठवून अगोदर कळविण्यात येईल. खरेदीवेळी नोंदणी पुरावा, आधार कार्ड, सातबारा उतारा, बँकेत रक्कम जमा केल्याची ऑनलाइन पावती सादर करावी लागेल. पूर्णनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच कांदा बियाणे दिले जाईल. कुठल्याही परिस्थितीत रोखीने बियाणे विक्री होणार नाही, असे विद्यापीठाच्या बियाणे विभागाने कळविले.

या ठिकाणी होणार बियाणे उपलब्ध

  • कांदा, लसूण व द्राक्षे केंद्र पिंपळगाव बसवंत, ता. निफाड
  • कृषी विज्ञान केंद्र, धुळे
  • मध्यवर्ती परिसर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
  • विद्यापीठाकडे ४२२० किलो सत्यप्रत बियाणे उपलब्ध आहे. त्यानुसार दररोज एक केंद्रावर २०० असे तीन केंद्रांवर दैनंदिन ६०० शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश पाठवून विक्रीचे नियोजन आहे. शासन व जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनूसार शारीरिक अंतर पाळून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यात शासनाला सहकार्य करण्यासाठी पहिल्यांदा असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  - डॉ. आनंद सोळंके, प्रमुख शास्त्रज्ञ, बियाणे विभाग, मफुकृवि, राहुरी. बियाणे विभाग संपर्क - +91-02426-243345

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com