Agriculture news in marathi; Onion shopping Impact of transactions at Pimplener | Agrowon

कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर पिंपळनेर येथे परिणाम
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

धुळे  ः खानदेशात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपळनेर (ता. साक्री), साक्री, धुळे येथील बाजारातील कांद्याची आवक कमी झाली. कांदा दरप्रश्‍नी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद मिळत असून, टिकाऊ कांद्याची आवक बाजारात कमी झाल्याचा दावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष शशिकांत भदाणे यांनी केला. 

धुळे  ः खानदेशात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपळनेर (ता. साक्री), साक्री, धुळे येथील बाजारातील कांद्याची आवक कमी झाली. कांदा दरप्रश्‍नी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद मिळत असून, टिकाऊ कांद्याची आवक बाजारात कमी झाल्याचा दावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष शशिकांत भदाणे यांनी केला. 

कांद्याचे नुकतेच पिंपळनेर बाजार समितीत लिलाव बंद ठेवण्यात आले. बाजारात शुकशुकाट होता. मागील दोन दिवसांपासून पिंपळनेर, साक्री येथील बाजारात लिलाव सुरू असले तरी दर कमी झाल्याने कांद्याची आवक शेतकऱ्यांकडून कमी झाली आहे. संघटनेने शेतकऱ्यांनी खराब होण्याच्या स्थितीतील किंवा ज्याची विक्री आवश्‍यक आहे, अशाच कांद्याची विक्री करावी. टिकाऊ कांदा बाजारात आणू नये, असे आवाहन शनिवारी (ता. १२) केले होते. त्याला साक्री, पिंपळनेर, धुळे भागात शेतकऱ्यांसह बाजार समित्यांनीदेखील प्रतिसाद दिला.

शेतकऱ्यांकडून आवक झाली तर त्याचे लिलाव केले जातील. शेतकऱ्यांनी कांद्याची पाठवणूक केली नाही, तर कुठलेही व्यवहार होणार नाहीत, अशी भूमिका बाजार समित्यांच्या संचालकांनी घेतली आहे. यामुळे पिंपळनेर येथील बाजारातील शेतकरी संघटनेने पुकारलेला बंद यशस्वी झाल्याचेही संघटनेचे भदाणे यांनी म्हटले आहे. धुळे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून आवक घटली आहे. अनेक शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. लाल कांद्याला किमान तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळायला हवा, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

इतर ताज्या घडामोडी
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...