Agriculture news in marathi Onion should also be purchased with nafed | Agrowon

अकोल्यातही कांदा नाफेडने खरेदी करावा : शेतकरी संघटना

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 एप्रिल 2020

अकोला ः केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून नाशिक भागात कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या खरेदीचे एक केंद्र अकोला जिल्ह्यातही दिले जावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने शासनाकडे केली आहे, अशी माहिती संघटनेच्या सोशल मीडियाचे राज्य प्रमुख विलास ताथोड यांनी दिली आहे. 

अकोला ः केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून नाशिक भागात कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या खरेदीचे एक केंद्र अकोला जिल्ह्यातही दिले जावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने शासनाकडे केली आहे, अशी माहिती संघटनेच्या सोशल मीडियाचे राज्य प्रमुख विलास ताथोड यांनी दिली आहे. 

सद्यःस्थितीत कांदा उत्पादक सर्वत्र अडचणीत आहे. केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून नाशिक भागात कांदा खरेदीचा निर्णय घेतला. अकोला जिल्ह्यात पाच हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवड होत असते. सध्या हजारो टन कांदा उत्पादीत झालेला असून त्याला खरेदीदार नाही. 

साठवणुकीची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध साधनांच्या आधारे कांदा झाकलेला आहे. मात्र, हे फार दिवस टिकू शकणार नाही. अशा परिस्थितीत नाशिक भागात ज्या प्रमाणे कांदा खरेदी केला जाणार आहे. याच धर्तीवर अकोल्यासह जेथे-जेथे कांदा उत्पादन केले जाते त्या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करून शासनाने संकटातील शेतकऱ्यांना बाहेर काढावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 

कांद्याला कमी दराने मागणी 
यंदाच्या हंगामात उत्पादीत केलेला कांदा लॉकडाऊनमध्ये व्यापारी घ्यायला तयार नाहीत. जे खरेदी करण्यास तयार आहेत, ते अत्यंत कमी दरात ६०० रुपयांपर्यंत मागणी करीत आहेत. वास्तविक बाजारात कांदा २० ते ३० रुपये किलोने व्यापारी सर्रास विक्री करीत आहेत. अशी विपरित परिस्थिती उद्भवल्याने कांदा उत्पादकांची गोची झालेली आहे. यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करीत हमीदराने नाफेडच्या माध्यमातून खरेदी केल्यास शेतकऱ्याला दिलासा मिळेल. 

साठवणुकीची सुविधा त्रोटक 
या भागात कांदा पिकवला जात असला तरी साठवणुकीची साधने नसल्यासारखी आहेत. कांदा चाळीचे जाळे अगदी बोटावर मोजण्याएवढे आहे. आता या भागात उष्ण तापमानाचा कालावधी सुरू झाला. दररोज ४२ अंशापेक्षा अधिक तापमान राहत आहे. मे महिन्यात हा पारा ४५ अंशापर्यंत पोचत असतो. अशा स्थितीत कांदा टिकवून ठेवणे सामान्य शेतकऱ्यांना शक्य नाही. परिणामी शासनाने नाशिकप्रमाणेच याही भागात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी कांदा उत्पादकांमधून पुढे आली आहे.


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...