देशात आगाप रब्बी कांदा लागणीत १७ टक्क्यांनी वाढ

onion
onion

पुणे : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर प्रमुख उत्पादक राज्यांत २.७ लाख हेक्टरवर रब्बी कांदा लागणी झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून उपलब्ध झाली आहे. लेट खरीप म्हणजेच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या आवकेच्या लागणींत मात्र घट आहे. लेट खरिपात ९८ हजार हेक्टरवर लागणी झाल्या असून, मागील वर्षाच्या तुलनेत १९ टक्क्यांची घट आहे. या लागणींची उत्पादकताही नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे बाधित असून, पर्यायाने जानेवारी व फेब्रुवारीत कांद्याचा पुरवठा नियंत्रित राहण्याची शक्यता दिसतेय. मार्चपासून आगाप रब्बी कांद्याची आवक वाढत जाईल. वरील आकडेवारीतून क्षेत्रवाढीचा कल दिसत आहे. २०१८ मध्ये खरिपात ४८ लाख टन तर लेट खरिपात २१ लाख टन असे दोन्ही मिळून ६९ लाख टन कांदा उत्पादन मिळाले होते. त्या तुलनेत २०१९ मध्ये खरिपात ३९ लाख टन तर लेट खरिपात १५ लाख टन असे दोन्ही मिळून ५४ लाख टन उत्पादन अनुमानित आहे. म्हणजे २०१८ तुलनेत ते २१ टक्क्यांनी घटल्याचे अनुमान आहे. या घटीचे प्रतिबिंब आपण सध्याच्या बाजारभावात पाहतोच आहे. विशेष म्हणजे २०१८ च्या तुलनेत २०१९ मधील शिल्लक साठाही लक्षणीयरीत्या कमी होता. आकडेवारी काय सांगते

  •  रब्बी कांद्यातील क्षेत्र वाढीच्या ट्रेंडबाबत सरकारी आकडेवारीचा दुजोरा मिळाला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवडाअखेरच्या लागणीतील आकडेवारीत १७ टक्क्यांनी वाढ आहे. लागणीतील खरी व मोठी वाढ ही डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून दिसेल.
  •  मार्चपासून कांद्याचा पुरवठा वाढणार हे निश्चित आहे. त्यासाठी कांद्यावरील निर्यातबंदी फेब्रुवारीतच मागे घेण्याची गरज आहे.
  •  जानेवारी महिन्यात ज्यांना शक्य असेल, त्यांनी कांद्याखालील क्षेत्र किमान ३० टक्क्यांनी कमी करावे.
  • पूरक माहिती

  •  नोव्हेंबर १८ च्या तुलनेत नोव्हेंबर १९ मधील 
  • बाजार समित्यांतील आवकेत २७ टक्के घट 
  • होती. नोव्हेंबर १९ मध्ये केवळ ६ लाख टन आवक झाली.
  •  दिल्लीत नोव्हेंबर १८ मध्ये ३० हजार टन आवक होती. त्या तुलनेत नोव्हेंबर १९ मध्ये ९ हजार ४०० टन आवक होती.
  •  जानेवारी ते ऑक्टोबर १९ या दहा महिन्यात १४.८ लाख टन कांदा निर्यात झाली आहे. २०१८ संपूर्ण कॅलेंडर वर्षात १९.९ लाख टन निर्यात झाली.
  • विशेष नोंद  देशात खरीप, लेट खरीप आणि रब्बी मिळून सुमारे १३ लाख हेक्टरवर कांदा लागणी होतात. त्यात रब्बीचा वाटा ६.५ लाख हेक्टर आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ४१ टक्के लागणी पूर्ण झाल्या आहेत. या वर्षी १५ फेब्रुवारीअखेरपर्यंत लागणी सुरू राहण्याची शक्यता आहे. परिणामी रब्बीत लागणीत नवा उच्चांक शक्य आहे.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com