agriculture news in Marathi onion sowing up by 17 percent in country Maharashtra | Agrowon

देशात आगाप रब्बी कांदा लागणीत १७ टक्क्यांनी वाढ

दिपक चव्हाण
सोमवार, 23 डिसेंबर 2019

पुणे : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर प्रमुख उत्पादक राज्यांत २.७ लाख हेक्टरवर रब्बी कांदा लागणी झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून उपलब्ध झाली आहे.

पुणे : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर प्रमुख उत्पादक राज्यांत २.७ लाख हेक्टरवर रब्बी कांदा लागणी झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून उपलब्ध झाली आहे.

लेट खरीप म्हणजेच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या आवकेच्या लागणींत मात्र घट आहे. लेट खरिपात ९८ हजार हेक्टरवर लागणी झाल्या असून, मागील वर्षाच्या तुलनेत १९ टक्क्यांची घट आहे. या लागणींची उत्पादकताही नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे बाधित असून, पर्यायाने जानेवारी व फेब्रुवारीत कांद्याचा पुरवठा नियंत्रित राहण्याची शक्यता दिसतेय. मार्चपासून आगाप रब्बी कांद्याची आवक वाढत जाईल. वरील आकडेवारीतून क्षेत्रवाढीचा कल दिसत आहे.

२०१८ मध्ये खरिपात ४८ लाख टन तर लेट खरिपात २१ लाख टन असे दोन्ही मिळून ६९ लाख टन कांदा उत्पादन मिळाले होते. त्या तुलनेत २०१९ मध्ये खरिपात ३९ लाख टन तर लेट खरिपात १५ लाख टन असे दोन्ही मिळून ५४ लाख टन उत्पादन अनुमानित आहे. म्हणजे २०१८ तुलनेत ते २१ टक्क्यांनी घटल्याचे अनुमान आहे. या घटीचे प्रतिबिंब आपण सध्याच्या बाजारभावात पाहतोच आहे. विशेष म्हणजे २०१८ च्या तुलनेत २०१९ मधील शिल्लक साठाही लक्षणीयरीत्या कमी होता.

आकडेवारी काय सांगते

  •  रब्बी कांद्यातील क्षेत्र वाढीच्या ट्रेंडबाबत सरकारी आकडेवारीचा दुजोरा मिळाला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवडाअखेरच्या लागणीतील आकडेवारीत १७ टक्क्यांनी वाढ आहे. लागणीतील खरी व मोठी वाढ ही डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून दिसेल.
  •  मार्चपासून कांद्याचा पुरवठा वाढणार हे निश्चित आहे. त्यासाठी कांद्यावरील निर्यातबंदी फेब्रुवारीतच मागे घेण्याची गरज आहे.
  •  जानेवारी महिन्यात ज्यांना शक्य असेल, त्यांनी कांद्याखालील क्षेत्र किमान ३० टक्क्यांनी कमी करावे.

पूरक माहिती

  •  नोव्हेंबर १८ च्या तुलनेत नोव्हेंबर १९ मधील 
  • बाजार समित्यांतील आवकेत २७ टक्के घट 
  • होती. नोव्हेंबर १९ मध्ये केवळ ६ लाख टन आवक झाली.
  •  दिल्लीत नोव्हेंबर १८ मध्ये ३० हजार टन आवक होती. त्या तुलनेत नोव्हेंबर १९ मध्ये ९ हजार ४०० टन आवक होती.
  •  जानेवारी ते ऑक्टोबर १९ या दहा महिन्यात १४.८ लाख टन कांदा निर्यात झाली आहे. २०१८ संपूर्ण कॅलेंडर वर्षात १९.९ लाख टन निर्यात झाली.

विशेष नोंद 
देशात खरीप, लेट खरीप आणि रब्बी मिळून सुमारे १३ लाख हेक्टरवर कांदा लागणी होतात. त्यात रब्बीचा वाटा ६.५ लाख हेक्टर आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ४१ टक्के लागणी पूर्ण झाल्या आहेत. या वर्षी १५ फेब्रुवारीअखेरपर्यंत लागणी सुरू राहण्याची शक्यता आहे. परिणामी रब्बीत लागणीत नवा उच्चांक शक्य आहे.
 


इतर अॅग्रोमनी
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...