Agriculture news in marathi Onion in the state is 100 to 1500 rupees | Page 2 ||| Agrowon

राज्यात कांदा १०० ते १५०० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 मे 2021

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याचे दर काहीसे स्थिर राहिले.

सोलापुरात क्विंटलला १०० ते १००० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याचे दर काहीसे स्थिर राहिले. लॅाकडाऊनच्या परिस्थितीमुळे बाजार काहीसा विस्कळित झाला आहे. त्यामुळे जेमतेम मागणी राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ६०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची रोज ५० ते ७० गाड्यांपर्यंत आवक राहिली. मागणीच्या तुलनेत आवक तशी कमीच राहिली. कांद्याची आवक स्थानिक भागातून झाली. बाहेरील आवक कमीच आहे. गेल्या आठवड्यात ८ मेपासून जिल्ह्यात पूर्णतः लॅाकडाऊन जाहीर केला आहे. अत्यावश्यक सेवाही पूर्णपणे बंद आहेत. त्या आधी काही प्रमाणात आवक झाली. पण आता पूर्णपणे व्यवहार बंद आहेत.

येत्या १५ मेपर्यंत ही परिस्थिती राहणार आहे. बाजारातील या विस्कळीतपणामुळे दरावर आणि आवकेवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ६०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही किमान १५० रुपये, सरासरी ५५० रुपये आणि सर्वाधिक ११०० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

परभणीत क्विंटलला ५०० ते ११०० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याचे दर प्रतिक्विंटल किमान ५०० ते कमाल ११०० रुपये, तर सरासरी ८०० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे येथील फळे, भाजीपाला मार्केटमधील व्यवहार वारंवार बंद राहात असल्याच्या परिणाम आवकेवर झाला आहे. या ठिकाणच्या मार्केटमध्ये आठवड्यातील मंगळवारी आणि शनिवारी कांद्याची आवक होत असते. सध्या स्थानिक परिसरातून आवक होत आहे. पंधरा दिवसापूर्वी  १०० क्विंटल आवक झाली होती. त्यावेळी प्रतिक्विंटल १५०० ते १७०० रुपये दर मिळाले होते.

शनिवारी (ता. ८) कांद्याची ५०० क्विंटल आवक झाली. मंगळवारी (ता.११) कांद्याची ३०० क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल ९०० ते ११०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.१३) कांद्याची किरकोळ विक्री १० ते २० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी मो.आवैस यांनी सांगितले.

पिंपळगाव बसवंत येथे ३०० ते १२८० रुपये

नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवार व उपबाजार सायखेडा येथे एकत्रित कांद्याची जिल्ह्यात सार्वधिक आवक आहे. चालू महिन्यात ३ ते ११ मे दरम्यान आवकेत वाढ होण्यासह दरातही सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले.

लाल कांद्याची आवक कमी होऊन उन्हाळ कांद्याची आवक वाढती आहे. मंगळवार (ता.११) रोजी उन्हाळ कांद्याची आवक ६०,२५२ क्विंटल झाली. त्यास किमान ३०० ते कमाल १,१९९ रुपये, तर सरासरी दर १,२८० रुपये होते. 

१२ मे पासून जिल्ह्यात बाजार समित्यांचे आवारातील कामकाज बंद झाले आहे. सोमवारी (ता.१०) उन्हाळ कांद्याची आवक ५२,५७२  क्विंटल झाली. त्यास २०० ते १,९७० असा दर मिळाला. शनिवारी (ता.८) उन्हाळ कांद्याची आवक २५,७४४ क्विंटल झाली. त्यास २०० ते १,८८८ दर मिळाला.

शुक्रवारी (ता.७) आवक ४७,४६२ क्विंटल झाली. त्यास ३०० ते १,८३१ प्रतिक्विंटल दर मिळाला. गुरुवारी (ता.६) आवक ४०,३८९ क्विंटल झाली. त्यास २०० ते १,८१८ प्रतिक्विंटल दर मिळाला. 
बुधवारी (ता.४) लाल कांद्याची आवक १८१ क्विंटल झाली. त्यास ४०० ते ९०१ दर मिळाला. 

जळगावात क्विंटलला ९०० ते १५०० रुपये दर

जळगाव ः  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१३) लाल कांद्याची ९०० क्विंटल आवक झाली. दर ९०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला. कांद्याची आवक यावल, चोपडा, जामनेर आदी भागातून होत आहे.

दरात गेल्या काही दिवसांत सुधारणा झाली आहे. बाजार समितीत लिलाव सुरू आहे. लिलाव प्रक्रिया काहीशी घाईने उरकली जात आहे. 

पुण्यात क्विंटलला १००० ते १३०० रुपये

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१३) कांद्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. यावेळी कांद्याला दहा किलोला १०० ते १३० रुपये दर होते.

राज्यातील कोरोना टाळेबंदी बंद असलेले हॉटेल, आणि परराज्यातुन घटलेली मागणी यामुळे दर कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बाजार समितीमध्ये सध्या होणारी आवक हि पुणे जिल्ह्यासह नगर, नाशिक, सातारा जिल्ह्यातून होत आहे. 

औरंगाबादेत  क्विंटलला ३०० ते ९०० रुपये दर

औरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१३) कांद्याची ११०५ क्विंटल आवक झाली. या कांद्याला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी ६०० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ६ मे रोजी कांद्याची ९३१ क्‍विंटल आवक झाली. या कांद्याला सरासरी ५०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. ८ मे रोजी ८३५ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला सरासरी ६२५ रुपये दर मिळाला. १० मे रोजी १०७७ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे सरासरी दर ६०० रुपये प्रतिक्विंटल होते. ११ मे रोजी ७६९ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला सरासरी ६५० रुपये दर मिळाला. १२ मे रोजी १०९७ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे सरासरी दर ६०० रुपये प्रति क्‍विंटल राहिले.

नागपुरात किरकोळ दर ४० रुपये किलो 

नागपूर :  निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर सुरवातीला अवघे १५ ते २० रुपये किलो असलेले कांद्याचे किरकोळ दर वाढत ३५ ते ४० रुपयांवर पोहोचले. सध्या कळमना बाजार समितीत लाल आणि पांढऱ्या कांद्याची सरासरी एक हजार क्विंटल इतकी आवक होत आहे. 

कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आले. त्यापूर्वी बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी एकच गर्दी उसळली. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी देखील दर वाढवीत नफा कमविण्यावर भर दिला.

सध्या काही भागात कांदा ३५ ते ४० रुपये किलो दराने विकला जात आहे. नागपूरच्या कळमना बाजार समितीत कांदा आवक एक हजार क्विंटलची आहे. सरासरी १२०० ते १५०० रुपये असा दर कांद्याला मिळत आहे. 

घाऊक कांदा दर कमी असताना किरकोळ दर मात्र तेजीत आहेत. किरकोळ बाजारात दरातील या तेजीचा फायदा शेतकऱ्यांना मात्र होत नसल्याचे सांगण्यात आले. विदर्भातील बहुतांश बाजार समित्यांचे व्यवहार  बंद आहेत.  केवळ यवतमाळ आणि नागपूर येथील बाजार समित्या सुरू आहेत. ह्याचा देखील घाऊक दरावर परिणाम झाला.

नांदेडला क्विंटलला ५०० ते ११०० रुपये

नांदेड : नांदेड शहराजवळील बोंडार बाजारात सध्या कांद्याची आवक स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे. आठवड्यातून दोन दिवशी लिलाव होतो. सध्या ५० टनापर्यंत कांदा बाजारात येत आहे. या कांद्याला ५०० ते ११०० रुपये दर मिळत असल्याची माहिती ठोक व्यापारी महम्मद जावेद यांनी दिली.

लाकडाउनमुळे व्यापार कमी असल्यास कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. स्थानिक बाजारात तसेच आठवडे बाजार बंद असल्यामुळे केवळ २५ टक्केच व्यापारी कांदा खरेदी करत आहेत. यामुळे दरात घसरण झाली आहे. सध्या स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा बाजारात येत आहे. 

शहराजवळील बोंडार बाजारात बुधवारी आणि रविवारी कांदा, लसूण, आले, बटाटा या शेतमालाचा लिलाव होतो. बुधवारी (ता. १२) बाजारात ५० टन कांद्याची आवक झाली. या कांद्याला ५०० ते ११०० रुपये क्विंटल भाव मिळाला, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. लाकडाउनचा फटका बाजाराला बसल्याचे महंमद जावेद यांनी सांगितले.


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नागपुरात सोयाबीन दरात तेजीनागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना...
चाकणच्या जनावरांच्या बाजारात ७० लाखांची...चाकण, जि. पुणे : येथील महात्मा फुले बाजार आवारात...
राज्यात जांभळांना ३००० ते १६००० रुपयेजळगावात क्विंटलला ६००० ते ९००० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याची आवक घटली; दरात...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात...
औरंगाबादमध्ये आंब्यांना सरासरी २४५० ते...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये आंब्यांचे...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लसूण ३५०० ते १२००० रुपयेपरभणीत क्विंटलला ५००० ते ६५०० रुपये परभणी...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार...
पुण्यात कांदा, बटाटा, घेवड्याच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लिंबू ६०० ते ३००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते २००० रुपये...
नागपुरात सोयाबीनला ७४०० रुपयांचा दरनागपूर : कळमना बाजार समितीत सोयाबीनमधील तेजी कायम...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात १० ते २०...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात हिरवी मिरची १००० ते ३००० रुपयेजळगावात क्विंटलला १८०० ते २८०० रुपये...
सोलापुरात डाळिंबाच्या दरात तेजी टिकूनसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा, मागणी...पुणे ः पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.१७)...
राज्यात कांदा १०० ते १५०० रुपयेसोलापुरात क्विंटलला १०० ते १००० रुपये सोलापूर...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...