Agriculture news in marathi Onion in the state is 200 to 2500 rupees per quintals | Agrowon

राज्यात कांदा २०० ते २५०० रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

लासलगावात १००० ते २२११ रुपये दर

नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. त्यानुसार दर मिळत आहेत. गुरुवार (ता. २०) रोजी पहिल्या सत्रात लाल कांद्याची आवक १५,००० क्विंटल झाली. त्यांना १,००० ते २,२११ असा दर मिळाला. तर, सर्वसाधारण दर २,००० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

लासलगावात १००० ते २२११ रुपये दर

नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. त्यानुसार दर मिळत आहेत. गुरुवार (ता. २०) रोजी पहिल्या सत्रात लाल कांद्याची आवक १५,००० क्विंटल झाली. त्यांना १,००० ते २,२११ असा दर मिळाला. तर, सर्वसाधारण दर २,००० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बुधवारी (ता.१९) लाल कांद्याची आवक १२,०८४ क्विंटल झाली. त्यांना १,००० ते २,२४० असा दर मिळाला. तर, सर्वसाधारण दर २,०६० रुपये राहिले. मंगळवारी (ता.१८) २५,३८३ क्विंटल आवक झाली. त्या वेळी १,१०० ते २,२५५ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २,०५० रुपये मिळाला. सोमवारी (ता. १७) २२,९२७ क्विंटल आवक झाली. त्या वेळी १,००० ते २,२५५ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २,००० रुपये राहिला.

शनिवारी (ता.१५) लाल कांद्याची आवक ७,४८७ क्विंटल झाली. त्यांना ९०० ते २,१८१ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १,९४० मिळाला. शुक्रवारी (ता.१४) ही आवक १९,२८० क्विंटल झाली. त्या वेळी ९०० ते २,२०२ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १,९०० रुपये मिळाला. 

दरांत चढ-उतार सुरू

गुरुवारी (ता.१३) आवक २०,५८३ क्विंटल झाली. त्यास १,००० ते २,१४० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १,८०० मिळाला. बाजार समितीत गत सप्ताहापासून लाल कांद्याची आवक कमी-जास्त होत आहे. त्यानुसार दरातही चढ-उतार होत असल्याचे चालू सप्ताहात पाहायला मिळाले.

सोलापुरात सर्वाधिक २५०० रुपये 

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याला चांगला उठाव मिळाला. पण, दर काहीसे स्थिर राहिले. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक २५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कांद्याचे दर काहीसे स्थिरच आहेत. चांगली आवक आणि मागणीमध्येही सातत्य असतानाही कांद्याचे दर मात्र स्थिर आहेत. या सप्ताहातही पुन्हा काहीशी अशीच स्थिती राहिली.

कांद्याची आवक मुख्यत्वे जिल्ह्यातून आणि नजीकच्या पुणे, नगर, सांगली, उस्मानाबाद भागातून झाली. या सप्ताहात कांद्याची रोज ८० ते १०० गाड्या आवक राहिली. त्यांना प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये दर मिळाला.  

या आधीच्या सप्ताहातही आवक १०० ते २०० गाड्या प्रतिदिन अशी होती. पण दरही जैसे थेच होते. किमान २०० रुपये, सरासरी १३०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपयांपर्यंत होता. त्याआधीच्या सप्ताहातही कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक २६०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि किमान २०० रुपये असाच दर मिळाला. १०० ते २०० रुपयांचा चढ-उतारचा फरक वगळता कांद्याचे दर काहीसे टिकून राहिल्याचे सांगण्यात आले.

सांगलीत ८०० ते २२५० रुपये दर

सांगली येथील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात गुरुवारी (ता. २०) कांद्याची ४ हजार ८०० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८०० ते २२५० रुपये, असा दर मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीच्या आवारात सोलापूर, सातारा, नगर या ठिकाणांहून कांद्याची आवक होते. गुरुवारी (ता. १३) कांद्याची २२५० क्विंटल आवक झाली होती. त्यांना प्रतिक्विंटल ९०० ते २५०० रुपये असा दर होता. शुक्रवारी (ता. १४) ३४९० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल ९०० ते २३०० रुपये असा दर होता. शनिवारी (ता. १५) कांद्याची ४४१० क्विंटल झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये असा दर राहिला. सोमवारी (ता. १७) कांद्यांची ४८६७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते २४५० रुपये असा दर मिळाला. 

मंगळवारी (ता. १८) कांद्याची ३५४० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल ८०० ते २३०० रुपये असा दर मिळाला. बुधवारी (ता. १९) ४४०० क्विंटल आवक झाली. तेव्हा प्रतिक्विंटल ८०० ते २४५० रुपये असा दर होता.

अकोल्यात कांदा प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये

अकोला येथे कांद्याची दररोज २०० ते ४०० क्विंटलची आवक होत आहे. गुरुवारी (ता. २०) कांद्याला कमीत कमी १५०० ते जास्तीत जास्त २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

अकोला बाजारात जळगाव जिल्ह्यातून कांद्याची सर्व आवक सुरू आहे. येत्या काही दिवसांत नवीन हंगामातील स्थानिक कांदा आवक सुरू झाल्यानंतर हे दर आणखी खाली येऊ शकतात, असे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. 

अकोला बाजारात कांद्याचा उठाव मोठ्या प्रमाणात असतो. गेल्या १५ दिवसांपासून या बाजारात कांद्याचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. दुय्यम दर्जाच्या कांद्याला १५०० ते १८०० रुपयांदरम्यान भाव मिळाला. तर, चांगल्या प्रतीचा कांदा २००० ते २२०० रुपयांदरम्यान विक्री झाला. किरकोळ बाजारात कांदा सर्रास ३० ते ४० रुपये प्रतिकिलोने विक्री केला जात आहे. नवीन कांदा येत्या १५ दिवसांत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा हे दर कमी होतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

जळगावात १००० ते २२०० रुपये 

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २०) ५५० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. दर प्रतिक्विंटल १००० ते २२०० रुपयांपर्यंत मिळाला. आवक चोपडा, भुसावळ, यावल, एरंडोल आदी भागांतून होत आहे. आवक स्थिर असली तरी, दरांत चढउतार होत आहेत. महिनाभरात दरांत मोठी पडझड झाली आहे. मागील महिन्याच्या मध्यात कमाल दर २००० रुपयांखाली आले होते. नंतर जशी आवक कमी झाली, तसे दरही काहीसे स्थिरावल्याची माहिती मिळाली. 

परभणीत कांदा प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये 

परभणी : येथील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २०) कांद्याचे दर प्रतिक्विंटलला १००० ते २००० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी कांद्याची आवक होते. गेल्या महिनाभरात मंगळवारी आणि शनिवारी सरासरी ५० ते १०० क्विंटल आवक होती. त्या वेळी कांद्याला प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले.

सध्या येथील मार्केटमध्ये सोलापूर, नगर जिल्ह्यांतून तसेच स्थानिक परिसरातून कांदा आवक होत आहे. गुरुवारी (ता. २०) कांद्याच्या घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटलला १००० ते २००० रुपये होते. किरकोळ विक्री प्रतिकिलो २० ते ३० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी आवेस  यांनी सांगितले.

नगरला प्रतिक्विंटल २०० ते २५०० रुपये 

नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्हाभरातील कांदा बाजारात कांद्याचे दर खाली आले आहेत. गुरुवारी (ता. २०) कांद्याची ५० हजार क्विटंलची आवक झाली. कांद्याला २०० ते २५०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला.

गेल्या महिनाभरापासून कांदा दरातही सातत्याने चढउतार होत आहेत.  नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक कांद्याची आवक  होते. महिनाभरापूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल ५ हजारापर्यंत दर होता. तो आता कमी झाला असून दरात सातत्याने चढउतार होत आहे. सध्या एक क्रमांकाच्या कांद्याला साधारण १७०० ते २४०० रुपये, दोन नंबरच्या कांद्याला १६०० ते १९०० रुपये, तीन नंबरच्या कांद्याला ९०० ते १५००, व चार नंबरच्या कांद्याला २०० ते ८०० रुपयांचा दर मिळत आहे. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ फेब्रुवारी रोजी ३९ हजार क्विंटलची आवक होऊन २०० ते २५०० रुपयांचा दर मिळाला. १३ फेब्रुवारी रोजी ४३ हजार क्विंटलची आवक होऊन ३०० ते २२५० रुपयांचा दर मिळाला. तर, १० फेब्रुवारी रोजी ३२ हजार क्विंटलची आवक होऊन ३०० ते २६०० रुपयांचा दर मिळाला. ८ फेब्रुवारी रोजी ४३ हजार क्विंटलची आवक होऊन २०० ते २३०० रुपयांचा दर मिळाला.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
खानदेशातील बाजार समित्यांत आवक सुरळीतजळगाव : खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील...
सोलापुरात बाजार समितीत भाजीपाला...सोलापूर ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभर...
कोल्हापूरमध्ये ‘कोरोना’चा...कोल्हापूर : कोरोनाच्या धसक्‍याने या सप्ताहात...
नागपुरात संत्रादरातील सुधारणा कायमनागपूर ः कोरोनामुळे ‘व्हिटॅमिन सी’ असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात २५ ते ३०...पुणे : ‘‘कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव...
औरंगाबादमध्ये संत्रा ५०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर ४०० ते ८०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्‍यात संत्रा ५०० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये...
सोलापुरात मेथी, कोथिंबिरीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हरभरा दर दबावातजळगाव ः खानदेशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन...
जळगावात गवार १८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.१७...
नाशिकमध्ये मिरची १००० ते ३००० रुपयेनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात संत्रा दरात सुधारणानागपूर ः उन्हाची तीव्रता वाढल्याच्या परिणामी...
नगरला चिंच, ज्वारीची आवक अजूनही कमीचनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अजूनही...
गाजर, मटार, पावट्याच्या दरात वाढपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लालबाग आंबा ८००० ते १००००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवगा १५०० ते २००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्‍यात घेवडा ५०० ते ३५०० रूपये...परभणीत ५०० ते १००० रुपये दर परभणी : येथील...
नाशिकमध्ये डाळिंब प्रतिक्विंटल ६५० ते...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...