राज्यात कांदा १२०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल

राज्यात कांदा १२०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल
राज्यात कांदा १२०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल

पुण्यात मागणीत घट, दरही कमी पुणे : केंद्र सरकारने कांद्याच्या साठवणुकीसाठी घातलेल्या मर्यादेमुळे कांदा खरेदीवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे कांद्याला उठाव नसल्याने आणि दक्षिणेतून मागणी कमी झाल्याने कांद्याचे दर कमी झाले आहेत. गुरुवारी (ता. ३) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दहा किलोला २५० ते ३२० रुपये दर होते. आवक सुमारे ७० ट्रक झाली, अशी माहिती कांद्याचे प्रमुख आडतदार विलास रायकर यांनी दिली. 

रायकर म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने लहान व्यापाऱ्यांना १०, तर मोठ्या व्यापाऱ्यांना ५० टनांपर्यंतच कांदा खरेदी आणि साठवणुकीची परवानगी दिली आहे. त्यामुळे खरेदीदार मर्यादेपेक्षा जास्त कांदा खरेदी करत नाही. परिणामी, कांद्याला उठाव कमी झाला आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदादेखील सडू लागल्याने शेतकऱ्यांकडून विक्री सुरू झाली आहे. आवकेमध्ये कमी दर्जाचे प्रमाण जास्त असल्याने देखील दर कमी झाले आहेत. तर दक्षिणेतून देखील मागणी कमी झाली आहे.’’  

अकोल्यात प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये

अकोला येथील बाजारपेठेत नवीन कांद्याची आवक सुरू झाली. गुरुवारी (ता. ३) आंध्र प्रदेशातून चार गाड्या नवीन कांदा विक्रीसाठी आला होता. तो २५०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाल्याची माहिती व्यापारी सूत्राने दिली. येथील बाजारपेठेत दररोज ६०० ते ८०० क्विंटलपर्यंत कांद्याची आवक होत आहे. आता नवीन कांदा यायला सुरुवात झाली. स्थानिक कांदा अद्याप आलेला नाही.

आंध्रप्रदेशातून दररोज चार ते पाच गाड्या कांदा आवक होत आहे. नवीन कांद्याला २५०० ते २८०० दरम्यान भाव मिळत आहे. जुन्या कांद्याची आवक मंदावलेली असली, तरी त्याला ३००० ते ३५०० रुपये भाव मिळत आहे. येत्या आठवड्यापासून स्थानिक भागातील नवीन कांदासुद्धा विक्रीला येऊ शकतो. यामुळे दरात कमतरता येण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. सध्या किरकोळ बाजारात कांदा ५० ते ७० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे.

जळगावात २२०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील तीन आठवडे कांद्याची आवक टिकून राहिली. परंतु, सरकारकडून दर नियंत्रणासंबंधी कारवाई सत्र हाती घेतल्यानंतर गुरुवारी (ता. ३) बाजारातील आवक २०० क्विंटलने कमी झाली. गुरुवारी ४०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. दर प्रतिक्विंटल २२०० ते ३६०० रुपयांपर्यंत मिळाले. शेतकऱ्यांकडील आवक नगण्य होती. मोठ्या व्यापाऱ्यांकडून कांद्याची पाठवणूक येथील बाजारात अधिकची होत असल्याचे सांगण्यात आले. 

औरंगाबादेत १२०० ते ३००० रुपये 

औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ३) कांद्याची ८७३ क्‍विंटल आवक झाली. त्याला १२०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २१ सप्टेंबरला ४३८ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला १५०० ते ४४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २३ सप्टेंबरला ३९९ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी दर १७०० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २४ सप्टेंबरला ३४३ क्‍विंटल आवक, तर दर  ७०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २५ सप्टेंबरला कांद्याची आवक ४९२ क्‍विंटल, तर दर १२०० ते ४००० रुपये राहिले. 

२६ सप्टेंबर रोजी १०८० क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला १२०० ते ३७०० रुपये प्रतिक्‍विंटल दर राहिला. २८ सप्टेंबरला ५७७ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी १००० ते ३३५० रुपये दर मिळाला. ३० सप्टेंबर रोजी ४७१ क्‍विंटल आवक झाली.  दर १००० ते ४३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १ सप्टेंबरला ४६५ क्‍विटंल आवक झाली. दर १२०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल होते, अशी माहिती मिळाली.

सांगलीत २००० ते ३३०० रुपये

सांगली : येथील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात गुरुवारी (ता. ३) कांद्याची ५७१५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २००० ते ३३००, तर सरासरी २०५० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतून कांद्याची आवक होते. गुरुवारी (ता. २६) कांद्याची ११२१ क्विंटल आवक झाली होती. कांद्यास प्रतिक्विंटल १७०० ते ४१००, तर सरासरी २९०० रुपये असा दर होता. शुक्रवारी (ता. २७) कांद्याची १५३९ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते ४०००, तर सरासरी २६०० रुपये असा दर मिळाला.

गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात कांद्याची आवक किंचित वाढली असून दरात चढ-उतार होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

परभणीत ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल

पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ३) कांद्याचे दर प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

येथील मार्केटमध्ये आठवड्यातील दर शनिवारी कांद्याची आवक होत असते. सध्या स्थानिक हैदराबाद, सोलापूर आदी भागांतून कांद्याची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक शनिवारी ५०० ते ७०० क्विंटल कांद्याची आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल सरासरी ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ३) घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये होते, तर किरकोळ विक्री ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती. नव्या कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात सुधारणा झाली, असे व्यापारी अब्दुल सलाम अब्दुल गफ्फार यांनी सांगितले.

साताऱ्यात २००० ते ३००० रुपये

सातारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ३) कांद्याची ४०० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपयांचा दर मिळाला. गुरुवारी कांद्याच्या आवकेत वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

कोरेगाव, खटाव, सातारा तालुक्यांतून सर्वाधिक कांद्याची आवक होत आहे. रविवारी (ता. १) कांद्याची ३०२ क्विंटल आवक होऊन ३००० ते ३५०० रुपयांचा दर मिळाला. २६ सप्टेंबरला कांद्याची आवक १३२ क्विंटल झाली. त्या वेळी ३५०० ते ३८०० रुपयांचा दर मिळाला. गुरुवारी मात्र कांद्याच्या आवकेत वाढ झाली आहे. कांद्याच्या आकारावर कांद्याचे दर कमी जास्त होत आहेत. कांद्याची ५० ते ८० रुपये प्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे.

नाशिकमध्ये २५०० ते ३४५० रुपये

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २) कांद्याची आवक ६०७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान २५०० ते कमाल ३४५० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२०० होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू महिन्यात आवक कमालीची घटली. मागणीच्या तुलनेत आवक होत नसल्याने पाहायला मिळत आहे. मंगळवारी (ता. १) कांद्याची आवक १०१६ क्विंटल, तर दर २५०० ते ३४७५ रुपये राहिला. सोमवारी (ता. ३०) कांद्याची आवक १०१५ क्विंटल, तर दर २००० ते ३८७५ प्रतिक्विंटल मिळाला. शनिवारी (ता. २८) कांद्याची आवक ८९३ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ४०११ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३५५० होते. शुक्रवारी (ता. २७) आवक ९३५ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३५०० रुपये दर मिळाला.

सर्वसाधारण दर ३३०० होते. गुरुवारी (ता. २६) आवक ६६८ क्विंटल, तर दर १८०० ते ३४५० राहिले. मागील आठवड्यापासून बाजार समितीत आवक कमी जास्त होत आहे. बाजारभाव टिकून आहेत. रविवार (ता. २९ ) कांद्याचे मार्केट बंद ठेवण्यात आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com