agriculture news in marathi Onion in the state is Rs. 200 to 3500 | Agrowon

राज्यात कांदा २०० ते ३५०० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक बऱ्यापैकी राहिली. पण मागणी असल्याने दरात काहीशी सुधारणा झाली.

सोलापुरात प्रतिक्विंटला २०० ते ३५०० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक बऱ्यापैकी राहिली. पण मागणी असल्याने दरात काहीशी सुधारणा झाली.

कांद्याला प्रतिक्विंटलला कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज २० ते ५० गाड्यापर्यंत राहिली. गेल्या काही दिवसांपासून आवकेत चढ-उतार राहिला. पण मागणी असल्याने दर काहीसे स्थिर राहिले. पण या सप्ताहात पुन्हा त्यात किचिंत सुधारणाही झाली.

या आधीच्या सप्ताहातही आवक अशीच रोज १० ते ४० गाड्यापर्यंत राहिली. तर दर किमान २५० रुपये, सर्वसाधारण २२०० रुपये आणि सर्वाधिक ३२०० रुपये दर मिळाला. त्या आधीच्या सप्ताहातही दरात असाच चढ-उतार राहिला. कांद्याची आवक ३० ते ६० गाड्यापर्यंत राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये सर्वसाधारण १८०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

लासलगावात प्रतिक्विंटलला १५०० ते २८३१ रुपये 

नाशिक: लासलगाव बाजार समितीत गुरुवारी (ता. ७) लाल कांद्याची आवक १४००० क्विंटल झाली. त्यास १५०० ते २८३१, तर सर्वसाधारण २७५१ रुपये दर मिळाला. सध्या बाजारात लाल कांद्याची आवक वाढली आहे. उन्हाळ कांद्याची आवक कमी झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत बुधवारी (ता.६) लाल कांद्याची आवक २५७८५ क्विंटल झाली. त्यास ११०० ते २८२२,  सर्वसाधारण दर २६५१ रुपये मिळाला. मंगळवारी (ता.५) आवक २१५७० क्विंटल, तर दर १२०० ते २८३५, सर्वसाधारण २६७० रुपये मिळाला. सोमवारी (ता.४) उन्हाळ कांद्याची आवक २२० क्विंटल झाली. त्यास ७०० ते २१२२, तर सर्वसाधारण दर १५०१ मिळाला. तर लाल कांद्याची आवक १६८१६ क्विंटल झाली. त्यास ११०० ते २८५१ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २६४० मिळाला.

शनिवारी (ता.२) उन्हाळ कांद्याची आवक १०० क्विंटल झाली. त्यास ५०० ते १६००, तर सर्वसाधारण दर १४०० मिळाला. लाल कांद्याची आवक ८७९४ क्विंटल झाली. त्यास ९११ ते २७५२, तर सर्वसाधारण दर २३५० मिळाला. शुक्रवारी (ता.१) उन्हाळ कांद्याची आवक २२० क्विंटल झाली. त्यास ६०० ते १९२३, तर सर्वसाधारण दर २३५० रुपये मिळाला. आवक १९४८८ क्विंटल झाली. त्यास सर्वसाधारण दर २३५० मिळाला.

नांदेडला प्रतिक्विंटलला १००० ते ३००० रुपये

नांदेड : नांदेड शहराजवळील बोंडार मार्केटमध्ये बुधवारी (ता. ६) दीड हजार कट्टे कांद्याची आवक झाली. या कांद्याला एक हजार ते तीन हजार रुपये दर मिळाल्याची माहिती ठोक व्यापाऱ्याने दिली. 

बोंडार मार्केटमध्ये आठवड्यातून रविवारी व बुधवारी कांदा, लसूण, आले व बटाट्याची आवक होते. या बाजारात राज्यातील अकोला, नगर, सोलापूर जिल्ह्यासह स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा येतो. बुधवारी (ता. ६) बाजारात दीड हजार कट्टे कांद्याची आवक झाली. यात कांद्यास प्रतिक्विंटल एक हजार ते तीन हजार दर मिळाला. सध्या कांदा दरात घसरण झाल्याचे ठोक व्यापारी मोहमंद युनूस यांनी सांगितले.

अकोल्यात प्रतिक्विंटला १८०० ते ३००० रुपये

अकोला ः येथील बाजारपेठेत कांद्याला १८०० ते ३००० रुपयांदरम्यान दर मिळत आहे. दुय्यम दर्जाचा कांदा १८०० ते २२०० रुपये, तर उच्च दर्जाचा कांदा २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. गेल्या चार पाच दिवसांत पावसाचे वातावरण बनल्याने आवक कमी झाल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. 

येथील बाजारपेठेत कांद्याची दिवसाला १५ ते २० टनांपर्यंत आवक होत आहे. बाजारात प्रामुख्याने नगर व सोलापूर भागातील कांदा विक्रीसाठी येत आहे. स्थानिक कांदा पुढील आठ ते दहा दिवसांत निघणार असल्याने त्यानंतर बाजारपेठेत आवक वाढण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली.

अद्याप जुना कांदा विक्रीला येत असल्याने दरही चांगले मिळत आहेत. कांद्याची किरकोळ विक्री ही ३० ते ५० रुपयांदरम्यान प्रतिकिलोने होत आहे. नवीन आवक वाढल्यानंतर बाजारातील सध्याचे दर कमी होण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली.

परभणीत प्रतिक्विंटला २००० ते ३००० रुपये

परभणीः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याचे दर प्रतिक्विंटल किमान २००० ते कमाल ३००० रुपये, तर सर्वसाधारण २५०० रुपये असल्याची माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये आठवड्यातील प्रत्येक शनिवारी नाशिक, नगर जिल्ह्यासह राज्याच्या  अन्य भागातून कांद्याची आवक होत आहे. गेल्या महिनाभरात ८०० ते १००० क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विटंल १००० ते ३००० रुपये दर होते.

शनिवारी (ता.२) कांद्याची १००० क्विंटल आवक झाली. त्यावेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये होते. गुरुवारी (ता.७) कांद्याची किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी मो. आवेस यांनी सांगितले.

सांगलीत १३०० ते ३१०० रुपये दर

सांगली ः येथील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात गुरुवार (ता. ७) कांद्याची २२६३ आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १३०० ते ३१००, तर सर्वसाधारण २२०० असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीच्या आवारात सातारा, सोलापूर, अहमदनगर, पुणे या ठिकाणाहून कांद्याची आवक होते. बुधवारी (ता. ६) कांद्याची ३४२७ क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल  १२०० ते ३१०० तर सर्वसाधारण २१५० रुपये दर मिळाला. मंगळवार (ता. ५) कांद्याची २८१३ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते ३०००, तर सर्वसाधारण २१०० रुपये असा दर होता.

सोमवारी (ता. ५) कांद्याची २६९० क्विंटल आवक झाली. दर १००० ते ३५००, तर सर्वसाधारण २२५० रुपये मिळाला. शनिवारी (ता. २) कांद्याची २६३७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते ३६००, तर सर्वसाधारण २२५० रुपये दर होता. शुक्रवारी ११५५ क्विंटल आवक झाली.

जळगावात प्रतिक्विंटला ६०० ते १८०० रुपये 

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ७) कांद्याची ४८० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ६०० ते १८०० असे होते. आवक जिल्ह्यातील जामनेर, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड आदी भागातून होत आहे. दर कमी झाले आहेत.


इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली...
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने...
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५००...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
नाशिकमध्ये लाल कांद्याच्या दरात सुधारणा...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात घेवडा, भेंडी, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये तुरीला क्विंटलला सव्वा सहा... नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात भाजीपाल्याचे दर स्थिर पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगलीत बेदाण्याला उच्चांकी २७१ रुपये दरसांगली ः होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाणा...
खानदेशात कांदा दर स्थिरजळगाव ः खानदेशात मागील महिनाभरापासून कांदा दर...
औरंगाबादमध्ये द्राक्षांना क्विंटलला...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात हरभरा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात हरभरा दरात सुधारणा झाली असून, दर...
राज्यात चिंच ५००० ते १२५०० रुपये क्विंटललातुरात प्रतिक्विंटलला ७००० ते १२५०० रुपये...
खानदेशात केळी कमाल १०००, तर किमान दर...जळगाव : खानदेशात केळीची आवक कमी आहे. दुसरीकडे...
सोलापुरात हिरवी मिरची दरात सुधारणासोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये लाल कांदा दरात सुधारणा कायमनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
वाईत नवीन हळदीची आवक सुरू वाई, जि. सातारा ः येथील शेती उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते...कोल्हापूर : येथील बाजार समितीत रविवारी (ता. १४)...
पुण्यात भेंडी, टोमॅटोच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात द्राक्ष २५०० ते १५००० रुपयेजळगावात क्विंटलला ५००० ते ८००० रुपये जळगाव ः...