Agriculture news in marathi Onion in the state is Rs. 200 to 4352 | Agrowon

राज्यात कांदा २०० ते ४३५२ रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

सोलापूर  ः कांदा निर्यातबंदीनंतर कांद्याचे दर घसरतील, अशी शक्यता होती. पण, सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक तशी जेमतेम राहिली.

सोलापुरात सरासरी २००० रुपये

सोलापूर  ः कांदा निर्यातबंदीनंतर कांद्याचे दर घसरतील, अशी शक्यता होती. पण, सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक तशी जेमतेम राहिली. पण, मागणी असल्याने कांद्याला चांगला उठाव मिळाला. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १००, सरासरी २००० तर कमाल ४००० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

गतसप्ताहात बाजार समितीच्या आवारात कांद्याची रोज ४ ते ५ गाड्या अशी आवक आहे. कांद्याची सर्व आवक बाहेरील जिल्ह्यातून आहे. स्थानिक आवक अगदीच नगण्य आहे. परंतु, मागणी असल्याने कांद्याला चांगला उठाव मिळतो आहे. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहात आवक काहीशी वाढली होती.

प्रतिदन सरासरी १० ते १५ गाड्यापर्यंत आवक होती. पण, मागणी असल्याने दर टिकून राहिले. त्या सप्ताहात प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३८०० रुपये असा दर मिळाला. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातही दर असाच किमान १०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा होता. प्रतिक्विंटलमागे १०० ते २०० रुपयांच्या फरकाचा चढ-उतार वगळता दर काहिसे तेजीत आणि टिकून असल्याचे दिसते.

कोल्हापुरात १५०० ते ४३०० रुपये

कोल्हापूर : येथील बाजार समितीत कांद्याची दररोज पाच हजार ते सहा हजार पोती आवक होत आहे. कांद्यास दहा किलोस किमान १५० ते कमाल ४३० रुपये इतका दर मिळत आहे. बाजार समितीत नगर, पुणे भागातून जादा प्रमाणात कांद्याची आवक होते. परंतु, गेल्या पंधरा दिवसांमध्ये या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कांद्याच्या आवकेवर त्याचा परिणाम झाला. पावसामुळे कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दरात  पंधरा टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती कांदा, बटाटा विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुण्यात ३ हजार ते ४ हजार रूपये

पुणे  ः निसर्ग चक्रीवादळात चाळींमधील कांदा भिजल्याने झालेले नुकसान, कांदा रोपवाटिकांचे झालेल्या नुकसानीने कांदा पट्ट्यातील घटलेले लागवड क्षेत्र, नवीन कांद्याच्या उत्पादनाला झालेला उशिर आदी कारणांनी बाजारात कांदा टंचाई आहे. त्यामुळे कांद्याचे दर प्रतिकिलो किमान ३० ते कमाल ४० रुपये आहेत.  कोरोनाच्या अनलॉक ५ च्या घोषणेनंतर विविध शहरांमधील हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होत आहेत. त्यामुळे मागणी वाढून दरवाढीची शक्यता आहे.  

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१) कांद्याची सुमारे ४० ट्रक आवक झाली होती. ही आवक सरासरी ६० ट्रक असते. गुरुवारी कांद्याला दहा किलोला ३५० ते  ४१० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे कांद्याचे प्रमुख आडतदार विलास रायकर यांनी सांगितले. 

रायकर म्हणाले,‘‘ नवीन कांद्याच्या आवकेला आणखी दोन महिने वाट पहावी लागणार आहे. निसर्ग चक्रिवादळामुळे  रोपवाटीकांचे झालेल्या नुकसानीबरोबरच चाळींमधील साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणावर भिजला. त्यामुळे साठवलेल्या कांद्याची बाजारातील आवक संपत चालली आहे. यामुळे बाजारात कांदा टंचाई आहे

. ``बाजारभाव वाढण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांनी उपलब्ध कांदा रोखून धरला आहे. त्यातच आता कोरोनाच्या अनलॉक ५ च्या घोषणेनंतर विविध शहरांमधील हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होत असल्याने कांद्याची मागणी वाढेल. यामुळे दरवाढीची शक्यता आहे,’’ अशी माहितीही रायकर यांनी यावेळी सांगितली.

औरंगाबादमध्ये क्विंटलला २०० ते ३४०० रूपये 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१) कांद्याची १३०८ क्विंटल आवक झाली. या कांद्याला किमान २०० ते कमाल ३४०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २४ सप्टेंबरला १११३ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला ४०० ते ३२०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. २६ सप्टेंबरला कांद्याची आवक ५५२ क्विंटल, तर दर २०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २७ सप्टेंबरला ९६४ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला १००० ते ३४०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.

२८ सप्टेंबरला ५०४ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर ७०० ते ३३०० रुपये प्रति क्विंटल राहिले. २९ सप्टेंबरला ६७८ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला १००० ते ३२०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. ३० सप्टेंबरला कांद्याची आवक ६८१ क्विंटल, तर दर ३०० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

लासलगावात कांदा ८५१ ते ४३५२ रुपये

नाशिक  : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक सर्वसाधारण आहे. त्यानुसार दर मिळत आहेत. गुरुवारी (ता.१) पहिल्या सत्रात आवक ४२५० क्विंटल झाली. त्यास ८५१  ते ४३५२ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बुधवारी (ता.३०) आवक ७६६६ क्विंटल झाली. त्यास ७०० ते ४५०० असा दर मिळाला. तर, सर्वसाधारण दर ३१५१ रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता.२९) आवक ७३९२ क्विंटल झाली. त्यास ९०० ते ४२०१ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३०६० रूपये मिळाला.

सोमवारी (ता.२८) आवक १२३०४ क्विंटल झाली. त्यास ८०१ ते ४३०१  प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३१०१  मिळाला. शनिवारी (ता.२६) आवक २६६४ क्विंटल, तर दर ७०१  ते ४४०१ दर मिळाला. 

अकोल्यात १००० ते ३५०० रुपये दर

अकोला : येथील बाजारपेठेत कांद्याची विक्री किमान एक हजार ते कमाल ३५०० रुपयांदरम्यान होत आहे. दुय्यम दर्जाचा कांदा १००० ते १८०० पर्यंत विकत आहे. तर, मध्यम ते उच्च दर्जाचा कांदा २००० ते ३५०० दरम्यान विकला जात आहे. सरासरी २५०० ते ३००० दरम्यान कांद्याची विक्री सुरु असल्याचे व्यापारी सूत्राने सांगितले.

येथील बाजारपेठेत कांद्याची दिवसाला २० टनांपर्यंत आवक होत आहे. बाजारात स्थानिक भागातील कांद्याची आवक अधिक आहे. दुय्यम व मध्यम दर्जाचा कांदा अधिक प्रमाणात विक्रीला येत आहे. कांद्याची सध्या मागणी वाढली आहे.

खाण्यासाठी तसेच लागवडीसाठी ग्राहकांकडून मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली आहे. अद्याप जुनाच कांदा विक्रीला येत आहे. नवीन कांद्याची आवक सुरु होईपर्यंत हे दर टिकून राहण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली.

जळगावात ५०० ते ३६०० रुपये

जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१) लाल कांद्याची ४५० क्विंटल आवक झाली. दर किमान ५०० ते कमाल ३६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले.

आवक औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड, जळगाव, भुसावळ, जामनेर, जालना आदी भागातून होत आहे. आवक गेले दोन महिने रखडत सुरू आहे. कमी दर्जाच्या कांद्याला कमी दर मिळत आहेत. फक्त लाल कांद्याची आवक अधिक आहे.

नांदेडमध्ये अडीच हजार ते तीन हजार रुपये क्विंटल

नांदेड  : नांदेड शहराजवळील बोंडार मार्केटमध्ये सध्या कांद्याची आवक दररोज ५० ते ८० टन होत आहे. या कांद्याला अडीच हजार ते तीन हजार रुपये दर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्याने दिली. 

बोंडार मार्केटमध्ये आठवड्यातून रविवारी व बुधवारी कांदा, लसूण, आले व बटाट्याची आवक होते. या बाजारात राज्यातील अकोला, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यासह स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा येतो. बुधवारी (ता.३०) बाजारात साठ टन कांद्याची आवक झाली. यात जून्या कांद्यास प्रतिक्विंटल अडीच हजार ते तीन हजार दर मिळाला. नव्या कांद्याला पावशे ते दोन हजारपर्यंत दर मिळत असल्याचे व्यापारी मोहमद युनूस यांनी सांगितले.

सांगलीत १००० ते ३६०० रूपये

सांगली : येथील विष्णूअणणा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात गुरुवारी (ता. १) कांद्याची १२३७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते ३६०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत सातारा, सोलापूर, पूणे जिल्ह्यासह नगर या भागातून कांद्याची आवक होते. सोमवार (ता. २८) कांद्याची १२१४ क्विंटल आवक झाली होती. कांद्यास प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. २९) कांद्याची २०१२ क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये दर मिळाला. बुधवारी (ता. ३०) कांद्याची २४३६ क्विंटल आवक झाली. कांद्यास प्रतिक्विंटल १२०० ते ४००० रुपये असा दर होता.

परभणीत १००० ते ३००० रूपये

परभणी  ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.१) कांद्याचे दर प्रतिक्विंटल किमान १००० ते कमाल ३००० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

येथील मार्केटमध्ये आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी कांद्याची आवक होत असते. सध्या स्थानिक परिसरातून तसेच नगर जिल्ह्यातून कांद्याची आवक होत आहे. गेल्या महिन्यात स्थानिक परिसरातून मोठ्या प्रमाणात आवक सुरु होती. त्यावेळी कांद्याचे दर प्रतिक्विंटल ७०० ते १७०० रुपये होते.

शनिवारी (ता.२६) कांद्याची ७०० क्विंटल, तर मंगळवारी (ता.२९) ३०० क्विंटल आवक झाली. त्यावेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये होते. हे दर आठवडाभर सारखेच असतात. गुरुवारी (ता.१) कांद्याची किरकोळ विक्री प्रतिकिलो १० ते ४० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी मो.आवेस यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...
गुलटेकडी येथे ‘तोलणारां’चे धरणे आंदोलनपुणे ः गुलटेकडी येथील बाजार समितीमधील भुसार...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ९३...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ लघू-मध्यम, मोठ्या...
पंतप्रधानांनी घेतली ‘जय सरदार’ची दखल बुलडाणा ः शेतकऱ्यांकडून मका खरेदी केल्यानंतर...
कोल्हापुरात दसरा सोहळा साध्या पध्दतीने...कोल्हापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा दसरा...
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाः उद्धव...मुंबई: राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी नेहमी...
डाळिंब फळबागेचे हंगामनिहाय नियोजनतेलकट डागासाठी, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील...
सूक्ष्म सिंचन पद्धतीवर कांदा लागवडकांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...