राज्यात कांदा २०० ते ४५०० रुपये क्विंटल

जळगाव ःबाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२८) लाल कांद्यांची ५०० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १४०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल, असे मिळाले.
Onion in the state is Rs. 200 to 4500 per quintal
Onion in the state is Rs. 200 to 4500 per quintal

जळगावात क्विंटलला १४०० ते २४०० रुपये  

जळगाव ः  बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२८) लाल कांद्यांची ५०० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १४०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल, असे मिळाले. 

नव्या कांद्याची आवक कमी आहे. चाळी व इतर भागात साठविलेल्या कांद्याची आवक टिकून आहे. या कांद्याचे दर कमाल २६०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. नव्या हंगामातील कमी दर्जाच्या कांद्याला किमान १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. गेल्या काही दिवसांत दरात घसरण झाली आहे. ही घसरण कायम आहे.

परभणीत क्विंटलला १५०० ते २००० रुपये

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.२८) कांद्याचे दर प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल २५०० रुपये राहिले. तर सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, अशी अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये लासलगाव, नगर, कोल्हापूर जिल्ह्यातून तसेच स्थानिक परिसरातून आठवड्यातील दर मंगळवारी आणि शनिवारी कांद्याची ३०० ते ४०० क्विंटल आवक होत आहे. गेल्या महिन्याभरापासून कांद्याच्या दरात फारशी सुधारणा नाही. गुरुवारी (ता.२८) कांद्याचे घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी सय्यद मुसा यांनी सांगितले.

पिंपळगाव बसवंतमध्ये ६०० ते ३४०४ रुपये

नाशिक : जिल्ह्यात सर्वाधिक आवक होत असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात बुधवारी (ता.२७) उन्हाळ कांद्याची आवक ११,९०९ क्विंटल झाली. त्यास किमान ६०० ते कमाल ३,४०४ असा दर मिळाला. तर सर्वसाधारण दर २,६०१ रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता.२६) उन्हाळ कांद्याची आवक ९,९३६ क्विंटल झाली. त्यास किमान ६०० ते कमाल ३,५८१ असा दर मिळाला. तर सर्वसाधारण दर २,७११ रुपये होते. सोमवार (ता.२५) रोजी आवक १४,६३६ क्विंटल झाली. त्यास ५०० ते ३,६५६ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २,७५१ रुपये होते. 

शनिवारी (ता.२३) आवक ८,५३७  क्विंटल झाली. त्यास ८०० ते ३,९४१ दर मिळाला. सर्वसाधारण दर २,८८१ रुपये मिळाला. शुक्रवार (ता.२२) आवक ११,२२१ क्विंटल झाली. त्यास ८०० ते ४,५०१ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३,००१ रुपये मिळाला.गुरुवारी (ता.२१) आवक १३,६७६ क्विंटल झाली. त्यास ८०० ते ४,४७० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २,८०१ रुपये मिळाला. 

बुधवारी (ता.२०) आवक १३,३८९ क्विंटल झाली. त्यास ८०० ते ४,५०१ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३,०५१रुपये मिळाला. सध्या उन्हाळ कांद्याची आवक कमी झाली. तरीही दर दबावात असल्याची स्थिती आहे. त्यामुळे मागणीनुसार दरातही चढ-उतार दिसून आला. 

नांदेडमध्ये क्विंटलला ५०० ते ३००० रुपये

नांदेड : नांदेड शहराजवळील बोंडार बाजारात बुधवारी (ता. २७) कांद्याला ५०० ते ३२०० रुपये दर मिळाला. बाजारात ५०० टन कांद्याची आवक झाल्याची माहिती ठोक व्यापारी महंमद इब्राहिम यांनी दिली.

नांदेड शहराजवळच्या बोंडार येथे बुधवारी तसेच रविवारी अशा दोन दिवशी कांदा, लसूण, आले, बटाट्याची आवक होते. बुधवारी (ता. २७) बोंडार बाजारात ५०० टन कांद्याची आवक झाली. या कांद्याला ५०० ते ३२०० रुपये दर मिळाल्याची माहिती महंमद अय्युक ॲण्ड कंपनीचे महंमद इब्राहिम यांनी सांगितले.

पुण्यात प्रतिक्विंटल १५०० ते ३२०० रुपये

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २८) कांद्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली. या वेळी १० किलोला १५० ते ३२० रुपये (१५०० ते ३२०० रुपये क्विंटल) दर होता. आवकेमध्ये नवीन आणि जुन्या कांद्याची प्रत्येकी २५ ट्रक आवक होती. 

या आवकेमध्ये जुन्‍या कांद्याला प्रतिदहा किलोला २५० ते ३२० आणि नवीन कांद्याला १५० ते २५० रुपये दर राहिला, अशी माहिती ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी सांगितली.

सोलापुरात क्विंटलला २०० ते ४५०० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याच्या आवकेत सातत्याने घट होत आहे. पण, दुसरीकडे मागणी वाढत आहे. त्यामुळे कांदा दरात तेजी येत आहे, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक कमीच राहिली. प्रतिदिन ४० ते ५० गाड्यांपर्यंत आवक राहिली. एरव्ही या कालावधीत ही आवक १०० गाड्यांच्याही पुढे जाते. पण यंदा त्यात मोठी तूट आहे. कांद्याची आवक स्थानिक भागापेक्षा बाहेरील नगर, उस्मानाबाद, बीड, लातूर या जिल्ह्यातून अधिक झाली. कांद्याच्या या आवकेचा परिणाम दरावर होतो आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्यात चढ-उतार होतो आहे. पण दर तेजीतच आहेत. 

कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये असा दर राहिला. या आधीच्या सप्ताहातही कांद्याची आवक प्रतिदिन ३० ते ४० गाड्यांपर्यंत राहिली. तर, दर प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १८०० रुपये, सर्वाधिक ४२०० रुपये असा दर मिळाला. किरकोळ २०० ते ३०० रुपयांचा चढ-उतार वगळता दरातील तेजी टिकून राहिल्याचे सांगण्यात आले.

औरंगाबादमध्ये क्विंटलला ३०० ते २५०० रुपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२८) कांद्याची ६८ क्‍विंटल आवक झाली. त्यास ३०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान, तर सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात झालेल्या आवकेच्या तुलनेत गुरुवारची आवक नगण्यच राहिली. २१ ऑक्टोबरला १९२६ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला ४०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. २३ ऑक्टोबरला ७१७ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले.

२४ ऑक्‍टोबरला ९२५ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला ३०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. २५ ऑक्‍टोबरला ७३० क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर २०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले. २६ ऑक्टोबरला ८३१ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला ४०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com