Agriculture news in marathi, Onion in the state is Rs. 300 to 3500 per quintal | Agrowon

राज्यात कांदा ३०० ते ३५०० रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक तुलनेने कमीच राहिली. पण मागणी असल्याने दरात तेजी राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

सोलापुरात क्विंटलला १००० ते ३५०० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक तुलनेने कमीच राहिली. पण मागणी असल्याने दरात तेजी राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज ३० ते ५० गाड्यांपर्यंत अगदीच कमी राहिली. गेल्या काही दिवसांपासून आवकेत काहीशी घट होत आहे. कांद्याची आवक सर्वाधिक स्थानिक भागातूनच आहे. बाहेरील आवक तुलनेने कमीच आहे. पण मागणीत सातत्य असल्याने दर मात्र वाढले आहेत. या आधीच्या सप्ताहाच्या तुलनेत दरात २०० ते ३०० रुपयांच्या फरकाने चढ-उतार राहिला. 

या सप्ताहात कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहात आवक रोज २० ते ४० क्विंटलपर्यंत राहिली. तर दर प्रतिक्विंटलला किमान ११०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३७०० रुपये असा दर मिळाला.

जळगावात क्विंटलला १२०० ते २००० रुपये

जळगाव ः जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२५) लाल कांद्याची ५०० क्विंटल आवक झाली. दर १२०० ते २००० व सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल, असा मिळाला. आवक जळगाव, यावल, चोपडा आदी भागातून होत आहे. 

उन्हाळ कांद्याची अधिकची आवक होत आहे. अनेकांनी उन्हाळ कांदा साठवून ठेवला होता. त्याचीच खरेदी व व्यवहार अधिक असून, पावसाळी किंवा खरिपातील कांद्याची फक्त १५० ते २०० क्विंटल आवक रोज होत आहे. 

नगरमध्ये क्विंटलला ३०० ते ३४०० रुपये

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गावरान कांद्याला २०० ते ३४०० रुपये व सरासरी २६०० रुपयांचा दर मिळाला आहे. लाल कांद्याला ३०० ते ३३०० व सरासरी २५०० रुपयाचा दर मिळाला आहे. 

नगर येथील नेप्ती उपबाजारात सोमवारी (ता. २२) गावरान कांद्यात एक नंबरच्या कांद्याला २४०० ते ३४००, दोन नंबरच्या कांद्याला १५०० ते २४००, तीन नंबरच्या कांद्याला ८०० ते १५०० व चार नंबरच्या कांद्याला २०० ते ८०० रुपयाचा दर मिळत आहे. लाल कांद्याची २५ हजार २३७ गोण्या कांद्याची आवक झाली. एक नंबर लाल कांद्याला २४५० ते ३३००, दोन नंबरच्या कांद्याला १६०० ते २४५०, तीन नंबरच्या कांद्याला ८०० ते १६०० व चार नंबरच्या कांद्याला ३०० ते ८०० रुपयांचा दर मिळाला. 

शनिवारी (ता. २०) गावरान कांद्याच्या ३३ हजार गोण्यांची आवक होऊन २०० ते २५०० व सरासरी १९००, तर लाल कांद्याची २५ हजार ५०० गोण्यांची आवक होऊन १०० ते २८०० रुपये व सरासरी १६०० रुपयांचा दर मिळाला.

परभणीत क्विंटलला १००० ते २००० रुपये

परभणी ः  येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.२५) कांद्याचे दर प्रतिक्विंटल किमान १००० ते कमाल २००० रुपये, तर सरासरी १५०० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये नगर जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भागातून तसेच स्थानिक परिसरातून कांद्याची आवक सुरू आहे. आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी ४०० ते ५०० क्विंटल, तर शनिवारी ८०० ते १००० क्विंटल आवक होते. गेल्या महिनाभरात कांदा दरात फारशी सुधारणा झाली नाही. गुरुवारी (ता. २५) घाऊक दर प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये होते. विविध ठिकाणच्या बाजारात किरकोळ विक्री २० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे ठोक व्यापारी अरुण गव्हाणे यांनी सांगितले.

पुण्यात प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २५) सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. या वेळी दहा किलोला २०० ते २५० रुपये दर होते. तर नवीन कांद्याला १०० ते २०० रुपयांपर्यंत असल्याचे व्यापारी राजेंद्र कोरपे यांनी सांगितले. 

गेल्या आठवड्याच्या तुलनेत दक्षिण भारतातून मागणी कमी झाल्याने दरात थोडी घट झाली आहे. तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर सरासरीच्या तुलनेत स्थिर होते.

औरंगाबादेत क्विंटलला ५०० ते २३०० रूपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरूवारी (ता.२५) कांद्याची आवक ९७५ क्‍विंटल झाली. त्यास ५०० ते २३०० रूपये प्रतिक्‍विंटल दरम्यान, तर सरासरी १४०० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १८ नोव्हेंबरला कांद्याची आवक १०८९ क्‍विंटल झाली. त्यास ३०० ते २१०० रूपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाला. २० नोव्हेंबरला ८२५ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला ४०० ते २००० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २१ नोव्हेंबरला ९७६ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर ३०० ते २१०० रूपये प्रतिक्‍विंटल राहिले. २२ नोव्हेंबरला कांद्याची आवक ५७३ क्‍विंटल, तर सरासरी दर ६०० ते २००० रूपये राहिला. 

कोल्हापुरात क्विंटलला ५०० ते २७०० रुपये

कोल्हापूर : येथील बाजार समितीत कांद्यास दहा किलोस ५० ते २७० रुपये इतका दर मिळत आहे. कांद्याची दररोज १२ ते १३ हजार पोती बाजार समितीत आवक होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत कांद्याचे दर स्थिर असल्याची माहिती कांदा-बटाटा व्यापारी सूत्रांनी दिली. 
या समितीत सध्या पुणे, सोलापूर व नगर भागातून कांद्याची आवक होत आहे. कांद्याची आवक कमी जास्त असली तरी दरात फारसे चढ-उतार नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सांगलीत क्विंटलला ५०० ते २७०० रुपये

सांगली : येथील विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला बाजार आवारात गुरुवार (ता.२५) कांद्याची २४४४ क्‍विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते २७००, तर सरासरी १६०० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात सातारा, सोलापूर, नगर पुणे या जिल्ह्यातून कांद्याची आवक होते. 

मंगळवारी (ता.२३) कांद्याची १६२७ क्‍विंटल आवक झाली. कांद्यास प्रतिक्विंटल ५०० ते ३२००, तर सरासरी १८५० रुपये असा दर मिळाला. शनिवारी (ता.२०) कांद्याची ३७९८ क्‍विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते २७००, तर सरासरी १६५० रुपये असा दर होता.  गुरुवार (ता.२३) कांद्याची १७८६ क्‍विंटल आवक झाली होती. कांद्यास प्रतिक्विंटल ५०० ते २५००, तर सरासरी १५०० रुपये असा दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
सोलापुरात सिमला मिरची, वांगी, गवार तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये डाळिंब दरात सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेवगा २००० रुपये प्रतिदहा किलोपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२८)...
राज्यात कांदा ३०० ते ३५०० रुपये क्विंटलसोलापुरात क्विंटलला १००० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये वालपापडी-...
नगर येथे टोमॅटो, घेवडा दरात सुधारणानाशिक नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी बाजार...
बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२१)...
राज्यात भेंडी ६०० ते ४५०० रुपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला २५०० ते ३००० रुपये...
सोलापुरात वांग्यांच्या, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिरनगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मक्याला हमी दराच्या आतच दरऔरंगाबाद : येथील कृषी बाजार समितीमध्ये मक्याची...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या दरात तेजी;आवक...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांचे दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात लिंबे २५० ते २६०० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ८०० ते १२०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये टोमॅटो, वांगी, कारल्याला अधिक...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात गवार, भेंडी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत सोयाबीन ५७५० रुपयांवरनागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
केळी दरांवर दबाव वाढताचजळगाव ः खानदेशात केळी दरांवर दबाव वाढतच आहे....
सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणावाशीम : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत...